एक्स्प्लोर
जालन्यात तरुणाची हत्या करुन भर रस्त्यात मृतदेह जाळला
मृतदेहाशेजारी मिळालेल्या आधार कार्डमुळे तरुणाची ओळख पटली आहे. अनंत इंगोले हा मृत तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील आहे.
जालना : जालना जिल्ह्यात एका तरुणाची हत्या करुन भर रस्त्यावर त्याचा मृतदेह जाळल्याची घटना घडली आहे. अनंत इंगोले असं मृत तरुणाचं नाव असून तो 27 वर्षांचा होता.
अंबड रोडवर कुरण फाटा इथे रविवारी रात्री एक ते अडीचच्या सुमारास ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनवरुन, पोलिसांनी आज पहाटे घटनास्थळाचा पंचनामा केला.
मृतदेहाशेजारी मिळालेल्या आधार कार्डमुळे तरुणाची ओळख पटली आहे. अनंत इंगोले हा मृत तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील आहे.
अज्ञातांनी अनंत इंगोलेची हत्या करुन त्याचा मृतदेह रस्त्याच्या मधोमध टाकून तो रॉकेलने जाळला. त्याच्या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement