![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Kolhapur Crime : प्रयाग चिखलीत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली सापडून कोल्हापूर मनपाचा कर्मचारी मृत्यूमुखी
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील प्रयाग चिखलीत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली सापडून कोल्हापूर महानगरपालिकेचा कर्मचारी ठार झाला. हा ट्रॅक्टर दत्त दालमिया साखर कारखान्याकडे ऊस घेऊन चालला होता.
![Kolhapur Crime : प्रयाग चिखलीत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली सापडून कोल्हापूर मनपाचा कर्मचारी मृत्यूमुखी Kolhapur municipal employee dies after being found under a tractor transporting sugarcane in the Prayag chikhali Kolhapur Crime : प्रयाग चिखलीत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली सापडून कोल्हापूर मनपाचा कर्मचारी मृत्यूमुखी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/07/0855a83d2c7ce907b95c69866497d5ce1667785922373169_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील प्रयाग चिखलीत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली सापडून कोल्हापूर महानगरपालिकेचा कर्मचारी ठार झाला. हा ट्रॅक्टर दत्त दालमिया साखर कारखान्याकडे ऊस घेऊन चालला होता. बंडेराव जाधव (वय 55, रा. पाडळी बुद्रुक, ता. करवीर, जि. कोल्हापूर ) असे ठार झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बंडेराव जाधव वाघापूरमधील आहेत. ते पाडळी बुद्रुकमध्ये वास्तव्यास होते. कोल्हापूर महानगरपालिकेत ते कार्यरत होते. जाधव नेहमीप्रमाणे कामावर जात असताना प्रयाग चिखलीत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली सापडले. यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला.
जठारवाडीतील जखमी वारकरी महिलेचा मृत्यू
दरम्यान, जुनोनी (ता. सांगोला) गावाजवळ कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला जात असताना दिंडीमध्ये भरधाव कार घुसून गंभीर जखमी झालेल्या सरिता अरुण शियेकर (वय 45, रा. जठारवाडी, ता करवीर) यांचा पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या आता 8 वर पोहोचली आहे. टाळ मृदंगाच्या गजरात अंत्ययात्रा काढून शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. सरिता शियेकर यांच्या मृत्यूमुळे या अपघातातील ठार झालेल्यांची संख्या आता 8 झाली आहे. या घटनेतील 6 जण जठारवाडी येथील होते. अन्य जखमी असलेल्या जठारवाडीमधील सुभाष काटे व अनिता जगदाळे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दुसरीकडे अनिता जाधव यांच्यावर कोल्हापूरमध्ये, तर शानुताई शियेकर यांच्यावर सोलापूरमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सांगोल्यात भीषण अपघात
विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीत 31 ऑक्टोबर रोजी कार घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात सात वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला होता. दिंडी सांगोला तालुक्यातील जुनोनी इथल्या बायपास रस्त्याजवळ आली असताना मिरजेकडून भरधाव वेगाने येणारी कार दिंडीत घुसली आणि वारकऱ्यांना चिरडत पुढे गेली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)