एक्स्प्लोर

26 जानेवारीपासून येरवडा कारागृहात 'जेल-पर्यटन' सुरु होणार : गृहमंत्री

जेल पर्यटनाची सुरुवात 26 जानेवारीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.

नागपूर : येत्या 26 जानेवारीला पुण्यातील येरवडा तुरुंगात 'जेल पर्यटन' सुरु करत आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या उपक्रमाचं उद्घाटन करतील. देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात राज्यात असलेल्या येरवडा आणि इतर तुरुंगांचं खूप महत्व आहे. अनेक ऐतिहासिक घटना इथे घडल्या आहेत. भारतात पहिल्यांदाच जेल पर्यटन हा उपक्रम सुरु केला जात आहे. विद्यार्थी, इतिहास अभ्यासक आणि सामान्य नागरिकांना या उपक्रमात जेलमध्ये जाऊन ऐतिहासिक घटनांची माहिती घेता येईल. पहिल्या टप्प्यात येरवडा तुरुंगातून याची सुरुवात करत आहोत, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.

"शाळा, कॉलेज व शैक्षणिक अस्थापना तसंच नोंदणीकृत अशासकीय संस्थाना ही ऐतिहासिक ठिकाणी पाहता यावीत या दृष्टीकोनातून गृह विभागाद्वारे जेल पर्यटन सुरु करण्यात येत आहे." असंही गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच येरवडा कारागृहापाठोपाठ राज्यातील इतरही कारागृहांमध्ये अशाच प्रकारे पर्यटन सुरु करण्याचा विचार असल्याचं मंत्री अनिल देशमुखांनी सांगितलं आहे.

कारागृहाचा इतिहास कळणार

भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रातील कारागृहांना अनन्य स्थान आहे, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान नेत्यांना ब्रिटीशांनी येरवडा कारागृहात तसेच इतर कारागृहांतही जसे की ठाणे, नाशिक, धुळे व रत्नागिरी येथे कैद करुन ठेवले होते. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, मोतीलाल नेहरु, पंडीत जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू, सुभाषचंद्र बोस या थोर नेत्यांना ब्रिटीशांनी येरवडा कारागृहात कैद करुन ठेवले होते. या थोर नेत्यांच्या कारावासाची ठिकाणे स्मारक म्हणून जतन करण्यात आलेली आहेत व ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी या थोर नेत्यांनी केलेल्या त्यागाचे स्मरण देत राहतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये प्रसिध्द असा पुणे करार झाला तो याच येरवडा कारागृहात गांधी यार्ड असलेल्या आंब्याच्या झाडाखाली झाला. त्या झाडाची सुध्दा योग्य प्रकारे देखभाल करण्यात येत आहे. इ.स. 1899 मध्ये चापेकर बंधूना येरवडा कारागृहातच फाशी देण्यात आली. तसेच जनरल वैद्य यांच्या हत्येप्रकरणी कुप्रसिध्द जिंदा व सुखा यांना सुध्दा येरवडा कारागृहातील वधस्तंभावर फाशी देण्यात आली आहे. 26/11च्या मुंबई हल्ल्यातील कुप्रसिध्द अतिरेकी अजमल कसाबला सुध्दा याच कारागृहात फाशी देण्यात आली. शाळा/कॉलेज/विद्यापीठ व शैक्षणिक आस्थापना तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थाना ही ऐतिहासिक ठिकाणे पाहता यावीत या दृष्टीकोनातून गृह विभाग याद्वारे प्रथमतःच 'जेल पर्यटन' सुरु करीत आहे. यामुळे विद्यार्थी आणि शैक्षणिक आस्थापना, अशासकीय संस्थाच्या प्रतिनिधींना भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आणि येरवडा कारागृहात घडलेल्या इतर ऐतिहासिक घटना पाहता व अनुभवता येतील. या ठिकाणी उल्लेख करणे प्रसंगोचित आहे की, कारागृहे ही समाजातील लोकांच्या प्रवेशासाठी मनाई असलेला भाग आहे. पुरेशी खबरदारी घेणार! हा पर्यटन उपक्रम राबविताना सुरक्षेचे उल्लंघन होणार नाही, तसेच अनिष्ट घटकांना प्रवेश मिळणार नाही याची कारागृह प्रशासन योग्य ती काळजी घेईल. तसेच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर पुरेशी दक्षता घेतली जाईल. पर्यटकांना माहिती देण्यासाठी पर्यटन गाईड पुरविला जाईल. दररोज भेट देण्याच्या पर्यटकांची संख्या 50 पेक्षा जास्त असणार नाही. येरवडा कारागृहास पर्यटक म्हणुन भेट देणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी त्यांच्या संस्थेच्या लेटरहेडवर अर्ज करताना पर्यटक म्हणुन भेट देणाऱ्या व्यक्तींची नावे व मुलभुत तपशील याचा उल्लेख करणे आवश्यक राहिल. अधीक्षक येरवडा कारागृह यांच्या yerwadacpmh@gov.in किंवा spycppune@gmail.com या मेलवर अथवा प्रत्यक्षपणे कारागृह येथे किमान सात दिवस अगोदर अर्ज करावा लागेल. पर्यटक म्हणुन भेट देणाऱ्या व्यक्तींनी पुढील नमुद केलेले जसे की,आधार कार्ड, संस्थेचे ओळखपत्र किंवा पासपोर्ट यापैकी कोणताही दस्तऐवज सादर करुन ओळख सिद्ध करणे अपेक्षित आहे. कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ, बॅगेज, मोबाईल फोन, कॅमेरा, पाण्याची बाटली किंवा कोणतीही वस्तु कारागृहाच्या आतमध्ये नेता येणार नाही, याची नोंद घ्यावी. कारागृह प्रशासनाने फोटोग्राफी तसेच व्हीडीओग्राफीची व्यवस्था केलेली असुन ते कारागृहातुन बाहेर पडल्यानंतर पुरविण्यात येईल. तथापि, कारागृह विभागाला अनिष्ट व्यक्तीस प्रवेश नाकारण्याचा अधिकार असेल. तसेच ही योजना लवकरच महाराष्ट्रातील इतर कारागृहातही राबविण्यात येईल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

