एक्स्प्लोर
Advertisement
खासदार महाडिकांचा मुलगा सुसाट, इंग्लंडमध्ये फॉर्म्युला थ्री रेस जिंकली!
कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराजने ब्रिटीश फॉर्म्युला थ्री स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले आहे.
कोल्हापूर: कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराजने ब्रिटीश फॉर्म्युला थ्री स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे तब्बल 19 वर्षांनंतर एका भारतीय रेसरने या स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याची किमया साधली आहे.
त्यामुळे सातासमुद्रापार जाऊन कोल्हापूरचा झेंडा रोवणाऱ्या कृष्णराजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
19 वर्षांपूर्वी भारताचा प्रसिद्ध रेसर नरेन कार्तिकेयनने अशी कामगिरी केली होती. त्यानंतर आता कृष्णराजच्या रुपाने या मानाच्या स्पर्धेचं विजेतेपद भारतीय रेसरला मिळाले आहे.
पहिल्या रेसमध्ये कृष्णराज महाडिक आठव्या स्थानावर होता. मात्र जिद्द, कौशल्य आणि समयसूचकतेच्या जोरावर सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत कृष्णराजनं विजेतेपदाला गवसणी घातली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement