India Post Delhi Recruitment 2022 : अल्पशिक्षित तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी. भारतीय टपाल विभागानं भर्तीसंदर्भातील अधिसूचना जारी केली असून स्टाफ कार ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाइन अर्ज करू शकतात. अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वरील भरती विभागात दिलेल्या लिंकवर क्लिक करून थेट भरतीची जाहिरात डाउनलोड करू शकतात. अर्जाचा अर्ज जाहिरातीतच देण्यात आहे. हा अर्ज पूर्णपणे भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. त्यानंतर हा अर्ज 15 मार्चपर्यंत सीनियर मॅनेजर, मेल मोटर सर्व्हिस, सी-121, नरैना इंडस्ट्रियल एरिया फेज-1, नरैना, नवी दिल्ली-110028 या पत्त्यावर पाठवा.
पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. 15 मार्च 2022 रोजी अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 27 वर्षांपेक्षा जास्त नसावं. यासोबतच हलकी आणि जड वाहन चालविण्याचा परवाना असावा.
अर्ज करण्याची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च
वेतन
उमेदवारांचा पगार 19,900 – 63,200/- (स्तर-2)
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड अनुभव आणि कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल.
जाणून घ्या किती पदांवर भरती?
विभागानं प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, स्टाफ कार ड्रायव्हरची पदं जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी, नॉन-राजपत्रित, नॉन-मिनिस्ट्रियल कॅटेगरीमध्ये भरली जातील. भारतीय टपाल विभागानुसार ही भरती एकूण 29 पदांसाठी होणार आहे. त्यापैकी 15 पदं अनारक्षित आहेत. 8 पदं OBC साठी, 3 SC आणि 3 EWS उमेदवारांसाठी राखीव आहेत. या पदांवर थेट भरती होणार आहे. जे दोन वर्षांसाठी असेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Job Majha : टाटा मेमोरियल सेंटरमध्ये भरती सुरू, असा करा अर्ज
- Infosys Recruitment : मोठी संधी! इन्फोसिसमध्ये होणार 55 हजार जणांची नोकर भरती, सीईओ सलील पारेख यांची माहिती
- Job Majha : वयाच्या साठीतही नोकरीची सुवर्णसंधी; दरमाह 5 लाखांपर्यंतचं वेतन, कसा कराल अर्ज?
- IISC Recruitment 2022: भारतीय विज्ञान संस्थेच्या तांत्रिक सहाय्यक पदांसाठी भरती! लगेच करा अर्ज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI