CM Uddhav Thackeray : कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीला काही दिवस शिल्लक असून कोल्हापूरात या निमित्ताने प्रचारसभांना जोर आला आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप उमेदवारासाठी प्रचार केला. त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले. यावेळी त्यांनी कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे कोल्हापूरात महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव जिंकतील असे विधान करताना भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. तर त्यांच्या या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे कोणते पाहूया...



  1. ठाकरे यांनी मविआ उमेदवारासाठी हे भाषण केल्याने सुरुवातीलाच कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे कोल्हापूरात महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव जिंकतील असं विधान केलं. 

  2. फडणवीसही भाजप उमेदवारासाठी कोल्हापूरात आले होते, याबाबत बोलताना, भाजपकडे स्वतःच्या कर्तृत्वाचे काही सांगण्यासारखे नाही मग धार्मिक मुद्दे पुढे करतात, अशी टीका त्यांनी केली.

  3. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसला छुपी मदत केली होती का नाही? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी भाजपला केला आहे. शिवसेना समोरुन वार करतो, पाठित वार करण्याची आमची परंपरा नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले. 

  4. शिवसेनेने कोल्हापूरात केलेल्या कामांबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, 'महापुरानंतर मी आणि फडणवीस एकाच ठिकाणी पाहणी केली, आम्ही काय केलं, काय नाही ते जनतेसमोर येऊ दे म्हणून गेलो.' असंही ते म्हणाले.

  5. हिंदूत्त्वाच्या मुद्द्याबाबत ते म्हणाले, 'बेंबीच्या देटापासून भाजपवाले ओरडून सांगत होते, शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. आम्ही भाजपला सोडलं हिंदूत्त्व नाही.'' 

  6. भाजपवर टीका करताना, ''देशात भाजपने बनावट हिंदूहृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला, लोकांनी त्याला झिटकारलं. भाजपकडून पंतप्रधानपदासापासून ते सरपंचपदासाठी एकच फोटो वापरला जातोय, त्यामुळे सरपंच कोण आणि पंतप्रधान कोण हेच समजत नाही.'' असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावल.  

  7. भाजपला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबाबद्दल आदर आहे असं वारंवार म्हटलं जातं, त्यामुळे या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,''बाळासाहेबांबद्दल आदर आहे, तर नवी मुंबई एअरपोर्टला नाव देताना बाळासाहेबांच्या नावाला का विरोध केला? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी भाजपला विचारला. समृद्धी महामार्गाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव महाविकास आघाडी सरकारने दिलं आहे.''


  8. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेच्या तत्त्वांबद्दल बोलताना म्हणाले की, ''1966 साली शिवसेना जन्माला आली. तेव्हापासून शिवसेनेने कधी झेंडा, रंग किंवा नेता बदलला नाही. तुमच्या सोयीप्रमाणे भगवा वापरालं तर खरा भगवा नव्हे. हिंदुत्वाची दिशा बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवली होती.''




  9. ''शिवसेनेच्या प्रत्येक पोस्टरवर बाळासाहेबांचा फोटो आजही असतो, पण भाजपच्या पोस्टरवर आता कुठं अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी दिसतात का?'' असा सवाल भाजपला विचारत त्यांनी आताच्या भाजप नेत्यांवर टीका केली.




  10. अखेर बेळगावमधील मुद्द्याला हात घालताना, ''बेळगावमधील भगवा यांनी खाली उतरवून नकली भगवा चढवला. असं म्हणताना खोटं बोलून चार राज्यात तुमचं चाललं असेल. पण इथं नाही चालणार.'' असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिली.




महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha