एक्स्प्लोर

माजी मठाधिपतीने केली विद्यमान मठाधिपतींची हत्या

कराडकर हा जेष्ठ वारकरी नेते बंडातात्या कराडकर यांचा मठ असून या माठातील बाजीराव कराडकर याना संस्थेच्या विश्वस्तांनी वर्षभरापूर्वी मठाधिपती पदावरून हटवून जयवंत पिसाळ यांची नेमणूक केली होती. यानंतर गेल्या वर्षभरापासून अनेक वाद आरोपी आणि ट्रस्टी यांच्यात सुरु होते.

पंढरपूर : मठाधिपतीच्या वादातून पंढरपुरातील प्रसिद्ध कराडकर मठामध्ये विद्यमान मठाधिपतीची माजी मठाधिपतीकडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हत्येच्या धक्कादायक घटनेमुळे वारकरी संप्रदाय हादरून गेला आहे. मंगळवारी ( 7 जानेवारी) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विद्यमान मठाधिपती जयवंत पिसाळ ( वय 30 , लवंगमाची ता. वाळवा, जि सांगली ) यांची माजी मठाधिपती बाजीरावबुवा कराडकर ( वय 35 , कोडोली , ता कराड ) यांच्याशी वाद झाले आणि या वादातून कराडकर यांनी चाकू व वरवंट्याच्या साहाय्याने पिसाळ यांची निघृण हत्या केली. कराडकर हा जेष्ठ वारकरी नेते बंडातात्या कराडकर यांचा मठ असून या माठातील बाजीराव कराडकर याना संस्थेच्या विश्वस्तांनी वर्षभरापूर्वी मठाधिपती पदावरून हटवून जयवंत पिसाळ यांची नेमणूक केली होती. यानंतर गेल्या वर्षभरापासून अनेक वाद आरोपी आणि ट्रस्टी यांच्यात सुरु होते. यातील आरोपी असलेले बाजीरावबुवा यांनी काही महिन्यापूर्वी एका ट्रस्टीला बेदम मारहाण केल्याच्या कारणावरून त्यांना सातारा जिल्ह्यात शिक्षाही झाल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे. कालच पुत्रदा एकादशी झाल्याने ही सर्व वारकरी मंडळी मठात आली होती . या काळातील दशमी , एकादशी आणि द्वादशी असे तीन दिवसाची कीर्तन सेवा असते . यातील एक कीर्तन देण्याची मागणी आरोपीने केली होती असे सांगितले जात आहे . यावरूनच दोघात वाद झाले यानंतर मठाधिपती जयवंत पिसाळ आपल्या खोलीत गेल्यावर आरोपी बाजीरावबुवा यांनी आपल्या खोलीत जाऊन चाकू व वरवंटा आणून थेट जयवंत पिसाळ यांच्या खोलीत जाऊन त्यांच्यावर हल्ला केला . यावेळी बाजीरावबुवाने मठाधिपती जयवंत यांचे डोळ्यावर , गेल्यावर व शरीरावर अनेक ठिकाणी सपासप वार करून त्यांचा खून केला . हत्येची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी माहिती देणाऱ्यास या खोलीचा दरवाजाला बाहेरून काडी घालण्यास सांगितल्याने आरोपी हत्यारासह पोलिसांच्या हाती मिळाला . गेल्या आषाढी यात्रेत चांगली पर्यावरण पूरक दिंडी साठी खून झालेले जयवंत पिसाळ यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता . जगाला शांतता आणि समतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायात एकंदर मठाधिपती पदावरून झालेली निर्घृण हत्या संप्रदायाची धक्कादायक असून आता पोलीस चौकशीत सर्व बाबी समोर येणार आहेत . दरम्यान या हत्येची माहिती मिळताच पंढरपुरात असलेले वारकरी संप्रदायाचे महाराज मंडळींनी तातडीने कराडकर मठात धाव घेतली आहे .

महत्त्वाच्या बातम्या

'जशी आम्ही अंगणवाडी सेविकांना भाऊबीज द्यायचो, तशीच ही दुष्काळी मदत दिवाळीसाठी; पंकजा मुंडे टीकाकारांना म्हणाल्या..
'जशी आम्ही अंगणवाडी सेविकांना भाऊबीज द्यायचो, तशीच ही दुष्काळी मदत दिवाळीसाठी; पंकजा मुंडे टीकाकारांना म्हणाल्या..
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Sandeep Deshpande : तुम्ही सत्तेत असताना फेल ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
तुम्ही अपयशी ठरलाय,आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
Embed widget