एक्स्प्लोर

..तर ती शिवसेनेची आत्महत्या ठरेल : जयंत पाटील

मुंबई:  भाजपने काँग्रेस,राष्ट्रवादीसोबत शिवसेनेला खाण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे हे तिन्ही पक्ष एकत्रित येण्याच्या मनस्थितीत आहेत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते. भाजपविरोधात येत्या अधिवेशनात विरोधक अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. त्याबाबत जयंत पाटलांना विचारलं. पाटील म्हणाले, "विरोधकांनी अविश्वस ठराव सादर केल्यानंतर 14 दिवसांची मुदत दिली जाते, पण शिवसेनेची भूमिका काय आहे? आमची भीती दाखवून शिवसेना भाजपबरोबर बसणार असेल तर आम्ही असं काम करणार नाही. शिवसेनेनं स्पष्ट भूमिका घेतली तर याला अर्थ आहे. जर शिवसेना संदिग्ध भूमिका घेत असेल आणि केवळ भाजपला राष्ट्रवादी, काँग्रेसची भीती दाखवत असेल तर ती शिवसेनेची आत्महत्या असेल" शिवसेना भाजपसोबत गेली तर मुंबई आणि महाराष्ट्रासाठी चांगलं असणार नाही. बाळासाहेब असते तर सध्याचं चित्र वेगळं असतं. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसारखी भूमिका घेणे ही सर्व शिवसैनिकांची अपेक्षा आहे. शिवसैनिकांवर विश्वस असेल तर भाजपशी फारकत घेण्याची वेळ आली आहे, असंही जयंत पाटील यांनी नमूद केलं. शिवसेनेनं भाजपसोबत जाण्यात आता काही राम राहिला नाही. शिवसेनेचं संख्याबळ आहे. काँग्रेस शिवसेनेसोबत जात असेल तर दगडापेक्षा वीट मऊ अशी भूमिका घेतली तर वाईट काय?  असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला. शिवसेनेनं धमक दाखण्याची गरज आहे. आज ताठपणा आणि बाणेदारपणा दाखवला नाही, तर पुढच्या काळात शिवसेना दिसेल असं मला वाटत नाही, असं जयंत पाटील म्हणाले. राष्ट्रवादीची भूमिका पवार घेतील राष्ट्रवादी काँग्रेस अस्वस्थ नाही. आम्ही समविचारी पक्षाची भूमिका सोडली नाही, असा दावाही जयंत पाटील यांनी केला. राष्ट्रवादी भाजपच्या विरोधात पूर्वीपासून आहे. सभागृहात आणि सभागृहाबाहेर आमची भूमिका भाजपविरोधीच असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी निवडणूक झाल्याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे, असं पाटील म्हणाले. मी राजकारणात एवढी वर्ष आहे, पण एवढा पैसे खर्च करणारा पक्ष मी पाहिलेलं नाही, असं म्हणत पाटील यांनी भाजपच्या निवडणूक जाहिरातींवर टीकास्त्र सोडलं. संबंधित बातम्या दिल्लीत पोहोचताच मुख्यमंत्री थेट मोदींच्या घरी महापौरपदासाठी गट स्थापन, शिवसेनेची सावध पावलं  BMC election result : मुंबई महापालिका वॉर्डनिहाय निकाल मुंबईत 30-35 जागांवर शिवसेनेला मनसे फॅक्टर महागात शिवसेनेच्या गळाला चौथा अपक्ष, सेनेला 88 नगरसेवकांचं बळ मुख्यमंत्री दिल्ली दरबारी, शिवसेनेसोबतच्या कोंडीवर चर्चा? शिवसेनेच्या गळाला चौथा अपक्ष, सेनेला 88 नगरसेवकांचं बळ दगाफटक्याची चिंता नाही, महापौर शिवसेनेचाच : अनिल परब शिवसेना-भाजप युतीसाठी मी पुढाकार घेईन: आठवले युती होणार का? आशिष शेलार म्हणतात… राज ठाकरेंच्या ‘सात’ची ‘साथ’ शिवसेनेला की भाजपला? तिसरा अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, संख्याबळ 87 युतीबाबत अजून विचार केलेला नाही, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण महापौरपदासाठी आक्रमक राहा, भाजपच्या दिल्ली मुख्यालयाचा मुंबईत फोन सेना-भाजपला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही : गडकरी ‘सामना’तील लिखाणामुळेच शिवसेना-भाजपमध्ये दरी : गडकरी मुख्यमंत्र्यांनी दूत पाठवले, आमिषं दाखवली, पण मी शिवसैनिक : सुधीर मोरे

