एक्स्प्लोर

लाडकी बहीण योजनेसाठी 'नारीशक्ती दूत' ॲपवरुन अर्ज भरताना ही काळजी घ्या, तो एरर नाही

नारीशक्ती दूत अॅप डाऊनलोड केल्यानंतर सर्वप्रथम अर्जदार महिलेचे फ्रोफाईल बनवून घ्यावे लागणार आहे.

मुंबई : राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने व ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्यात येत आहे. मात्र, ऑफलाईन पद्धतीने भरलेला अर्जही पुन्हा ऑनलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे. त्यामुळे, शक्यतो ऑनलाईन पद्धतीनेच हा अर्ज भरावा असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. सध्या सेतू केंद्रावर आणि नारीशक्ती दूत अॅपवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरला जात आहे. या अॅपवरुन अर्ज भरताना काही प्रश्न अर्ज भरणाऱ्यांच्या मनात येत असून तांत्रिक एररही येत आहेत. त्यामुळे, अर्ज भरताना अर्जदाराने काही गोष्टींची अगोदरच काळजी घ्यायला हवी. त्यामध्ये, कागदपत्रे अगोदरच स्कॅन करुन आपल्या मोबाईलच्या फोल्डरमध्ये ठेवायला पाहिजे. तसेच, 

नारीशक्ती दूत अॅप डाऊनलोड केल्यानंतर सर्वप्रथम अर्जदार महिलेचे फ्रोफाईल बनवून घ्यावे लागणार आहे. त्यामध्ये, अर्जदार महिलेचे नाव, ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर द्यावा लागतो. तसेच, तुमचं गावाचे नाव, जिल्हा याचीही माहिती द्यावी लागणार आहे. अर्ज भरताना अर्जदार महिलेल्या आधार कार्डवर असलेलं नाव आणि आधार कार्डवरील जन्मतारीख अर्जात नमूद करायची आहे. अर्जात तुम्हाला वैवाहिक स्थिती टाकायची असून विवाहित महिलांनी विवाहित लिहायचं आहे. त्यानंतर, तुमच्या बँक खात्याची तपशीलवार माहिती भरायची आहे. 

अर्ज भरल्यानंतर अर्जदाराने कागदपत्रे अपलोड करायची आहेत. ही सर्व कागदपत्रे स्कॅन करुन घ्यायची आहेत. त्यामध्ये,

1. उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळं रेशनकार्ड, केशरी रेशन कार्ड
2.हमीपत्र डाऊनलोड करुन, त्याची प्रिंट काढून, त्यावर सही करुन अपलोड करायचे आहे.
3.यामध्ये बँक पासबुकची फोटोची स्कॅनकॉपी अपलोड करायची आहे.
4.अर्जदार महिलेने आपले रहिवाशी अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला, शाळेचा दाखला अपलोड करायचा आहे.

ही सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तिथे अर्जदाराचा फोटो हा ऑप्शन येईल. त्यावेळी, फोटो अपलोड न करता, ऑनलाईन फोटो काढायचा आहे. तेथील बटण प्रेस करुन मोबाईलवरुनच हा फोटो काढता येतो. मोबाईल कॅमेऱ्याने लाईव्ह फोटो काढल्यानंतर, अॅक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर क्लिक करायचं आहे.

image not supported on this device हा एरर नाही

सर्वकाही सबिमिट केल्यानंतर तुम्हाला image not supported on this device असा मेसेज तुमच्या अर्जात दिसून येईल. या एररमुळे आपली कागदपत्रे अपलोड झाली नाहीत का, कागदपत्रे अपलोड होताना काही तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे का, असा प्रश्न तुम्हाला पडेल.  मात्र, तसा मेसेज दिसून आल्यावरही घाबरण्याचं कारण नाही.  कारण, तो अॅपचा एरर असून तुमची कागदपत्रे अपलोड झाली आहेत, असेच समजा. डॉक्युमेट अपलोड केल्यानंतर फॉर्म सबमिट करा, या बटणावर क्लिक करुन तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर 4 अंकी ओटीपी येईल. तो ओटीपी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओटीपीवर क्लिक करायचं आहे. तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाला असून तुम्हाला स्क्रीनवर सर्व्हे नंबर दिसून येईल. या सर्व्हे नंबरचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही जवळ ठेऊ शकता.

अर्ज या वेळेत भरणे अधिक सोयीचे  

दरम्यान, मोबाईलवरील नारीशक्ती दूत अॅपवरुन फॉर्म भरताना लोडिंग किंवा बफरिंग होत असल्यास जास्त लोकं एकाचवेळी फॉर्म भरत असल्याने ती तांत्रिक अडचण येते. त्यामुळे, दिवसा तशी तांत्रिक अडचण आल्यास रात्री 10 नंतर किंवा सकाळी 7 वाजण्यापूर्वी अर्ज भरल्यास ती देखील अडचण येणार नाही, त्यामुळे, अर्ज भरताना या काही गोष्टींची काळजी घेतल्यास सहज व सुलभपणे अर्ज भरला जाऊ शकतो.   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिक्षक आहे की हैवान? अश्लील व्हिडीओ दाखवून केला सहा विद्यार्थिनींचा विनयभंग, अकोल्यातील धक्कादायक प्रकार
शिक्षक आहे की हैवान? अश्लील व्हिडीओ दाखवून केला सहा विद्यार्थिनींचा विनयभंग, अकोल्यातील धक्कादायक प्रकार
रामदास कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन,कर्जतमधील भाजप कार्यकर्ते आक्रमक
रामदास कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन,कर्जतमधील भाजप कार्यकर्ते आक्रमक
Badlapur School Case : बदलापूरच्या भडक्यात रेल्वे पोलिस आयुक्त रविंद्र शिसवेंसह 10 पोलिस किरकोळ जखमी; आंदोलन चिघळवणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड
बदलापूरच्या भडक्यात रेल्वे पोलिस आयुक्त रविंद्र शिसवेंसह 10 पोलिस किरकोळ जखमी; आंदोलन चिघळवणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड
MARD : मार्ड शिष्टमंडळाने घेतली महानगरपलिका अतिरिक्त आयुक्तांची भेट; निवासी डॉक्टरांची सुरक्षा, सोई-सुविधा आणि इतर मागण्यांवर चर्चा
मार्ड शिष्टमंडळाने घेतली महानगरपलिका अतिरिक्त आयुक्तांची भेट; निवासी डॉक्टरांची सुरक्षा, सोई-सुविधा आणि इतर मागण्यांवर चर्चा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Badlapur Protest Special Report : बदलापूरमध्ये संतापाचा भडका, दिवसभरात नेमकं काय काय घडलं?Ambernath Road Rage : कौटुंबिक वादातून चिरडलं, भर रस्त्यात रंगला थरार, धक्कादायक व्हिडीओBadlapur School Crime Special Report : अत्याचाराची 'बदलापूर फाईल्स', काय घडलं अन् कसं घडलं?एबीप माझा हेडलाईन न्यूज हेडलाईन्स 11 PM टॉप हेडलाईन्स 20 ऑगस्ट 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिक्षक आहे की हैवान? अश्लील व्हिडीओ दाखवून केला सहा विद्यार्थिनींचा विनयभंग, अकोल्यातील धक्कादायक प्रकार
शिक्षक आहे की हैवान? अश्लील व्हिडीओ दाखवून केला सहा विद्यार्थिनींचा विनयभंग, अकोल्यातील धक्कादायक प्रकार
रामदास कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन,कर्जतमधील भाजप कार्यकर्ते आक्रमक
रामदास कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन,कर्जतमधील भाजप कार्यकर्ते आक्रमक
Badlapur School Case : बदलापूरच्या भडक्यात रेल्वे पोलिस आयुक्त रविंद्र शिसवेंसह 10 पोलिस किरकोळ जखमी; आंदोलन चिघळवणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड
बदलापूरच्या भडक्यात रेल्वे पोलिस आयुक्त रविंद्र शिसवेंसह 10 पोलिस किरकोळ जखमी; आंदोलन चिघळवणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड
MARD : मार्ड शिष्टमंडळाने घेतली महानगरपलिका अतिरिक्त आयुक्तांची भेट; निवासी डॉक्टरांची सुरक्षा, सोई-सुविधा आणि इतर मागण्यांवर चर्चा
मार्ड शिष्टमंडळाने घेतली महानगरपलिका अतिरिक्त आयुक्तांची भेट; निवासी डॉक्टरांची सुरक्षा, सोई-सुविधा आणि इतर मागण्यांवर चर्चा
Reservation : आरक्षणावरून भाजप अडचणीत; राज्यसभा, विधान परिषदेला थेट मोठा डाव टाकत विरोधकांना धोबीपछाड देणार?
आरक्षणावरून भाजप अडचणीत; राज्यसभा, विधान परिषदेला थेट मोठा डाव टाकत विरोधकांना धोबीपछाड देणार?
Lateral Entry : विरोधकांच्या दणक्यानंतर केंद्र सरकार बॅकफूटवर, लॅटरल एन्ट्रीने भरतीचा निर्णय केला रद्द!
विरोधकांच्या दणक्यानंतर केंद्र सरकार बॅकफूटवर, लॅटरल एन्ट्रीने भरतीचा निर्णय केला रद्द!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2024 | मंगळवार
Badlapur School Case : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातून उद्या मुंबईला पोहोचणार, बदलापूर प्रकरणामुळे गावचा दौरा रद्द करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातून उद्या मुंबईला पोहोचणार, बदलापूर प्रकरणामुळे गावचा दौरा रद्द करणार
Embed widget