Jitendra Awhad on Ajit Pawar : सुप्रीम कोर्टानं घेतलेली भूमिका आणि निर्णय देताना पाकिस्तानशी तुलना केली, इतकं महाराष्ट्राचं राजकारण खराब झालं असल्याची सडकून टीका विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर केली. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सुप्रीम कोर्टानं आम्हाला पक्षाचं नाव वापरायला परवानगी दिली आहे. खरं तर कोर्ट आठ दिवस मुदत देते, पण कोर्टाला वाटलं यात लोकशाहीला काही घातक आहे. त्यामुळे आम्हाला आशा निर्माण झाली आहे. कोर्ट काहीतरी चांगला निर्णय घेईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 


अजित पवारांनी घेतलेली भूमिका थेट पाकिस्तानसारखी, असं कोर्टाचे निरीक्षण


अजित पवार यांनी घेतलेली भुमिका ही थेट पाकिस्तानसारखी अस कोर्टाचे निरीक्षण आहे. धृतराष्ट्राला संजय नावाचा किमान एक सल्लागार तरी होता, पण अध्यक्षांना थेट लिहून दिलेला मजकूर येतो. अध्यक्षांची जी ऑर्डर आहे ती भयानक आहे. मला सर्वोच्च न्यायालयाने सुभाष देसाई यांच्याबाबत जे निर्णय दिला आहे, त्याच्याबाहेर जाता येत नाही अस सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने सुभाष देसाई यांच्या केसमध्ये जी निरीक्षण नोंदवली त्याच्याअगदी विरोधात निकाल दिल्याचे आव्हाड म्हणाले. 


सुप्रीम कोर्टाच्या टिपण्या अप्रत्यक्ष पाकिस्तानशी सबंधित होत्या


त्यांनी पुढे सांगितले की, दोन दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टात आमच्या पक्षासंदर्भात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने काही टिपण्या केल्या ज्या अप्रत्यक्ष पाकिस्तानशी सबंधित होत्या. पाकिस्तानसारखं राजकारण केल जातंय का? असं दोन न्यायाधीश म्हणाले. एक महाराष्ट्रीयन म्हणून आणि भारतीय म्हणूनही याची मला लाज वाटत असल्याचे ते म्हणाले. 


सरन्यायाधीश यांनी घेतलेली भूमिका लोकशाहीला जिवंत ठेवणारी


कोर्टाने सात दिवसांच्या आत चिन्ह द्यायला सांगितल आहे. सर्वोच्च न्यायालयाची एक प्रथा आहे ती म्हणजे कुठलीही याचिका आली की नोटीस काढली जाते. मात्र, आमच्या प्रकरणात नोटीस न काढता आम्हाला नावासंदर्भात अंतरिम देण्यात आला आहे. चंडीगडच्या बाबतीतही सरन्यायाधीश यांनी घेलेली भूमिका लोकशाहीला जिवंत ठेवणारी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी स्वतः मत मोजली आणि निकाल दिला. 


इतर महत्वाच्या बातम्या