एक्स्प्लोर
VIDEO : विजेच्या तारांना स्पर्श, कापसाने भरलेला ट्रक पेटून उलटला
जळगावात कापसाने भरलेला ट्रक जात असताना त्याचा विजेच्या तारांना स्पर्श झाला आणि ट्रकला भीषण आग लागली.
जळगाव : जळगावात विजेच्या तारांना स्पर्श केल्यामुळे कापसाने भरलेला ट्रक पेटल्याची घटना घडली आहे. आग लागल्यानंतर ट्रक रस्त्यातच उलटला. ही घटना कॅमेरात कैद झाली आहे.
जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील अक्कुलखेडा-हिंगोणा रस्त्यावर हा प्रकार घडला. कापसाने भरलेला ट्रक जात असताना त्याचा विजेच्या तारांना स्पर्श झाला आणि ट्रकला भीषण आग लागली. आगीत ट्रक आणि सहा लाख रुपयांचा कापूस जळून खाक झाल्याची माहिती आहे.
आगीची घटना शेतशिवार परिसरात घडल्यामुळे अग्निशमन दलाचे बंब पोहचण्यापूर्वीच ट्रक जळून खाक झाला. आगीनंतर ट्रक रस्त्यातच उलटला.
अक्कुलखेडा गावातील शेतकरी युवराज चौधरी यांच्या शेतातला कापूस विक्रीसाठी नेला जात असताना ही दुर्घटना घडली. यात त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement