एक्स्प्लोर

आरक्षण मिळाल्याशिवाय माझ्या लेकरांचं तोंड पाहणार नाही; जरांगे पाटलांनी स्पष्ट केली भूमिका

आपल्याला एकत्र येऊन लढा द्यावा लागणार असल्याचे जरांगे म्हणाले. तसेच आपली ताकद असल्याने सरकार आपल्या पुढे झुकलंय असेही जरांगे म्हणाले. 

अंतरवाली सराटी (जालना) : मुंबईत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारला आम्ही 40 वर्षे दिले. आता ते एक महिना मागत आहे. पण त्यांना वेळ कशासाठी हवी आहे. पण जोपर्यंत मराठा समाजातील प्रत्येकाची हातात आरक्षण पडत नाही, तसे पत्र माझ्या हातात येत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे जरांगे म्हणाले आहे. आरक्षण मिळेपर्यंत घरी जाणार नाही, उपोषणाच्या ठिकाणाहून उठणार नाही. आरक्षण मिळाल्याशिवाय माझ्या लेकरांचं तोंड पाहणार नाही. सरकार वेळ मागत आहे, पण त्यांना वेळ दिल्यावरही उपोषण मागे घेणार नाही, असे जरांगे म्हणाले आहेत. त्यामुळे सरकारने पाठवलेलं शिष्टमंडळ पुन्हा एकदा अपयशी ठरलं आहे. 

मराठा आरक्षण आणि जालना येथील अंतरवाली सराटी गावात सुरु असलेया मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सोमवारी सर्वपक्षीय बैठक झाली. दरम्यान, या बैठकीचा मसुदा मंत्री संदिपान भुमरे आणि अर्जुन खोतकर यांनी जरांगे यांच्याकडे दिला आहे. त्यानंतर जरांगे आपली भूमिका स्पष्ट करणार होते. त्यानुसार त्यांनी गावकऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'सर्वपक्षीय बैठकीत सरकराने दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची घोषणा केली आहे. तसेच गावकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली आहे. पण आरक्षणाचं काय?, कालच्या बैठकीत सरकारनं आरक्षणावर कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे सरसकट आरक्षणाचा पत्र जेव्हापर्यंत माझ्या हातात आणि शेवटच्या मराठाच्या हातात पडत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केली आहे.

फक्त घोषणा दिल्याने आपल्याला आरक्षण मिळणार नाही. आपल्यात फक्त एकविचार असला पाहिजे. आपल्याला अभ्यास करून आरक्षण मिळवायचे आहे. मागील दोन दिवसांपासून पाणी आणि उपचार बंद केले होते. पण आपल्या समजाच म्हणणं आहे की, आम्हाला आरक्षण आणि तुम्ही पण हवे आहेत. त्यामुळे रात्री उपचार घेतले. मी समजासाठी जीवाची बाजी लावणार असल्याचे जरांगे म्हणाले. 

सरकारला दिला एक महिन्याचा वेळ...

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकार एक महिन्याचा वेळ मागत आहे. त्यामुळे सरकारला एक महिन्याचा वेळ देण्यात येत आहे. या एक महिन्यात त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा आदेश काढावा. मात्र, सरकारला वेळ दिला असला तरीही, उपोषण कायम सुरु राहणार आहे. आमरण उपोषण सोडून साखळी उपोषण करण्याची मागणी देखील सरकार करत असेल तर, एक महिन्यासाठी तसा निर्णय घेऊ. मात्र, आरक्षण मिळाल्या शिवाय उपोषण मागे घेणार नसून, मी येथून उठणार नसल्याचे जरांगे म्हणाले आहेत. 

संबंधित बातम्या: 

Maratha Reservation  : एक महिन्याचा वेळ देतो, त्यानंतर एकाही मंत्र्याला महाराष्ट्राच्या सीमेवर फिरकू देणार नाही; मनोज जरांगे आक्रमक

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Babanrao Taywade : राज्यातील ओबीसी विद्यार्थी मोठ्या अडचणीत, 72 वसतीगृहांची प्रवेशप्रक्रिया रखडली, बबनराव तायवाडे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार
राज्यातील ओबीसी विद्यार्थी मोठ्या अडचणीत, 72 वसतीगृहांची प्रवेशप्रक्रिया रखडली, बबनराव तायवाडे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात मोठ्या बदलांची शक्यता, एकाचवेळी महानगरपालिकेच्या 23 नगरसेवकांचं पद जाणार? भाजपच्या 7 नगरसेवकांवर टांगती तलवार
छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात मोठ्या बदलांची शक्यता, एकाचवेळी महानगरपालिकेच्या 23 नगरसेवकांचं पद जाणार? भाजपच्या 7 नगरसेवकांवर टांगती तलवार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Embed widget