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat on Smit Machchhar: हिंदू म्हणजे संपूर्ण जगावर प्रेम करणारा, कॅप्टन स्मित यांनी जे केलं तो हिंदू स्वभाव; भारतीय कॅप्टन मच्छारांच्या धाडसाचं सरसंघचालक मोहन भगवतांकडून कौतुक
हिंदू म्हणजे संपूर्ण जगावर प्रेम करणारा, कॅप्टन स्मित यांनी जे केलं तो हिंदू स्वभाव; भारतीय कॅप्टन मच्छारांच्या धाडसाचं मोहन भगवतांकडून कौतुक, म्हणाले...
Pratap Sarnaik On Eknath Shinde: आम्ही संख्याबळ वाढवणार, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणार; दसरा मेळाव्याआधी प्रताप सरनाईकांचा फटाका
आम्ही संख्याबळ वाढवणार, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणार; दसरा मेळाव्याआधी प्रताप सरनाईकांचा फटाका
Maharashtra Live News Updates: मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचे मेळावे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आव्वाज, तर गोरेगावातील नेस्कोमधून एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार
मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचे मेळावे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आव्वाज, तर गोरेगावातील नेस्कोमधून एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार
भगवान गडावर मुंडे समर्थकांची मांदियाळी, नारायणगडावर मराठा बांधवांचा जनसागर; बीडमध्ये दसरा मेळाव्यांची चर्चा!
भगवान गडावर मुंडे समर्थकांची मांदियाळी, नारायणगडावर मराठा बांधवांचा जनसागर; बीडमध्ये दसरा मेळाव्यांची चर्चा!

व्हिडीओ

Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohan Bhagwat on Smit Machchhar: हिंदू म्हणजे संपूर्ण जगावर प्रेम करणारा, कॅप्टन स्मित यांनी जे केलं तो हिंदू स्वभाव; भारतीय कॅप्टन मच्छारांच्या धाडसाचं सरसंघचालक मोहन भगवतांकडून कौतुक
हिंदू म्हणजे संपूर्ण जगावर प्रेम करणारा, कॅप्टन स्मित यांनी जे केलं तो हिंदू स्वभाव; भारतीय कॅप्टन मच्छारांच्या धाडसाचं मोहन भगवतांकडून कौतुक, म्हणाले...
Gokul Election Result 2026: गोकुळच्या निवडणुकीत बलाढ्य महायुती अन् हसन मुश्रीफांचं गणित कुठे चुकलं, सतेज पाटील काय म्हणाले?
गोकुळच्या निवडणुकीत बलाढ्य महायुती अन् हसन मुश्रीफांचं गणित कुठे चुकलं, सतेज पाटील काय म्हणाले?
Mohan Bhagwat: 'आंदोलनानं समस्या सुटणं सोपं नाही, काही अतिमहत्वकांक्षी लोक समाजविघातकांना पाठिंबा देतायत'; विजयादशमी सोहळ्यातून मोहन भागवतांचं मोठं विधान, रिजीम चेंजवरही भाष्य
'आंदोलनानं समस्या सुटणं सोपं नाही, काही अतिमहत्वकांक्षी लोक समाजविघातकांना पाठिंबा देतायत'; नागपुरातील विजयादशमी सोहळ्यातून मोहन भागवतांचं मोठं विधान, रिजीम चेंजवरही भाष्य
Gokul Election Result 2026: जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
Atharva Sudame Shares Apologizing Video For Kushal Badrike Allgeations: 'मी कलाकारांना घरी बोलावलं आणि...'; कुशल बद्रिकेनं चिडून केलेल्या आरोपांनंतर, अथर्व सुदामेकडून थेट उत्तर, नेमकं घडलं काय? VIDEO
'मी कलाकारांना घरी बोलावलं आणि...'; कुशल बद्रिकेनं चिडून केलेल्या आरोपांनंतर, अथर्व सुदामेकडून थेट उत्तर, नेमकं घडलं काय? VIDEO
RSS Vijayadashami 2026: 'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
Farmers Death Maharashtra: कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
Uday Samant on Gokul Election Result 2026: जेव्हा सत्तेचा अहंकार निर्माण होतो तेव्हा गोकुळ होतं, उदय सामंतांचा जयकुमार गोरेंना टोला
जेव्हा सत्तेचा अहंकार निर्माण होतो तेव्हा गोकुळ होतं, उदय सामंतांचा जयकुमार गोरेंना टोला
Embed widget