एक्स्प्लोर
खिशातच मोबाईल पेटला, वाढत्या तापमानामुळे स्फोटाचा अंदाज
जळगावातील विकार शफुल्ला खान यांच्या पॅंटच्या खिशात एमआय कंपनीच्या मोबाईलचा स्फोट झाला.

जळगाव : खिशातच मोबाईलचा स्फोट होऊन एक जण जखमी झाल्याची घटना जळगावात समोर आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे मोबाईलचा स्फोट झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जळगाव शहरातल्या शनीपेठ भागात काट्याफईलमध्ये राहणारे 42 वर्षीय विकार शफुल्ला खान जखमी झाले आहेत. पॅंटच्या खिशात एमआय कंपनीच्या मोबाईलचा स्फोट झाला. शफुल्ला रविवारी सकाळी 8 वाजता आंघोळ करुन कामानिमित्त घराबाहेर चालले होते. त्यावेळी जिन्यात अचानक त्यांच्या पॅंटमधील मोबाईलचा स्फोट झाला. यामध्ये त्यांचे कपडे आणि मांडी भाजली गेली. शफुल्ला यांच्यावर जळगावमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















