एक्स्प्लोर

भाजपचा अध्यक्ष बनवण्यासाठी राष्ट्रवादीचा खासदार ड्रायव्हिंग सीटवर!

कोल्हापूर : जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राज्यभरात अभद्र युती-आघाडी पाहायला मिळत आहे. कोल्हापूरही त्याला अपवाद ठरलं  नाही. कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना रोखण्यासाठी  आणि जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष बसवण्यासाठी स्वत: मोर्चेबांधणी केली. राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक हे भाजप समर्थक सदस्यांना घेऊन एका बसमधून आले. आश्चर्य म्हणजे या व्हॉल्वो बसचे ड्रायव्हिंग स्वत: खासदार धनंजय महाडिक करत होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजप आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांची अध्यक्षपदी निवड झाली. तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या सर्जेराव पाटील यांची वर्णी लागली. भाजपचा अध्यक्ष बनवण्यासाठी राष्ट्रवादीचा खासदार ड्रायव्हिंग सीटवर! शौमिका पाटील यांना 37 मते मिळाली. त्यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील गटाच्या बंडा माने यांचा पराभव केला. बंडा माने यांना 28 मते मिळाली. तर उपाध्यक्ष शिवसेनेचे सर्जेराव पाटील यांनाही 37 मतं मिळाली. त्यांनीही काँग्रेसच्या जयवंत शिंपी यांचा पराभव केला. शिंपी यांना 28 मते मिळाली. दरम्यान, महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे, कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला. आधी भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेची मदत घेण्याच्या तयारीत होते. मात्र शिवसेनेच्या 7 सदस्यांनी भाजपला साथ दिली, तर 3 जण काँग्रेसच्या बाजूने राहिले. कोण आहेत धनंजय महाडिक? धनंजय महाडिक हे कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. मात्र काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यासोबतच्या हाडवैरामुळे ते राज्यभरात प्रकाशझोतात आले आहेत. भाजपचा अध्यक्ष बनवण्यासाठी राष्ट्रवादीचा खासदार ड्रायव्हिंग सीटवर! सतेज पाटील यांनी महाडिक यांना लोकसभा निवडणुकीत मदत केल्याचा दावा पाटील यांचा होता. मात्र तरीही महाडिक यांनी विधानसभा निवडणुकीत त्याची परतफेड न करता, स्वत:च्या चुलत भावाला सतेज पाटील यांच्याविरोधात उभे केल्याचा आरोप सतेज पाटील यांचा आहे. विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक हे भाजपच्या तिकीटावर सतेज पाटील  यांच्याविरोधात लढून विजयी झाले. तेव्हापासून सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे कट्टर वैरी आहेत. एकाच घरात अनेक पक्ष  महाडिक या एकाच कुटुंबात अनेक पक्ष असल्याचं चित्र विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळालं होतं.  विधानपरिषदेतील माजी आमदार महादेवराव महाडिक हे काँग्रेसमध्ये होते. त्यांचे पुतणे खासदार धनंजय महाडिक हे पूर्वी शिवसेनेत आणि सध्या राष्ट्रवादीत आहेत.  तर महादेवराव महाडिकांचा मुलगा अमल हे भाजपच्या तिकीटावर विधानसभेत पोहोचले आहेत.  कोल्हापूर जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल कोल्हापूर–( ६७ जागा )
  • भाजप–१४
  • शिवसेना–१०
  • काँग्रेस–१४
  • राष्ट्रवादी–११
  • इतर–१८
  • प्रमुख पक्ष–भाजप/अपक्ष/मित्रपक्ष
  संबंधित बातम्या

पवारसाहेब, खा. महाडिकांच्या भूमिकेबाबत गप्प का?

सतेज पाटील महाडिकांना विजय मिळवून देणार की मंडलिक बाजी मारणार? 

सतेज पाटील आणि धनंजय महाडिक पाच वर्षानंतर भेटतात तेव्हा… 

कोल्हापूरचे भाजप आमदार शरद पवारांच्या भेटीला

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Chandrashekhar Bawankule: 'मायक्रो फायनान्स'चा हैदोस या राज्यात चालणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम देत इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना थेट कारवाईच्या सूचना
'मायक्रो फायनान्स'चा हैदोस या राज्यात चालणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम देत इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना थेट गुन्हा दाखल करण्याच्या सूचना
Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
Rohit Pawar and Vikram Pachpute: विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
Rohit Pawar and Vikram Pachpute: विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
Eknath Shinde: मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Embed widget