Ravi Rana and Bacchu Kadu : प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतरही बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद पुन्हा पेटण्याची चिन्हं दिसत आहेत. रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद शमविण्यासाठी यापूर्वीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी भूमिका बजावली होती. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू माझ्या सांगण्यावरून गुवाहटीला गेल्याचे विधान करून बच्चू कडू यांना एका प्रकारे क्लीनचीट दिली होती. अशातच आज बच्चू कडू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. यावेळी राणा आणि कडू वाद या विषयावर काही चर्चा होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काही दिवसानंतर रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र बच्चू कडूंनी माफी देताना पुढच्या वेळी सोडणार नाही असा धमकीवजा इशाराही दिला. बच्चू कडूंच्या याच इशाऱ्यानंतर दोघांमध्ये नवं वाग्युद्ध सुरु झालं आहे. आता रवी राणा यांनी धमकी देणाऱ्यांना घरात घुसून मारणार, असं वक्तव्य केलं आहे. तर रवी राणांनी मारायला यावं, असं प्रति आव्हान बच्चू कडू यांनी दिलं आहे.
शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. अशातच शिवसेनेसोबत असलेले बच्चू कडूही इतर आमदारांसह शिंदे गटात सामील झाले. शिंदे गटातील सर्व आमदारांवर 50 खोके घेतल्याचे आरोप झाले. त्यामध्ये बच्चू कडू यांचाही समावेश होता. रवी राणा यांनीही बच्चू कडू यांना 50 खोके म्हणून चिथवलं. तेव्हापासून वादाची ठिणगी पडली. तेव्हापासून या दोघांमधील वाद संपण्याचं नाव घेत नाही.
पाहा व्हिडीओ : राणांच्या वदावर ऊर्जा खर्च करु नका, कडू यांचं कार्यकर्त्यांना आवाहन
मला वाद वाढवायचा नाही, त्यावर बोलण्यात काही अर्थ नाही : बच्चू कडू
"रवी राणा काय बोलले मला त्याची काही पर्वा नाही, मी त्या विषयाला वाढवू इच्छित नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी माझ्या मतदार संघात जो निधी दिला. त्यासाठी आभार मानायला मी मुंबईला जात आहे. मी कार्यकर्त्यांना सांगितलं यावर आपली ऊर्जा खर्च करू नका, चांगल्या कामासाठी ऊर्जा खर्च करा. ताकद सगळ्यांच्या अंगात असते, सगळेच मजबूत असतात. मला वाद वाढवायचा नाही, त्यावर बोलण्यात काही अर्थ नाही.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर देखील रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद कायम आहे. मात्र आज वाद वाढवायचा नाही अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. पब्लिक सब जानती है असं सूचक वक्तव्य करायला ते विसरले नाहीत. दरम्यान, दम दिला तर घरात घुसुन मारेन असं वक्तव्य काल रवी राणांनी केलं होतं. काल मतदारसंघातील कामासाठी निधी मंजूर केल्यासंदर्भात आभार मानण्यासाठी कडू मुख्यमत्री आणि उपमुख्यमंत्र्यांन भेटणार आहे. या भेटीदरम्यान ते या मुद्द्यावर चर्चा करू शकतात.
काय म्हणाले होते रवी राणा?
आमदार रवी राणा म्हणाले की, "रवी राणाने उद्धव ठाकरे यांचा दम खाल्ला नाही, बच्चू कडू तर कोणीच नाही. रवी राणा हा एकदा नव्हे तर दहा वेळा प्रेमाची भाषा करेल. पण जर कोणी दम देत असेल तर त्याला घरात घुसून मारण्याची धमक आहे." दरम्यान, पहिल्यांचा चुकी केली म्हणून माफी करतोय असं सांगत मंगळवारी आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्यावर टीका केली होती. आज त्या टीकेला रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :