एक्स्प्लोर

शहीद जवान नितीन राठोड आणि संजय राजपूत यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप

पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजय राजपूत व लोणार तालुक्यातील गोवर्धननगर तांड्यातील नितीन शिवाजी राठोड हे दोन जवान शहीद झालेत.

बुलडाणा : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजय राजपूत व लोणार तालुक्यातील गोवर्धननगर तांड्यातील नितीन शिवाजी राठोड हे दोन जवान शहीद झालेत. त्यांच्या पार्थिवास आज सकाळी औरंगाबाद येथे चिकलठाणा विमानतळावर शासकीय मानवंदनेसह आदरांजली अर्पण करण्यात आली. नितीन राठोड अमर रहे.. शहीद जवान नितीन राठोड अमर रहे.. अमर रहे.. शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय.. वंदे मातरम..  या घोषणांनी गोवर्धन नगरचे वातावरण देशभक्तीमय झाले.  जम्मू व काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या वाहन ताफ्यावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात गोधर्वन नगर, ता. लोणार येथील नितीन शिवाजी राठोड जवान शहीद झाले होते. त्यांच्या पार्थिवावर आज 16 फेब्रुवारी  रोजी त्यांच्या मूळ गावी गोवर्धन नगर येथे  शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात पत्नी श्रीमती वंदना शिवाजी राठोड, मुलगा जीवन वय 10 वर्ष व मुलगी  जिविका वय 5 वर्ष, आई सावित्रीबाई , वडील शिवाजी रामू राठोड, दोन बहीण आणि एक भाऊ प्रवीण राठोड असा परिवार आहे.  गोवर्धन नगर येथील आश्रम शाळेच्या प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  याप्रसंगी माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शहीद नितीन राठोड यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले व राज्य शासनाने जाहीर केलेल्या 50 लक्ष रूपयांचा आर्थिक मदतीचा धनादेश कुटुंबीयांना सुपूर्द केला. शहीद जवान यांना केंद्रीय राखीव पोलीस दल व पोलिसांच्या तुकडीने हवेत बंदूकीने तीन फैरी झाडून आदरांजली दिली. शहीद जवान नितीन राठोड यांचे पार्थिव आज विशेष विमानाने औरंगाबाद येथे आणण्यात आले. औरंगाबाद येथून रस्ता मार्गे त्यांच्या मूळ गावी आणून गावातून पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. संपूर्ण गाव यावेळी शोकाकूल झाले होते.  गावकऱ्यांनी  भावूक वातावरणात साश्रूनयनांनी शहीद नितीन राठोड यांना अखेरचा निरोप दिला. अंत्यसंस्काराला लोकप्रतिनिधी,  केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अधिकारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संजय राजपूत अमर रहे.. अमर रहे.. अमर रहे.. शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय.. वंदे मातरम.. या देशभक्तीचे स्फुलिंग उत्तेजित करणाऱ्या घोषणांनी मलकापूरचे आसमंत निनादून गेले. काल जम्मू व काश्मीर राज्यातील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या वाहन ताफ्यावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मलकापूर येथील संजय राजपूत  शहीद झाले होते.   मलकापूर येथे जनता कला-वाणिज्य महाविद्यालयाच्या समोरील प्रांगणात शहीद जवान संजय राजपूत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चौथाऱ्यावर शहीद जवान संजय यांचे सुपूत्र जय याने मुखाग्नी दिला. तसेच छोटा मुलगा शुभम यावेळी उपस्थित होता. यावेळी हजारो उपस्थितांनी साश्रूनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.  शहीद जवान संजय राजपूत यांच्याय कुटूंबियांशी यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांत्वन केले व शासनाने जाहीर केलेल्या 50 लक्ष रूपये आर्थिक मदतीचा धनादेश कुटूंबियांना दिला. औरंगाबाद येथून हेलिकॉप्टरने शहीद संजय यांचे पार्थिव आणण्यात आले.  त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी पार्थिव आणून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. अंत्यदर्शन घेतल्यानंतर मलकापूर शहरातून फुलांनी सजविलेल्या वाहनातून पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget