एक्स्प्लोर
खेड- शिवापूर टोलनाका बंद करण्याची पुणे जिल्हाधिकाऱ्यांची शिफारस
पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरचा खेड शिवापूर टोलनाका... 2010 पासून इथे रस्त्यांची कामं सुरु झाली, जी अजूनही पूर्ण झालेली नाहीत. या महामार्गाची कामं 2013 साली पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र, तसं झालं नाही.
मुंबई : पुणे ते सातारा दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचं काम वर्षानुवर्षे रखडलेलं राहिल्याने पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी महामार्गावरील खेड शिवापूर जवळील टोलनाका बंद करण्याची शिफारस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे. या रस्त्याचं काम 2013 मध्ये पूर्ण होणं अपेक्षित आहे.
पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरचा खेड शिवापूर टोलनाका... 2010 पासून इथे रस्त्यांची कामं सुरु झाली, जी अजूनही पूर्ण झालेली नाहीत. या महामार्गाची कामं 2013 साली पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र, तसं झालं नाही. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांच्या कामांमुळे दोन तासांचा प्रवास सहा तासांवर गेला आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी खेड-शिवापूर टोल नाक्याबाबत एक महिन्याचा वेळ दिला होता. जर वेळेत काम झालं नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला.
JNU Violence | जेएनयूचा मुख्य दरवाजा बंद, सुरक्षाव्यवस्थेत वाढ | ABP Majha
गेल्या काही वर्षांपासून पुणे-सातारा महामार्गावरील प्रामुख्याने खेड-शिवापूर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात आली, इतरही उपाय-योजना करण्यात आल्या आहेत. परंतु महामार्ग प्राधिकरणाकडून सर्विस रोडची कामं व्यवस्थित केलेली नाही. स्थानिकांना विचारात न घेता मार्ग तयार करण्यात आला. यामुळे बैलगाड्यांसह ट्रॅक्टर तसंच शेतीविषयक वाहनं आणि स्थानिक वाहनांना महामार्गावराशिवाय पर्याय नाही. यासंदर्भात महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदारांना वारंवार नोटीस देण्यात आल्या आहेत. बैठका घेऊनही सर्विस रोड आणि त्याच्या उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे.
संबंधित बातम्या :
मराठीच हवी...! शिवसेना आमदाराने इंग्रजी कागदपत्रे फाडून अधिकाऱ्यांवर फेकली
नामांकित शाळेच्या बसचं स्टेअरिंग गुन्हेगारांच्या हाती, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यातअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
जालना
मुंबई
बीड
Advertisement