JOB Majha : लॉकडाऊनच्या काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे अनेकजण सध्या चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील.  


'ओएनजीसी'मध्ये (ONGC) विविध पदांच्या 313 जागांसाठी भरती निघाली आहे. ती कोणती पदं आहेत आणि त्यासाठी अर्ज कुठे करायचा याची माहिती जाणून घेऊया. 


पहिली पोस्ट – AEE
एकूण जागा – 219


शैक्षणिक पात्रता -60 टक्के गुणांसह  मेकॅनिकल/पेट्रोलियम/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकॉम/E&C/इंस्ट्रुमेंटेशन/ केमिकल/अप्लाइड पेट्रोलियम/ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पदवी किंवा 60 टक्के गुणांसह जियोफिजिक्स/जियोलॉजी/केमिस्ट्री/गणित/पेट्रोलियम टेक्नोलॉजी पदव्युत्तर पदवी.


दुसरी पोस्ट – केमिस्ट
एकूण जागा – 15
शैक्षणिक पात्रता - M.Sc (केमिस्ट्री)


तिसरी पोस्ट - जियोलॉजिस्ट
एकूण जागा - 19
शैक्षणिक पात्रता - जियोलॉजिस्ट पदव्युत्तर पदवी किंवा MSc/M.Tech (जियोलॉजी)


चौथी पोस्ट - जियोफिजिसिस्ट
एकूण जागा – 36
शैक्षणिक पात्रता- जियोफिजिक्स/फिजिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स पदव्युत्तर पदवी. /M.Tech (जियोफिजिकल टेक्नोलॉजी)


पाचवी पोस्ट -मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर
एकूण जागा – 12
शैक्षणिक पात्रता - कोणतीही इंजिनिअरिंग पदवी


सहावी पोस्ट -  ट्रान्सपोर्ट ऑफिसर
एकूण जागा - 7
शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल/ऑटो इंजिनिअरिंग पदवी


सातवी पोस्ट - प्रोग्रामिंग ऑफिसर
एकूण जागा – 5
शैक्षणिक पात्रता - कम्प्युटर/IT इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA किंवा कम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा – 30 वर्षांपर्यंत


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. यासाठी ओएनजीसीच्या अधिकृत वेबसाईट  www.ongcindia.com ला भेट द्या. 


या वेबसाईटवर गेल्यावर career मध्ये recruitment notices वर क्लिक करा. त्यात 2021 मध्ये 22 सप्टेंबरला जाहीर झालेल्या भरतीविषयीच्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. Advertisement for in English or Hindi वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑक्टोबर 2021


 



संबंधित बातम्या :