मुंबई : बारामतीमध्ये अवघ्या काही तासांपूर्वी केलेल्या जनसन्मान रॅलीमधील घणाघाती टिकेनंत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज (15 जुलै) थेट शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचल्याने राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ ओबीसी मुद्द्यांवरून नाराज असल्याची चर्चा असताना भुजबळ आणि पवारांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना सुद्धा उधाण आले.
आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास भुजबळ शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचले. मात्र तब्बल दीड तासानंतर या दोन नेत्यांमध्ये 15 मिनिटे भेट झाली. अवघ्या पंधरा मिनिटांच्या भेटीत काय घडलं? याची माहिती भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत दिली. भुजबळ म्हणाले की, ही कोणतीही राजकीय भेट नव्हती. यामध्ये कोणताही राजकीय अर्थ काढू नका. ओबीसी मुद्यावर मार्ग कसा काढायचा याबाबत चर्चा केल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. छगन भुजबळ यांनी सांगितले की, राज्यामध्ये ओबीसी आरक्षण देण्याचं काम पवारांनी केलं. आता आरक्षणावर राज्यात काही जिल्ह्यांमध्ये स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे. त्या संदर्भात मी त्यांना आठवण करून दिली आणि त्याचबरोबर मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यावेळी जो पुढाकार घेतला होता या संदर्भाने सुद्धा त्यांना आठवण करून दिली.
शरद पवारांकडून भुजबळांना प्रतिप्रश्न
भुजबळ यांनी ही माहिती देत असतानाच त्यांचं म्हणणं असं होतं की जरांगेंसोबत काय चर्चा केली माहिती नसल्याचा असा प्रति प्रश्न शरद पवार यांनी केला. त्याचबरोबर ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांच्यासह ससाणे आणि वाघमारे यांचे उपोषण सोडायला गेल्यानंतर काय चर्चा झाली हे देखील मला माहित नसल्याचे शरद पवार यांनी प्रश्न उपस्थित करताना सांगितले. यानंतर छगन भुजबळ यांनी उपोषणकर्त्यांना सरकारकडून काय माहिती देण्यात आली याबाबत पवारांना माहिती दिली. पवारांच्या प्रतिप्रश्नाला उत्तर देताना भुजबळांनी सांगितले की त्यावेळी आम्ही आंदोलकांना आश्वासन दिले की सरकारी योग्य पद्धतीने यावरती मार्ग शोधेल. मी त्यांना विनंती केली की तुम्ही राज्याचा चांगला अभ्यास आहे. आम्हाला सगळा अभ्यास आहे असं नाही.
पवार म्हणाले मी स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत बोलतो
50 लोकमंधे कशी काय चर्चा होऊ शकते? तेव्हा पवार म्हणाले मी स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत बोलतो आणि त्यानंतर हा विषय कसा सोडवायचा याबाबत मार्ग काढतो. ओबीसी विषय सुटावा हाच आमचा विषय आहे. मी या विषयाबाबत कुणालाही भेटायला तयार आहे. गोरगरीबांची घरं पेटता कामा नये म्हणून पंतप्रधान असो की राहुल गांधी कुणालाही भेटायला तयार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या