Kolhapur Airport : बहचर्चित आणि बहुप्रतिक्षित कोल्हापूर विमानतळाच्या आजपासून नाईट लँडिंग सुविधा सुरु होणार आहे.  त्यामुळे विमानतळ विकासाच्या प्रकियेतील मैलाचा टप्पा पार होणार आहे. आजपासून नाईट लँडिंग सुविधा कार्यरत करण्यासाठी पूर्ण तयारी झाली आहे. त्यामुळे आजपासून कोल्हापूर विमानतळ 24x7 सेवेत कार्यरत असेल. कोल्हापूर विमानतळाच्या वैभवात भर घालणारी टर्मिनल बिल्डींगचेही काम वेगाने सुरु असून 31 मार्च 2023 पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.


राज्य सरकारकडून जागा उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर कोल्हापूर विमानतळावरील धावपट्टीचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. विस्तारीकरणानंतर धावपट्टी 1780 मीटर झाली आहे. या धावपट्टीवर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. धावपट्टीवर मार्किंगही करण्यात आले आहे. आजपासून विस्तारित धावपट्टी पूर्ण क्षमतेने वापरता येणार आहे.






धावपट्टी विस्तारित झाल्याने पूर्ण क्षमतेने प्रवासी असलेले विमानाला कोल्हापूर विमानतळावर लँडिंग, टेक ऑफ करता येणार आहे. तसेच तीन एटीआर आणि एक एअरबस थांबवण्याची व्यवस्था झाली आहे. धावपट्टीवरील विमानांना योग्य दिशा दाखवण्यासाठी, धुक्यामध्ये लँडिंग, टेक ऑफसाठी मदत करणाऱ्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास डीजीसीएकडून  परवानगी दिली असल्याची माहिती कोल्हापूर विमानतळ संचालक अनिल शिंदे  यांनी दिली दिली आहे.


विमानतळावर कोणत्या सुविधा उपलब्ध होणार?



  • न्यू अॅप्रन 

  • आयसोलेशन-वे 

  • टॅक्सी वे 

  • नाईट लँडिंग सुविधेमुळे कोल्हापूर विमानतळावर विमाने पार्क होऊ शकतील


कोल्हापूर विमानतळाच्या अतिरिक्त 64 एकर जागेच्या भूसंपादन प्रक्रियेला गती आली आहे. संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीसाठी अंतिम दर जाहीर करून देय असणाऱ्या रकमेच्या 1048 जणांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता जमीन संपादनासाठी संबंधित जागा मालकांकडून संमती पत्रे देण्यात येत आहेत. आतापर्यंत 300 हून अधिक जाणारी सम्यता पत्रे दिली आहेत. कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी 64 एकर जागेचे अतिरिक्त भूसंपादन मुडशिंगी आणि तामगाव येथील आवश्यक जागेचे संपादन वाटाघाटीने आणि थेट खरेदी करून केले जाणार आहे. 






संबंधितांना अधिकाधिक मोबदला मिळेल, या दृष्टीने दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार कृषी, बिगरशेती, रहिवास, गुंठेवारी आधी विविध स्वरूपांसह संबंधी जमिनीवरील सद्यस्थिती त्यावरील घर अन्य मिळकत उद्योग पीक आधी सर्वांचे मूल्यांकन करून प्रत्येक बाधिताला नेमकी रक्कम किती मिळणार ती नेमकी रक्कम दर्शवून संबंधितांना अंतिम नोटिसा  काढण्यात आल्या यानुसार 1048 जणांना एकूण 209 कोटी 12 लाख 93 हजार 993 रुपये म्हणून भरपाई दिली जाणार आहे.


जगभरातील विमान कंपन्या, वैमानिकांना कोल्हापुरात नाईट लँडिंग सुविधेबाबतची माहिती एआयपी या प्रणालीवर प्रकाशित करण्यासाठी विमानतळ व्यवस्थापनाकडू पाठपुरावा सुरु होता. त्यामुळे नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.


इतर महत्वाच्या बातम्या