Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.  

टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई

विविध पदांच्या 86 जागांसाठी भरती होत आहे.

पहिली पोस्ट - सायंटिफिक ऑफिसर-E (क्लिनिकल न्यूरोफिजियोलॉजिस्ट)

  • एकूण जागा – 1
  • शैक्षणिक पात्रता - MD (मेडिसिन/फिजियोलॉजी) किंवा Ph.D (न्यूरोफिजियोलॉजी), 3 ते 4 वर्षांचा अनुभव

दुसरी पोस्ट - सायंटिफिक ऑफिसर-D (बायोइन्फॉर्मेटिक्स)

  • एकूण जागा – 1
  • शैक्षणिक पात्रता - Ph.D (संगणकीय जीवशास्त्र / जैव सूचना विज्ञान / संगणक विज्ञान), अनुभव महत्वाचा आहे.

तिसरी पोस्ट - सायंटिफिक ऑफिसर-D (न्यूक्लियर मेडिसिन) 

  • एकूण जागा – 2
  • शैक्षणिक पात्रता - M.Sc., D.M.R.I.T. / P.G.D.F.I.T., 7 वर्षांचा अनुभव

चौथी पोस्ट - सायंटिफिक ऑफिसर-D (कॅन्सर एपिडेमिओलॉजी केंद्र)

  • एकूण जागा – 1
  • शैक्षणिक पात्रता - जीवशास्त्र पदव्युत्तर पदवी / BAMS / BHMS / BOS, 3 वर्षांचा अनुभव

पाचवी पोस्ट - असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर

  • एकूण जागा – 2
  • शैक्षणिक पात्रता - ICWAI/CA/MBA (फायनान्स)/M.Com , 3 ते 5 वर्षांचा अनुभव

सहावी पोस्ट - असिस्टंट पर्चेस ऑफिसर

  • एकूण जागा – 3
  • शैक्षणिक पात्रता – पदवीधर, मटेरियल मॅनेजमेंट PG पदवी/डिप्लोमा, 10 वर्षांचा अनुभव

सातवी पोस्ट - नर्स- A

  • एकूण जागा – 49
  • शैक्षणिक पात्रता - जनरल नर्सिंग & मिडवायफरी डिप्लोमासह ओन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc.(Nursing), 1 वर्षांचा अनुभव

आठवी पोस्ट - सायंटिफिक ऑफिसर-B (बायो-मेडिकल)

  • एकूण जागा – 2
  • शैक्षणिक पात्रता -  BE/B.Tech (बायो-मेडिकल), 2 वर्षांचा अनुभव

नववी पोस्ट - सायंटिफिक ऑफिसर-B (न्यूक्लियर मेडिसिन)

  • एकूण जागा – 6
  • शैक्षणिक पात्रता - B.Sc.,  DMRIT / PGDFIT, RSO परीक्षा उत्तीर्ण, 1 वर्षाचा अनुभव

दहावी पोस्ट - असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर

  • एकूण जागा – 6
  • शैक्षणिक पात्रता – पदवीधर, NCC प्रमाणपत्र, 5 वर्षांचा अनुभव किंवा माजी सैनिक

अकरावी पोस्ट - निम्न श्रेणी लिपिक

  • एकूण जागा – 13
  • शैक्षणि पात्रता – पदवीधर, किमान 3 महिन्यांचा संगणक कोर्स, 1 वर्षाचा अनुभव
  • वयोमर्यादा – 27 ते 45 वर्ष

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट - www.tmc.gov.in