पाहा व्हिडीओ : 26 जानेवारीपासून पुण्यातील येरवडा कारागृहात 'जेल पर्यटन' सुरु करणार : अनिल देशमुख

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Latur Mahanagarpalika Eknath Shinde Shivsena: तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; एकनाथ शिंदेंची लातूरमध्ये मोठी खेळी, भाजप-काँग्रेसला शह!
तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; एकनाथ शिंदेंची लातूरमध्ये मोठी खेळी, भाजप-काँग्रेसला शह!
सुप्रीम कोर्टात उमर खालिद, शरजील इमामला जामीन नाकारला, JNU मध्ये मोदी शाहांविरुद्ध नारेबाजी, एफआयआर दाखल; विद्यार्थ्यांची ओळख पटली
सुप्रीम कोर्टात उमर खालिद, शरजील इमामला जामीन नाकारला, JNU मध्ये मोदी शाहांविरुद्ध नारेबाजी, एफआयआर दाखल; विद्यार्थ्यांची ओळख पटली
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Mahanagarpalika Eknath Shinde Shivsena: तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; एकनाथ शिंदेंची लातूरमध्ये मोठी खेळी, भाजप-काँग्रेसला शह!
तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; एकनाथ शिंदेंची लातूरमध्ये मोठी खेळी, भाजप-काँग्रेसला शह!
सुप्रीम कोर्टात उमर खालिद, शरजील इमामला जामीन नाकारला, JNU मध्ये मोदी शाहांविरुद्ध नारेबाजी, एफआयआर दाखल; विद्यार्थ्यांची ओळख पटली
सुप्रीम कोर्टात उमर खालिद, शरजील इमामला जामीन नाकारला, JNU मध्ये मोदी शाहांविरुद्ध नारेबाजी, एफआयआर दाखल; विद्यार्थ्यांची ओळख पटली
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Pune Crime : पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Embed widget