एक्स्प्लोर

पाळणाघर मारहाण : मालकीण आणि आयावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

नवी मुंबई : खारघरमधील पूर्वा प्ले स्कूलच्या पाळणाघरात चिमुकलीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी, मालकीण प्रियांका निकम आणि आया अफसाना शेख यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर पोलिस स्टेशनमध्ये दोघींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काय आहे घटना? खारघर सेक्टर 10 मध्ये पूर्वा प्ले स्कूल आणि नर्सरी आहे. या ठिकाणी काही चिमुकली पाळणाघरात आहेत. पाळणाघरातील आया अफसाना नासीर शेखने रितीशा नावाच्या दहा महिन्यां चिमुकलीला क्रूरपणे मारहाण केली. ज्यात मुलीच्या डोक्याला जखम झाली आहे. तिला उपचारासाठी वाशीच्या फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शेकापकडून पाळणाघराची तोडफोड दरम्यान चिमुकलीला मारहाण केल्याप्रकरणी शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला आहे. शेकापच्या कार्यकर्त्यांनी पूर्वा प्ले स्कूलची तोडफोड केली.

पाळणाघरातील प्रकार घृणास्पद, या प्रकरणात स्वत: लक्ष घालणार: पंकजा मुंडे

  पोलिसांचा हलगर्जीपणा पोलिसांनी या तपासात अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचं समोर येतं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल बारा तास लावले. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही. उलट पोलिस स्टेशनमधील धोपटे साहेब म्हणाले की, तुम्हाला ज्यांच्याकडे माझी तक्रार करायचीय, त्यांच्याकडे करा, मी कोणालाही घाबरत नाही, असा आरोप मुलीची आई रुचिता सिन्हाने केला आहे. शिवाय, कोपरा गावातील स्थानिक आरोपीला मदत करत असून, स्थानिक गुंडाच्या पीडित मुलीच्या पालकांना धमक्या येत आहेत.  

पाळणाघरातील मारहाण प्रकरणी पोलिसांचा हलगर्जीपणा उघड

  पाळणाघरातील चिमुकल्यांना ड्रग्ज किंवा गुंगीचं औषध दिलं? पाळणाघरातील चिमुकल्यांना काहीतरी ड्रग्ज किंवा गुंगीचं औषध दिलं जात असल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. कारण चिमुकलीला मारहाण होत असताना इतर लहान मुलं शांत, चिडीचूप झोपलेली दिसतात.

VIDEO: दहा महिन्याच्या चिमुकलीला पाळणाघरात अमानुष मारहाण

  महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडेंकडून दखल पाळणाघरात चिमुकलीला केलेल्या मारहाण प्रकरणाविषयी बोलताना मंत्री पंकजा मुंडेंनी संताप व्यक्त केला. "हा अतिशय घृणास्पद प्रकार आहे. हे पाळणाघर खासगी होतं की त्यासाठी त्यांनी कोणती परवानगी घेतली होती, याची चौकशी करण्यात येईल. तसेच इथे नियमांचं उल्लंघन झालं का याबाबतही चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान संबंधित महिलेवर कडक कारवाई केली जाईल. तिथल्या पोलिस अधिकाऱ्यांशीही बोलून मी स्वत: या प्रकरणात लक्ष घालणार आहे." अशी प्रतिक्रिया याप्रकरणी पंकजा मुंडेंनी दिली आहे. व्हिडीओ :

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
Shraddha Walker Death Case: श्रद्धा वालकरसाठी बोलायला लागले आणि पाकिस्तानातून निनावी फोन येऊ लागले; आत्या राजल नाईकांचा गंभीर आरोप
श्रद्धा वालकरसाठी बोलायला लागले आणि पाकिस्तानातून निनावी फोन येऊ लागले; आत्या राजल नाईकांचा गंभीर आरोप
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ashleigh Gardner Controversy : मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
Embed widget