मुंबई : छगन भुजबळ हे राज्याचे गृहमंत्री असताना बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray)यांच्या अटकेच्या संदर्भातला विषय वारंवार समोर येतो. यावर आज धुळ्यात बोलताना मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी म्हटलं की, बाळासाहेब ठाकरे यांना कुठलाही त्रास होऊ नये हाच आमचा उद्देश होता. यासाठी मातोश्रीला जेल म्हणून घोषित करण्याचा त्यावेळी निर्णय घेतला होता असं छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
मला फार आनंद होत नव्हता, सुडाची भावनाही नव्हती
काही दिवसांपूर्वी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत भुजबळांनी म्हटलं होतं की, मला वाटतं हा विषय 20-22 वर्षांपूर्वीच संपलेला आहे. त्यावेळेला श्रीकृष्ण कमिशन शिवसेना-भाजपनं स्थापन केलं होतं, त्यात बाळासाहेबांवर अनेक ठपके ठेवण्यात आले होते. त्या काळात सेना-भाजपच्या राज्यामध्ये अनेक फाईल्स क्लिअर केल्या. आम्ही त्यावेळेला लढलो होतो. तेव्हा आम्ही श्रीकृष्ण आयोगानुसार कारवाई करू, असं वचन जनतेला दिलं होतं.मी गृहमंत्री झाल्यानंतर ती जुनी फाईल पुन्हा दाखल करण्यात आली, ती माझ्यासमोर आली. मी ती लॉ-ज्युडिशिअरीला पाठवली. त्यांच्याकडूनही तोच अभिप्राय आल्यावर मी त्या फाईलवर सही केली. अर्थात त्यावेळेला मला फार आनंद होत नव्हता. सुडाची भावनाही नव्हती, असं त्यांनी म्हटलं होतं.
OBC Reservation वरून निवडणुका रद्द व्हाव्या यासाठी राज्य सरकार कोर्टात जाणार नाही
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ हे धुळे दौऱ्यावर आहेत. यावेळी छगन भुजबळ म्हणाले, राज्यामध्ये ओबीसींच्या 55 ते 56 हजार जागा असून ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत, केंद्र सरकारने इंपेरिकल डेटा देण्यास नकार दिला आहे त्यासाठी आमची सातत्याने लढा सुरू राहील. 50 टक्के आरक्षण संविधानामध्ये कुठेही म्हटलेले नसून 27 टक्के आरक्षण शाबूत राहावी एवढीच आमची इच्छा आहे. ओबीसींच्या आरक्षणावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द व्हाव्या यासाठी राज्य सरकार कोर्टात जाणार नसल्याची माहिती छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Jalgaon : 'जब भी आएंगे, पुराने अंदाज मे आएंगे', Chhagan Bhujbal यांचं विरोधकांना खास शैलीत उत्तर
ते म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीने एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला तसाच निर्णय संपूर्ण देशात घेण्यात यावा. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र येऊन लढाव्या, असं भुजबळ म्हणाले.
काल जळगाव दौऱ्यात काय म्हणाले भुजबळ
काल जळगाव शहरातील ब्रिटिश अधिकारी पोलन याच्या नावे असलेल्या पोलन पेठ परिसराचे महात्मा ज्योतिबा फुले नगर नामांतर सोहळ्याच्या निमित्ताने मंत्री छगन भुजबळ जळगाव दौऱ्यावर होते. नामांतर सोहळ्यात भाषण करतांना भुजबळ यांनी म्हटलं की शहाणपणा केला तर छगन भुजबळ करू अशी काही दिवस म्हण होती, पण लावलेले कोणतेही आरोप सिद्ध करता आले नाहीत. एवढेच काय आरोप सुध्दा न्यायालयात नीट मांडता आले नाहीत. त्यामुळे काहीच न करता न्यायालयात दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं, असं भुजबळ म्हणाले.