Kolhapur Election: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या (kolhapur north by election) प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. उद्या (12 एप्रिल) कोल्हापूर उत्तरसाठी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या जयश्री पाटील या निवडणूक लढवत आहेत. तर भाजपकडून सत्यजित कदम निवडणुकीच्या रिंगणात आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात आला असून, दोघांनीही विजयाचे दावे केले आहेत.


दरम्यान, रविवारी प्रचाराच्या शेवटच्या दिग्गज नेत्यांच्या राजकीय सभा कोल्हापुरात पार पडल्या. शेवच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोल्हापूरच्या जनतेला संबोधीत केले. यावेळी त्यांनी कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. त्यामुळं महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव निवडून येणार हे नक्की असा विश्वास  उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. खोटं बोल पण रेटून बोल ही विरोधकांची रणनीती आहे. भाजपला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही, भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 


तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांनीही प्रचारसभा घेत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.  कोल्हापुरात मंत्री मोठ्या प्रमाणात दहशत माजवत आहेत. ही दहशत मतदार मोडून काढतील आणि भाजपला मतं देतील. महाविकास आघाडीबद्दल नागरिकांत संताप आहे. महापुरात हे सरकार काही देऊ शकले नाही.  कोल्हापूरच्या विकासात महाविकास आघाडीचे काय योगदान आहे? येथील मंत्र्यांमुळे कोल्हापूरकरांचा पूर्ण भ्रमनिरास झाला असल्याची टीका फडणीवस यांनी केली.


दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री आणि गृह राज्यमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापुरात तळ ठोकून आहेत. या दोन्ही नेत्यांनी विजयाचे दावे केले आहेत. त्यामुळं या निवडणुकीत आता कोण बाजी मारणारे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या: