JOB Majha :  तुम्ही नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. पुणे महापालिकेत आणि कल्याण डोंबिवली महापालिकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया केवळ मुलाखतीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याने तरुणांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी थेट मुलाखती घेण्यात येणार असून त्या आधी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. या भरतीचे तपशील काय आहेत ते सविस्तरपणे पाहू.


पुणे महानगरपालिका


पुणे महानगरपालिकेत विविध पदांच्या 91 जागांसाठी भरती होत आहे. विनापरीक्षा थेट संधी मिळणार आहे. सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.


पहिली पोस्ट - ज्युनियर रेसिडेंट
एकूण जागा – 29
शैक्षणिक पात्रता - एमबीबीएस सह एमएमसी / एनएमसी नोंदणी प्रमाणपत्र
वयोमर्यादा – 38 वर्षांपर्यंत


दुसरी पोस्ट - सिनियर रेसिडेंट
एकूण जागा – 21
शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी पात्रता एमडी / एमएस / डीएनबी
वयोमर्यादा – 38 वर्षांपर्यंत


तिसरी पोस्ट - सहाय्यक प्राध्यापक
एकूण जागा – 15
शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी पात्रता एमडी / एमएस / डीएनबी,  3 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा – 40 वर्षांपर्यंत


चौथी पोस्ट - ट्युटर/डेमॉनस्ट्रेटर
एकूण जागा – 14
शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस
वयोमर्यादा - 38 वर्षांपर्यंत


पाचवी पोस्ट - सहायक प्राध्यापक
एकूण जागा – 9
शैक्षणिक पात्रता- पदव्युत्तर पदवी पात्रता एमडी / एमएस / डीएनबी, 4 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा - 45 वर्षांपर्यंत


नोकरीचं ठिकाण – पुणे
अधिकृत वेबसाईट - www.pmc.gov.in  
या वेबसाईटवर गेल्यावर 'नवीन काय आहे' मध्ये सेवा भरतीवर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहीरातीची लिंक दिसेल. त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.


वरील पदांसाठी 29 सप्टेंबर 2021 रोजी थेट मुलाखत होणार आहे.


मुलाखतीचे ठिकाण - जुना GB हॉल, तिसरा मजला, पुणे मनपा मुख्य भवन


----


कल्याण डोंबिवली महानगरपालिका


कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 26 जागांसाठी ही भरती करण्यात येत आहे.


पहिली पोस्ट – वरिष्ठ तंत्रज्ञ
एकूण जागा – 12
शैक्षणिक पात्रता - बी.एस्सी., डीएमएलटी, 1 वर्षाचा अनुभव


दुसरी पोस्ट – कनिष्ठ तंत्रज्ञ
एकूण जागा – 12
शैक्षणिक पात्रता - बी.एस्सी., डीएमएलटी


या पोस्टशिवाय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि केंद्र प्रमुख कम गुणवत्ता व्यवस्थापक पदासाठी प्रत्येकी 1 जागा आहे. त्याविषी तुम्हाला वेबसाईटवर विस्ताराने माहिती मिळेल.


वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष
नोकरीचं ठिकाण – कल्याण डोंबिवली, ठाणे


अधिकृत वेबसाईट -www.kdmc.gov.in 


या वेबसाईटवर गेल्यावर recruitment मध्ये view वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्ट संदर्भातल्या जाहीरातीची लिंक दिसेल. त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.


वरील जागांसाठी 30 सप्टेंबर 2021 रोजी थेट मुलाखत होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता - आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प.).


 



संबंधित बातम्या :