मुंबई :  मुंबईसह राज्यभरात मार्चनंतरच 100 टक्के अनलॉकचा (Maharashtra Unlock) निर्णय होईल, असं स्पष्ट झालंय. कोरोना (Coronavirus)  नियंत्रण असंच कमी होत गेलं तर मार्चनंतर 100 टक्के अनलॉकचा निर्णय घेता येईल, अशी माहिती राज्याच्या टास्क फोर्सचे (Task Force) प्रमुख डॉक्टर संजय ओक (Sanjay oak) यांनी दिलीय. ब्रिटनमध्ये डेल्टाक्रोनसारखा नवा व्हेरियंट आढळल्यानं टास्क फोर्सनं ही सावध भूमिका घेतली आहे.


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ओमायक्रोन सर्वाधिक वेगानं पसरला, पण या व्हेरियंटच्या कमी घातकतेमुळे महिनाभरातच ही लाट नियंत्रणात आली. त्यामुळे 1 फेब्रुवारीपासून सर्व राष्ट्रीय उद्याने, पर्यटन स्थळे, चौपाट्या, उद्याने-मैदाने पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यात आली. पण मनोरंजन पार्क, थीम पार्क, स्वीमिंग पूल, रेस्टॉरंट, हॉटेल, चित्रपटगृहं, नाटयगृहं 50 टक्के क्षमतेनं सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.


 कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर मुंबईनं लसीकरणाच्या साथीनं कोविडवर नियंत्रण मिळवलं आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबईतील नागरिकांचं लसीकरण 100%  पूर्ण  होईल अशी आशा आहे. त्यावेळी रुग्णसंख्या पूर्ण आटोक्यात आली, तर टास्क फोर्सला अहवाल देऊन हॉटेल-समारंभ पूर्ण क्षमतेने सुरू केले जाऊ शकतात." अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. दरम्यान मुंबई महापालिका निवडणूक  तोंडावर आहे.  त्यामुळे मुंबईत राजकिय घडामोडींनाही गती येतेय.त्यामुळेच या महिन्याअखेरपर्यंत मुंबई पुन्हा एकदा अनलॉकच्या तयारीत आहे. मुंबईत सध्या दररेज सरासरी 500 कोरोना रुग्ण आढळत आहेत. हा आकडा कोरोनानं मुंबईत थैमान घातलं होतं,  त्यावेळपेक्षा बराच कमी आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा पूर्वपदावर येते असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, नाटय़गृहे, चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत फेब्रुवारी अखेरची कोरोना स्थिती पाहूनच निर्णय घेतला जाईल असे संकेत महापालिका प्रशासनानं दिलेत.


संबंधित बातम्या :


Coronavirus Cases: गेल्या 24 तासात देशात 22 हजार 270 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 325 जणांचा मृत्यू


Mumbai Corona Update : मुंबईत शुक्रवारी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, 202 नवे रुग्ण, तर 365 कोरोनामुक्त