एक्स्प्लोर

‘क्यार’ वादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा, भातशेतीचे मोठं नुकसान, कोकणात हाय अलर्ट

परतीच्या पावसाच्या तडाख्यानंतर आता किनारपट्टीला क्यार वादळाचा धोका निर्माण झाल्यामुळे कोकणात हाय अलर्ट जारी कण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग : ‘क्यार’ वादळाचा कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला आहे. किनारपट्टी भागात दर्याला उधाण आलं आहे. त्यामुळे किनारपट्टी लगतच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे. तर गेल्या तीन ते चार दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे भातशेतीचे मोठं नुकसान झालं आहे. तर किनारपट्टी भागात समुद्राच्या उधाणाचे पाणी लगतच्या वस्तीत गेल्याने त्याठिकाणचे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तळकोकणात दोडामार्ग, वेंगुर्ले, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, कणकवलीत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस  पडतं आहे. कमी दाबाच्या पट्यामुळे पुढील 24 तास असाच पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. किनरपट्टीच्या भागात समुद्राच्या उधाणाचा फटका पिरावाडी, जामडूल बेटाला देखील बसला.  खाडी किनारपट्टी लगतच्या घरांमध्ये शिरल्याने घरातील अन्न धान्यासहीत इलेक्ट्रॉनिक वस्तू भिजून गेल्याने ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीतही पाणी शिरल्याने पिण्याचे पाणी देखील दुषित झालयं, तर काही मच्छिमारांच्या जाळीचेही नुकसान झाले. पुढील दोन दिवस उधाणाचा धोका कायम असल्याने जामडूल बेटावरील ग्रामस्थ भितीच्या छायेखाली आहेत. मालवण, आचरा, देवगड भागाला समुद्राच्या उधाणाचा फटका. आचरा जामडूल पिरावाडीला उधाणाचा फटका जामडूल बेटाला पाण्याचा विळखा, खाडी किनारपट्टी लगतच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. केरळ, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक राज्यातील अनेक बोटी आश्रयासाठी कोकणातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या देवगड बंदरात आणल्या आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व बोटी देवगडमध्ये दाखल झाल्या आहेत. 'क्यार' चक्रीवादळचा फटका मासेमारी व्यवसायाला आणि पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. तसेच सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे दोडामार्ग तालुक्यात सर्व नदी-नाले तुडूंब भरले आहेत. तिलारी धरणातही क्षमतेपेक्षा जास्त साठा झाला आहे. भेडशी येथील नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने येथील कॉजवे पाण्याखाली गेल्याने ग्रामीण भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. Kyaar Cyclone | तामिळनाडू, केरळमधल्या बोटी अडकल्या, 'क्यार' चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला मोठा फटका | ABP Majha दरम्यान गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडला मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असून ढगफुटीसारखा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याच्या तज्ज्ञांनी दिला आहे. वादळाचा फटका मुंबईलाही बसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget