एक्स्प्लोर

K. Chandrashekar Rao: केसीआर याचं गुलाबी वादळ महाराष्ट्रात धडकणार, नांदेडमध्ये पहिल्या महासभेचं आयोजन

K. Chandrashekar Rao: नांदेडची सभेनंतर केसीआर महाराष्ट्रात आणखी तीन सभा घेणार आहेत.  त्याचत तेलुगू भाषिकांसह वंचित समाजांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असणार आहे.

मुंबई:  तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) त्यां केसीआर (KCR) याचं गुलाबी वादळ महाराष्ट्रात धडकणार आहे. कारण, त्यांचा पक्ष आता राष्ट्रीय राजकारणात आला आहे. त्याच पक्ष वाढीसाठी आणि पक्ष बांधणीसाठी केसीआर यांनी महाराष्ट्रात पहिल्या महासभेचं आयोजन केले आहे.  15 जानेवारीला नांदेडमध्ये ही सभा होईल पण, त्याची तयारी 7 जानेवारीपासूनच सुरु होणार आहे. 

महाराष्ट्रातील तेलंगाणा सीमाभागातील किनवट, माहूर, बिलोली, देगलुर, धर्माबाद या तालुक्यातील गावांमध्ये बैठका होतील. नांदेडनंतर महाराष्ट्रातली दुसरी सभा थेट शिवनेरी किल्ला परिसरात होणार आहे. ओवैसींच्या एमआयएमनंही नांदेडमधूनच महाराष्ट्रात एन्ट्री घेतली होती. एमआयएमचे  पुढे त्यांचे आमदार आणि खासदाराही झाले आणि आता त्याच मार्गानं केसीआरही महाराष्ट्रात येत आहेत. त्यासाठी नांदेडमध्ये मोठं कार्यलयंही बूक केले आहे.  

यासभेतला सीमावादाचीही पार्श्वभूमी आहे. ज्या पद्धतीनं काही गावांनी कर्नाटकात जाण्यासाठी ठराव मंजूर केले. त्याच पद्धतीनं नांदेडच्या तेलंगाणा सीमा भागातल्या  काही गावांनीही ठराव केले होते. त्यांनी तेलंगाणात जाण्याची तयारी दर्शवली होती. केसीआर यांचा पक्ष आधी तेलंगाणा राष्ट्र समिती होता.  त्याचंच नाव बदलून बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समिती केले आणि राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री घेतली.

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव कर्नाटक, महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात आणि ओडिशामध्ये शिरकावाचा प्रयत्न आहे. पक्षाच्या अंतर्गत माहितीनुसार, तेलुगू भाषिक लोकसंख्या इतर राज्यांमधील लोकसभेच्या जवळपास 30 जागांच्या निकालांवर परिणाम करू शकते. त्यात कर्नाटकातील 40 विधानसभा आणि 14 लोकसभेच्या जागा, महाराष्ट्रातील 22 विधानसभा आणि 8 लोकसभेच्या जागा, छत्तीसगडमधील 12 विधानसभा आणि 3 लोकसभेच्या जागा, 18 लोकसभा जागांवर तेलगू भाषिक लोक प्रभाव दाखवू शकतात. 

नांदेडची सभेनंतर केसीआर महाराष्ट्रात आणखी तीन सभा घेणार आहेत.  त्याचत तेलुगू भाषिकांसह वंचित समाजांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असणार आहे. दलित, ओबीसीसह इतर मागास समाजांवर केसीआर यांच्या पक्षाची मदार आहे. तेलंगाणात हाच मतदार काँग्रेससोबत होता आणि आता तोच मतदार बीआरएससोबत आहे.  महाराष्ट्रातही असंच काहीसं होणार का? की महाराष्ट्रातील सभांच्या आड केसीआर यांचा आणखी काही प्लॅन आहे हे लवकरच कळणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Mahavitaran Strike :  महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात, कोयनेसह विविध ठिकाणी संपाचा फटका, आजच्या बैठकीत तोडगा निघणार का?  

महत्त्वाच्या बातम्या

Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Chandrapur Crime News: चंद्रपूर महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने 84 महिलांची फसवणूक; 3 वर्षात कोट्यवधी रुपये उकळल्याचा संशय, एकाला अटक
चंद्रपूर महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने 84 महिलांची फसवणूक; 3 वर्षात कोट्यवधी रुपये उकळल्याचा संशय, एकाला अटक

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Embed widget