एक्स्प्लोर

Kirit Somaiya Live Updates : भाजप नेते किरीट सोमय्या आज काय भूमिका घेणार?

मंत्री अनिल परब यांचा रिसॉर्ट तोडण्यासाठी निघालेल्या भाजप नेते किरीट सोमय्यांना काल पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांची सुटकाही करण्यात आली. आज सोमय्या काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

LIVE

Key Events
Kirit Somaiya Live Updates : भाजप नेते किरीट सोमय्या आज काय भूमिका घेणार?

Background

Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) हे आक्रमक झाल्याचे दिसत आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्या अनधिकृत रिसॉर्टवर प्रकरणावरुन त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा लगावला आहे. मंत्री परब यांचा हा रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून सोमय्या आज दापोलीकडे रवाना झाले आहेत. दापोली (Dapoli) कडे निघण्यापूर्वी सोमय्या यांनी एक प्रतिकात्मक मोठा हातोडा प्रसारमाध्यांसमोर दाखवला. हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. जनता असाच हातोडा घेऊन यांना बाहेर घालवणार आहे. साडेबारा कोटी जनतेचा हा हातोडा असल्याचे सोमय्या म्हणालेत.

मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी आज चलो दापोलीचा नारा दिला आहे. मिलींद नार्वेकरांचा बंगला तोडला आता अनिल परब यांचा रिसॉर्ट तोडूयात असेही ते म्हणालेत. आम्ही जनतेची भाषा बोलतो. जनतेची ताकद दाखवायला मी दोपीलाला जात आहे. हा साडेबारा जनतेचा सत्याचा आग्रह असल्याचे सोमय्या म्हणाले. अनिल परबला आज ना उद्या काढावचं लागणार असल्याचे सोमय्या म्हणाले. हा हातोडी ठाकरे सरकारमधील जे लघोटाळेबाज, अनाधिकृत बांधकाम, वसुलीचा पैसा घेतायेत त्या माफियांच्या विरोधात असल्याचे सोमय्या म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत काय भाषण करतात की, माझा माणूस अनाधिकृत बांधकाम करणार, हे काय मुख्यमंत्री आहेक काय? असेही सोमय्या यावेळी म्हणाले.

ठाकरे पोलिसांना नाचवतात, पोलीस जनतेचे आहेत. दरम्यान, हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक आहे, मला अटक करुन दाखवा असे आव्हान देखील सोमय्या यांनी दिले आहे. उद्धव ठाकरेंचं चाललं असतं तर माझे हात पाय कधीच तोडले असते, मात्र मला सुरक्षा आहे म्हणून वाचलो असेही ते म्हणाले. 

नवाब मलिक गेलेत, मात्र डर्टी डझनवर कारवाई होणार आहे. चोरी लबाडी पकडली तर हे असं वागणार, हे चालू देणार नसल्याचे सोमय्या म्हणाले.

07:36 AM (IST)  •  27 Mar 2022

Kirit Somaiya Live Updates : आज किरीट सोमय्या काय भूमिका घेणार याकडं सर्वाचं लक्ष...

परिवहन मंत्री अनिल परब यांचा रिसॉर्ट तोडण्यात यावा या मागणीसाठी निघालेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना काल पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळं काल दिवसभर राजकीय नाट्य घडल्याचे पाहायला मिळाले. उशीरा रात्री पोलिसांमनी त्यांची सुटका केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमय्या यांनी पुढच्या आठवड्यात आणखी तिघांवर कारवाईचा इशारा सोमय्यांनी दिला आहे. दरम्यान, दापोलीतल्या रिसॉर्टकडे निघालेल्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडलं. त्यानंतर भाजप समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सोमय्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.

अनिल परब यांचं कथित रिसॉर्ट पाडण्याच्या मागणीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या आणि माजी खासदार निलेश राणे काल दापोलीत दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी दापोली पोलिसांकडे एफआयआर नोंदवण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही आणि रिसॉर्टकडेही जाऊ दिलं नाही. त्यामुळं सोमय्यांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मांडला. मात्र त्याचीही दखल पोलिसांनी घेतली नाही. शेवटी सोमय्या आणि निलेश राणे आपल्या कार्यकर्त्यांसोबत चालत परबांच्या कथित रिसॉर्टकडे निघाले. थोडे दूर गेल्यावर पोलिसांनी सोमय्या आणि राणेंना अडवलं. तेव्हा पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळाला. पोलिसांनी टाकलेले बॅरिकेट्स ओलांडून जाण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्ते करत होते. त्यावेळी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना मागे रेटण्याचा प्रयत्न केला. शेवटी कायदा आणि सुव्यवस्था भंग केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी किरीट सोमय्या, निलेश राणे आणि निल सोमय्या यांना अटक केली. त्यानंतर त्यांना रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलंय.

22:11 PM (IST)  •  26 Mar 2022

Kirit Somaiya : सोमय्या यांना रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर सोडणार

पोलीस किरीट सोमय्या यांना रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर सोडणार आहेत. सध्या किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात आहेत 

22:09 PM (IST)  •  26 Mar 2022

Kirit Somaiya :  भाजप नेते किरीट सोमय्या यांना घेतलं ताब्यात

Kirit Somaiya :  दापोलीतील साई रिसॉर्टकडे जाणाऱ्या किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

20:01 PM (IST)  •  26 Mar 2022

Kirit Somaiya : साई रिसॉर्टकडे जाऊ दिलं नाही तर रात्रभर आंदोलन करणार : किरीट सोमय्या

साई रिसॉर्टकडे जाऊ दिलं नाही तर रात्रभर आंदोलन करणार असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. 

18:59 PM (IST)  •  26 Mar 2022

Kirit Somaiya : माझा घातपात होणार हे पोलिसांनीच सांगितलं : किरीट सोमय्या

माझा घातपात होणार हे पोलिसांनीच सांगितलं आहे. रत्नागिरीचे एसपी आणि शिवसेनेचे हे कटकारस्थान आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.  

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget