मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे जोपर्यंत ते पुन्हा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत दु:ख जाणार नाही, अशी प्रतिक्रिया ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद (Jyotirmatha shankaracharya Avimukteshwaranand) यांनी मातोश्रीवर (Matoshree) उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर दिली.कोणाचं हिंदुत्व खरं हे समजून घ्यावे लागेल पण जो विश्वासघात करतो तो कधी हिंदुत्ववादी नसतो, असेही शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, आपण सगळे हिंदू आणि सनातन धर्माचे पालन करणारे लोक आहोत. पुण्य पापाची भावना आपल्याकडे सांगितली आहे . सगळ्यात मोठा घात हा विश्वासघात असतो. उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झालेला आहे , याबाबतची पीडा अनेकांना आहे. त्यांच्या निमंत्रणानंतर मी मातोश्रीवर आलो त्यांनी माझं स्वागत केलं. मी त्यांना सांगितलं जोपर्यंत तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर खुर्चीवर परत बसत नाहीत तोपर्यंत लोकांच्या मनातील दुःख कमी होणार नाही. कोणाचं हिंदूत्व खरं हे समजून घ्यावे लागेल. पण जो विश्वासघात करतो तो कधी हिंदुत्ववादी नसतो. जो विश्वासघात सहन करतो तो हिंदू असतो. जनतेचा सुद्धा अपमान करण्यात आलेला आहे, जनमताचा अनादर करणे हे चुकीचे आहे.
दिल्लीत केदारनाथ मंदिर बनणार नाही : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
प्रतिकात्मक केदारनाथ मंदिर बनणार नाही. पुराणात सांगितला आहे बारा ज्योतिर्लिंग असतात. जिथे त्यांचे ठिकाण आहे तिथेच हे मंदिर झालेले आहेत. केदारनाथ म्हणजे केदार हा हिमालयाच्या पृष्ठभागावर आहे . केदार जर हिमालयात आहे तर तुम्ही दिल्लीत का आणताय ? त्याचा पत्ता आधी सांगितलेला आहे. केदारनाथ दिल्लीत बनवणं ही एक चेष्टा आहे . धर्मस्थानात राजकारणातले लोक प्रवेश करत आहेत . केदारनाथ मध्ये 228 किलो सोन्याचा घोटाळा झाला हा प्रश्न तुम्ही का उपस्थित करत नाही ? आता दिल्लीत केदारनाथ बनवणार म्हणजे तिथे सुद्धा घोटाळा करणार? असा सवाल शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी उपस्थित केला आहे.
नरेंद्र मोदी माझे दुश्मन नाहीत : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, मोदी माझ्यासमोर आले त्यांनी मला प्रणाम केला आणि आमचा नियम आहे जो कोणी प्रणाम करायला येतो त्याला आम्ही आशीर्वाद देतो . नरेंद्र मोदी माझे दुश्मन थोडी आहेत त्यांच्या हिताबद्दलच मी बोलत असतो त्यांच्या चांगल्यासाठीच आम्ही बोलत असतो. चूक झाली तर आम्ही त्यांना थेट चूक झाली म्हणून सांगतो.
Video : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
हे ही वाचा :