Ajay Maharaj Baraskar vs Manoj Jarange : एकीकडे राज्य सरकारने मराठा आरक्षण जाहीर केल्यानंतर दुसरीकडे मराठा संघटनेत फुट पडल्याचं दिसून येतंय. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे सोबती अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांनी जरांगे यांच्यावर अनेक आरोप करत टीका केलीय. जरांगे यांनी संत तुकाराम महाराजांचा अपमान केला असा आरोप त्यांनी केला. तसेच मी पाणी पाजायला गेलो असताना त्यांनी संत-फिंतगेले खड्ड्यात असं वक्तव्य केलं असंही त्यांनी सांगितल. 


मनोज जरांगे हे हेकेखोर असल्याचा आरोप अजय महाराज बारसकर यांनी केला. मी जरांगेंच्या प्रत्येक कृतीला साक्षी आहे , मी प्रसिद्धीसाठी किंवा पैशासाठी काही करतोय मात्र बिलकुल नाही, मी कीर्तन करण्याचेही पैसे घेत नाही असं सांगत अनेक दिवसांपासून आपल्या मनात खदखद असल्याचं त्यांनी सांगितलं. 


मी मोठा होईन म्हणून माझ्या हातचे पाणी नाकारले


अजय महाराज बारसकर म्हणाले की, "माझं काम हे सत्य सांगणं आहे. जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला, तो मी सहन करणार नाही. जरांगे यांना लोकं पाणी प्या म्हणत होते, तेव्हा मी त्यांना पाणी पाजायला गेलो. मात्र तेव्हा त्यांना वाटलं माझ्या हातून पाणी प्यायल्याने, मी मोठा होईन. म्हणून त्यांनी ते पाणी प्यायले नाहीत. संत फिंत गेले खड्यात असं ते म्हणाले. तिथून माझा वाद सुरु झाला."


काय म्हणाले अजय महाराज बारसकर?


मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे. मधल्या काळात अंतरवालीत घटना घडली आणि मी आंदोलन लढ्यात पुन्हा सहभागी झालो. मराठवाड्यात ओबीसी नोंदींसाठी मी देखील अनेक वर्षांपासून काम करतोय. त्यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत कृतीत सहभागी झालो. मी यापूर्वी कधीच माध्यमासमोर आलो नाही. मी जरांगे यांना पाटील म्हणणार नाही. कारण जरांगेकडे पाटील पदासाठी काही नाही. तो हेकेखोर आहे, कोणत्याही शब्दावर अडून राहायचा. आमचा समाज खूप भोळा आहे. 


जरांगेंच्या अनेकांशी गुप्त मीटिंग


23 डिसेंबरला गुप्त मिटिंग काहींसोबत यांनी केली. मी साक्षी आहे. रांजन गाव गणपती येथे उच्च पदस्थ अधिकारी यांच्यासोबत गुप्त मीटिंग केली. लोणावळा, वाशी  येथे ही समाजाला वगळून मीटिंग केली. वाशी आंदोलन इथंवर मी आंदोलक म्हणून सहभागी होतो, मात्र त्यांच्या मीटिंगमुळे मला आक्षेप होता. जरांगेला काडीची अक्कल नाही. पंधरा मिनिटात शासन निर्णय आणि अधिसूचना द्या म्हणे. अर्धवट ज्ञान बेक्कार असतं म्हणतो पण स्वतःचं काय. सगळ्या अधिकारी यांच्यासोबत हा मिटिंग घेत होता.


ही बातमी वाचा: