Kolhapur Crime : भर चौकात हुक्का ओढून माजगिरी करणाऱ्या गांधीनगरमधील विशाल पहुजासह 11 जणांविरोधात शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ऐतिहासिक ताराराणी चौकात मस्ती करणाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर एबीपी माझाने दणका दिल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल केला आहे. विशालच्या इतर साथीदारांवरही गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. पोलिसांनी 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गांधीनगरातील विशालचा चालत्या कारमधून आतषबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याचबरोबर भरचौकात हुक्का ओढत असतानाही व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर कोल्हापुरात चांगलीच संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी हुक्का ओढल्याबद्दल तसेच फटाके फोडल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भर रस्त्यात माजगिरी
सहज आणि विनासायास पैसा उपलब्ध बौद्धिक दिवाळखोरी करण्यास फार वेळ लागत नाही. गांधीनगरमधील विशालचा तसाच काहीसा गेल्या काही दिवसांपासून रुबाब सुरु आहे. कधी हुक्का, तर कधी बेदरकार गाडी चालवणे, तर फटाके फोडणे असा त्याचा रुबाब सुरु आहे. त्यामुळे त्याचा दम मारो दम हा कार्यक्रम कुणाच्या जोरावर सुरु आहे, अशीच चर्चा रंगली होती.
दिवाळीमध्येही व्हिडिओ व्हायरल
विशालच्या टवाळखोर गँगचा ताराराणी चौकात मध्यरात्री तीन अलीशान गाड्यांमधून फटाके फोडण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईकडे कानोडाळा केला होता. मात्र, एबीपी माझाने या माज करणाऱ्यांचा प्रकार उघड केल्यानंतर पोलिसांनी कारवाईचे पाऊल उचलले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या