एक्स्प्लोर
वारीत अन्नदान करणाऱ्या महिलेचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
कविता तोष्णीवाल या महाबळेश्वर येथील एका कापड व्यवसायिकाची पत्नी आहेत. काल ज्ञानोबांची पालखी लोणंदवरुन फलटणला जात होती. कविता तोष्णीवाल रस्ता ओलांडताना त्यांचा अपघात झाला. त्या ट्रकखाली चिरडल्या गेल्या.

सातारा : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील वारकरी महिलेचा रात्री दुर्दैवी मृत्यू झाला असून, ही महिला दिंडीतील वारकऱ्यांना अन्नदान करण्यासाठी पती आणि मुलांसोबत गेल्या होत्या. कविता तोष्णीवाल असे या महिलेचे नाव आहे.
कविता तोष्णीवाल या महाबळेश्वर येथील एका कापड व्यवसायिकाची पत्नी आहेत. काल ज्ञानोबांची पालखी लोणंदवरुन फलटणला जात होती. कविता तोष्णीवाल रस्ता ओलांडताना त्यांचा अपघात झाला. त्या ट्रकखाली चिरडल्या गेल्या.
अपघातावेळी दोन लहान मुलेही त्यांच्यासोबत होती. सुदैवाने ती बचावली. हा अपघात लहान मुलांसमोरच झाला. या मुलांचा आक्रोश पाहिल्यावर वारकरी खुपच संतप्त झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढचा अनर्थ टळला. अपघाताची नोंद लोणंद पोलिस ठाण्यात झाली असून ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
बीड
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज