एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Konkan : तळकोकणातील तळकटच्या जंगलात तब्बल 150 प्रजातींचे पक्षी, दुर्मिळ जातीच्या पक्षांचीही नोंद

Konkan News Update : सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील तळकटच्या जंगल परिसरातील पक्षी सौंदर्य टिपण्यासाठी पर्यटक आणि पक्षीप्रेमींना भुरळ पडली आहे.

Konkan News Update : महाराष्ट्रातील पश्चिम घाट हा जैवविविधतेने संपन्न आणि विविध प्राणी पक्षांनी नटलेला भाग आहे. सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील तळकटच्या जंगल परिसरातील पक्षी सौंदर्य टिपण्यासाठी पर्यटक आणि पक्षीप्रेमींना भुरळ पडली आहे. दक्षिण भारतात आढळणारे अनेक पक्षी तळकटच्या जगलांत आपल्या नजरेस पडतात. महाराष्ट्रात जे पक्षी नजरेसही पडत नाहीत ते पक्षी आपल्याला तळकटच्या या जगलांत भ्रमंती करताना सहज दृष्टीस पडतात. दुर्मिळ पक्षी ज्या पक्षांची महाराष्ट्रात फारशी नोंद नाही असे पक्षी सहजपणे तळकट भागात आपल्या नजरेस पडतात. घनदाट जंगल, पक्षी, वन्य प्राणी, फुलपाखरे, साप, बेडूक अश्या असंख्य गोष्टींनी तळकट चे जंगल समृद्ध आहे. या भागात वनमानवाचाही अधिवास असल्याचं बोललं जातं. तर वाघांसाठी अतिशय सुरक्षित जंगल म्हणून पाहिलं जातं. अस्वल, बिबट्या, उतमांजर, शेखरु या जगलांत आढळतात. उडणारा साप, उडणारा सरडा याचाही अधिवास आढळतो.

तळकट जंगल परिसरात दुर्मिळ प्रजाती लेगिज हॉक इगल' पक्षी आढळतो. हा मोठ्या आकाराचा हॉक गरुड आहे. याच्या पायावर आणि पोटावर तपकीरी रंगाच्या आडव्या पट्ट्या असतात. याचे डोळे पिवळे असतात. याचा अधिवास घनदाट सदाहरीत पर्वतीय जंगलात असतो. हा फक्त दक्षिण पश्चिम घाट म्हणजे अगदी गोव्यापासून श्रीलंकेपर्यंत आढळतो. महाराष्ट्रात याच्या खूप कमी नोंदी आहेत. हा लहान आकाराच्या सस्तन प्राण्यांची शिकार करतो. यामध्ये प्रामुख्याने शेकरू, ससे, छोटे वानर यांचा समावेश असतो. या पक्षाची राज्यातील दुसरी नोंद ही तळकट भागात आढळली आहे. पहिली नोंद ही महाबळेश्वरमध्ये झाली होती. याची उंची 72 सेंटीमीटर लांबी दोन ते अडीच फूट असते. 

मलायन नाईट हेरॉन हा तांबूस तपकीरी रंगाचा मध्यम आकाराचा बगळा आहे. हा पक्षी सदाहरीत जंगलातील ओढे आणि जंगलातील दलदली भागात आढळतो. निशाचर असल्याने आणि घनदाट जंगलात याचा वावर असल्याने याचा शोध घेणे हे आव्हानत्मक असते. हा पक्षी पश्चिम घाट व ईशान्य भारतात आढळतो. हा प्रामुख्याने कीटक, मोठे गांडूळ, साप, बेडूक, सरडे खातो. 

श्रीलंकन फ्रॉग माऊथ पश्चिम घाटात मे ते ऑगस्ट दरम्यान ते प्रजनन काळात वास्तव्याला असतो. मुख्यत्वे पहाटे व संध्याकाळी विशिष्ट आवाज काढतात. अभेद्य अधिवास व निशाचर यामुळे याला शोधणे कठीण असते. राज्यातील या पक्षाची पहिली नोंद 2017 मध्ये या भागात केली. मादी 2  ते 4 अंडी देते. उंची 51 सेंटीमीटर असते. 

व्हाईट बेलेड वूडपेकर पांढऱ्या पोटाचा सुतारपक्षी याचा अधिवास सदाहरीत वने, उंच झाडे असतात त्या ठिकाणी आढळतो. राज्यात यांच्या नोंदी कमी आहेत. भारतातात आकाराने 2 नंबरचा पक्षी आहे. याची साईज 48 सें.मी. आहे. ग्रेट हॉर्नबील (मोठा धनेश) याचा अधिवास देवराया, उंच झाडे, उंची 95 ते 105 सेंटीमीटर यांचाही अधिवास या भागात आढळतो.

तिबोटी खंड्या महाराष्ट्रात आढळणाऱ्या आठ किंगफिशर पैकी सहा प्रकारचे किंगफिशर या भागात आढळतात. त्यापैकी सप्तरंगी तिबोटी खंड्या हा पश्चिम घाटात आढळणारा दुर्मिळ किंगफिशर आहे. विणीच्या काळासाठी हे जून महिन्याच्या सुरुवातीला नदीजवळ असणाऱ्या ओढ्यामध्ये दाखल होतात. ते अगदी सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत थांबतात. या काळात ते आपल्या पिल्लांना जन्म देतात. तिबोटी खंड्याचा भारतातील सर्वात सुंदर दहा पक्ष्यांमध्ये समावेश होतो.

'लेसर कुंकू' या स्थलांतरित पक्ष्याची देखील या तळकट भागात प्रथमच नोंद करण्यात आली आहे.

श्रीलंकन फ्रॉग माऊथ पश्चिम घाट आणि फक्त श्रीलंकेत आढळणारा दुर्मिळ असा 'श्रीलंकन फ्रॉग माऊथ' म्हणजेच 'बेडूकमुखी' पक्ष्याची नोंदही या भागात झाली आहे. हा निशाचर पक्षी असल्याने याच शोध घेणे खूपच कठीण आहे. याचा करडा रंग निसर्गाशी मिळता जुळत असतो. एका फांदीवर बसला तर फांदी आणि पक्षी मधला फरक करणे आव्हानत्मक असते. रात्रीच्या वेळी आवाजावरून याचा शोध घ्यावा लागतो.

मलबारी कर्णा हा पक्षी कोकणच्य वैभवात भर पाडणारा पक्षी आहे. तळकत जंगलामध्ये वास्तव असून त्याचे दुर्मिळ दर्शन होते. नराचा रंग लाल भडक, डोके काळे तर माद नारंगी करड्या रंगाची असते. कोकण, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या पक्षाचा अधिवास आढळतो. त्यांचा प्रजनन काळ फेब्रुवारी ते दरम्यान असतो. जुनाट झालेल्या झाडांमध्ये ते घरटे बांधतात. यामध्ये पक्षी दोन ते तीन अंडी देतात नर मादी दोन्ही अंडी उगवण्याचे काम करतात. जवळपास 19 ते 20 दिवस पिल्ले अंड्यातून बाहेर येतात. पिल्लं अंड्यामधून बाहेर आल्यानंतरही नर मादा आपल्या पिल्लांना पाच ते सहा महिने भरवितात.

जिल्ह्यातील पक्षी संपदा टिकविण्यासाठी बेसुमार होणारी वृक्षतोड थांबविणे गरजेचे आहे. जंगले, देवराया यांचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे. आज अनेक पक्षी अभ्यासक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, दोडामार्ग परिसरात पक्षी निरीक्षणासाठी येत आहेत. त्यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
 
खनीज उत्खननासारखे विनाशकारी प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने याचा विपरित परिणाम वन्यजीवांवर होतो. महाराष्ट्रात अन्य भागात जे पक्षी दिसत देखील माहीत असे पक्षी जैवविविधतेने संपन्न असलेल्या या दोडामार्ग तालुक्यातील तळकट च्या जगलांत सहजपणे दृष्टीक्षेपास पडतात. भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पक्षी संशोधक व अभ्यासकांसाठी ही पर्वणी असेल. खास करून महाराष्ट्रातील पक्षी निरीक्षक, अभ्यासक दक्षिण भारतात जातात, त्यांना या भागात दुर्मिळ जातीचे पक्षी जे महाराष्ट्रात दिसत नाहीत ते इथे सहजपणे दिसतात. त्यामुळे निसर्ग पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचा ओघ या भागात पहायला मिळत आहे.
 
ऑस्ट्रेलियन जातीचा 'नाईटहिरोईन' हा पक्षी, काळा सुतार पक्षी पश्चिम घाटात याच जंगलात आढळतो. पुढे केरळ आणि तामिळनाडूतील डोंगराळ प्रदेश आढळतो. बस्तार आणि आग्नेयेकडील मध्यप्रदेशातील रायपूर तसेच पूर्व घाटांतही या पक्ष्याची नोंद झालेली आहे. ओरिसा आणि बंगालच्या दक्षिणेकडील प्रदेशांतही त्याला योग्य अशा अधिवासात हा पक्षी असण्याची शक्यता आहे. भारत मधील आकाराने 2 नंबर चा मोठा सुतार पक्षी आहे. लेग्ज हॉक-ईगल हा शिकारी पक्षी आहे. सर्व गरुडांप्रमाणे तो पक्षी आहे मात्र तो आकारणे मोठा आहे. भारतीय उपखंडात, दक्षिण भारतापासून श्रीलंकेपर्यंत आढळतो. त्याचे विशिष्ट नाव प्राणीशास्त्रज्ञ ई.एफ. केलार्ट यांच्या नावावे सन्मानित केले आहे. लेग्ज हॉक-गरुड हा बऱ्यापैकी मोठ्या आकाराचा गरुड आहे. याची महाराष्ट्रामधली दुसरीच नोंद तळकटमध्ये आहे. गोव्यापासून पुढे श्रीलंकामध्ये आढळतो.

तसेच 'तिबोटी खंड्या' हा खूप सुंदर पक्षी याला पाहण्यासाठी बरेच पक्षीप्रेमी येतात. ग्रे हेडेड बुलबुल फक्त वेस्टर्न घाटमध्ये आढळतो. दिसायला खूप सुंदर, हा प्रत्येकालाच बघावासा वाटतो. मलबार ट्रोगोन हा सुंदर पक्षी पाहण्यासाठी गोवा, कर्नाटक, केरळ मध्ये जावं लागायचं. मात्र हा पक्षी या भागात आढळतो. शिवाय 11 प्रकारची घुबड या भागात आढळतात. पश्चिम घाटात आढळणाऱ्या अनेक प्रजाती या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतात. गोव्याचा राज्यपक्षी फ्लेम थ्रोटेड ज्वाला-गळा असलेला बुलबुल डोक्यापासून मानेपर्यंत काळा आणि मानेपर्यंत सर्वत्र पिवळा असतो. तसेच या पक्ष्याच्या गळ्याचा रंग केशरी असून गळा केशरी असल्याने या पक्ष्याला फ्लेम थ्रोटेड बुलबुल म्हणतात. या प्रकारचे बुलबुल पक्षी गटात राहणे पसंत करतात. त्याचबरोबर भारतातील पश्चिम घाटातील जंगलात हे पक्षी आढळतात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election Results 2024 : उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
Maharashtra Vidhansabha Election Result 2024: पवार, ठाकरे, देशमुख, राणे, शेलार बंधू मैदानात; बारामतीतही लक्षवेधी लढत; कुठून कोण जिंकलं, कोण हरलं?
पवार, ठाकरे, देशमुख, राणे, शेलार बंधू मैदानात; बारामतीतही लक्षवेधी लढत; कुठून कोण जिंकलं, कोण हरलं?
Solapur vidhansabha results 2024 : सोलापूर जिल्ह्यात माढा, बार्शी, सांगोल्यात चुरशीची लढत; तुमच्या मतदारसंघात कोण जिंकलं, कोण पराभूत?
सोलापूर जिल्ह्यात माढा, बार्शी, सांगोल्यात चुरशीची लढत; तुमच्या मतदारसंघात कोण जिंकलं, कोण पराभूत?
Maharashtra Assembly Election Result 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं  86 जागा लढवल्या, कोण बाजी मारणार? उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 86 जागा लढवल्या, कोण बाजी मारणार? उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election Results 2024 : उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
Maharashtra Vidhansabha Election Result 2024: पवार, ठाकरे, देशमुख, राणे, शेलार बंधू मैदानात; बारामतीतही लक्षवेधी लढत; कुठून कोण जिंकलं, कोण हरलं?
पवार, ठाकरे, देशमुख, राणे, शेलार बंधू मैदानात; बारामतीतही लक्षवेधी लढत; कुठून कोण जिंकलं, कोण हरलं?
Solapur vidhansabha results 2024 : सोलापूर जिल्ह्यात माढा, बार्शी, सांगोल्यात चुरशीची लढत; तुमच्या मतदारसंघात कोण जिंकलं, कोण पराभूत?
सोलापूर जिल्ह्यात माढा, बार्शी, सांगोल्यात चुरशीची लढत; तुमच्या मतदारसंघात कोण जिंकलं, कोण पराभूत?
Maharashtra Assembly Election Result 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं  86 जागा लढवल्या, कोण बाजी मारणार? उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 86 जागा लढवल्या, कोण बाजी मारणार? उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
Sangli Election Result : सांगली जिल्ह्यात चुरशीने लढती, कोण बाजी मारली? सांगलीतील विजयी उमेदवारांची यादी
सांगली जिल्ह्यात चुरशीने लढती, कोण बाजी मारली? सांगलीतील विजयी उमेदवारांची यादी
Washim Assembly Election : वाशिममधील तीन मतदारसंघात कुणाचं वर्चस्व? विजयी उमेदवारांची यादी पाहा
वाशिममधील तीन मतदारसंघात कुणाचं वर्चस्व? विजयी उमेदवारांची यादी पाहा
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: खरी शिवसेना कोणाची? शिंदे विरुद्ध ठाकरे लढतीत कोणाला किती जागा?
Thackery Vs Shinde Shivsena: खरी शिवसेना कोणाची? शिंदे विरुद्ध ठाकरे लढतीत कोणाला किती जागा?
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
Embed widget