एक्स्प्लोर

Kolhapur : कोल्हापूरच्या प्रेमवीराचा विषय हार्ड, थेट हायवेवर होर्डिंग लावून प्रपोज, इंजिनिअर प्रेयसी हारकून टुम्म!

Kolhapur Hording Propose : कोल्हापुरातल्या एका तरुणाने चक्क होर्डिंग लावत त्याला आवडत असलेल्या मुलीला प्रपोज केलं. त्याच्या या 'होर्डिंग प्रपोज'ची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

कोल्हापूर: तांबड्या- पांढऱ्या रस्स्यासाठी आणि रांगड्या स्वभावासाठी कोल्हापूरची ओळख सर्वत्र आहे. इथले सगळेच विषय एकदम हार्ड असतात, मग त्या शर्यती असो वा मारामारी. मग कोल्हापूरकर प्रेमात कसं मागं राहतील? कोल्हापुरातल्या एका तरुणाने मोठं होर्डिंग लावून त्याच्या प्रेयसीला प्रपोज केलं आहे. प्रेमाच्या या होर्डिंगची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

मुलाने आपल्याला अशा पद्धतीने प्रपोज करावं की याआधी कुणी तसं केलंच नसेल अशी इच्छा अनेक मुली बोलून दाखवतात. तसा प्रयत्नही अनेकजण करतात, त्यामध्ये काही अनोख्या पद्धतीने केलेले प्रपोज अनेकांच्या लक्षात राहतात. अशाच अनोख्या पद्धतीने कोल्हापुरातल्या सौरभ कसबेकरने उत्कर्षा हीला चक्क मोठं होर्डिंग लाऊन प्रपोज केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे त्या मुलगीने सुद्धा त्याला होकार दिला आहे. एव्हढंच काय तर त्या मुलीच्या आणि मुलाच्या घरचे सर्वजणसुद्धा यांच्या नात्यासाठी तयार झाले आहेत. 

कोल्हापुरातील सौरभ कसबेकर आणि सांगलीमधील मुलगी उत्कर्षा दोघेही बुधगाव-सांगली येथील वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल डिपार्टमेंटमधून शिक्षण घेत होते. सौरभची आणि उत्कर्षाची शेवटच्या वर्षापर्यंत सुद्धा काही खास ओळख नव्हती. मात्र जेव्हा इंजिनिअरिंग पूर्ण झाली तेव्हा सौरभच्या घरच्यांनी त्याला त्याच्या मनात कोणी असेल तर सांग आम्ही रीतसर मागणी घालू असं त्याला सांगितलं.

मग या पठ्ठ्याने तात्काळ कॉलेजमधील उत्कर्षा नावाची मुलगी होती, आणि ती त्याला आवडायची असं सांगितलं. त्यामुळे त्यांनी रीतसर तिच्या घरी लग्नासाठी मागणी घालायचे ठरवले. त्यानुसार सौरभच्या वडिलांनी उत्कर्षाच्या घरी मागणी घातली. उत्कर्षाच्या घरच्यांचे सुद्धा काही दिवस होय नाही, होय नाही हेच सुरू होते. 

उत्कर्षाकडून सुद्धा अद्याप होकार आला नव्हता. अनेक प्रयत्नानंतर शेवटी घरचे सुद्धा तयार झाले. मात्र लग्नासाठी अनोख्या पद्धतीने तिला प्रपोज करायचे असे सौरभने ठरवले होते. त्यानुसार त्याने कोल्हापूर-सांगली रोड वर एका होर्डिंगद्वारे प्रपोज करायचे ठरवले. या नियोजनानुसार सौरभने चक्क हायवेच्या शेजारीच भलामोठं होर्डिंग लावलं आणि उत्कर्षाला प्रपोज केलं. 

या होर्डिंगचे आणि सौरभ-उत्कर्षाचे प्रपोज करतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याच्या या अनोख्या प्रपोजची चर्चा सर्वत्र रंगली असून अनेक प्रेमवीरांनाही नवीन आयडीया मिळाली आहे. 

संबंधित बातम्या:  

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Embed widget