एक्स्प्लोर

ओबीसी आरक्षणाची श्वेतपत्रिका काढा : बाळासाहेब सराटे

मुंबईत बुधवारी (21 नोव्हेंबर) मराठा समाजाने आयोजित केलेल्या मंथन परिषदेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या परिषदेला बाळासाहेब सराटे यांच्यासह चंद्रकांत पाटील, राजन घाग, आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते.

मुंबई : आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभरातील मराठा आणि ओबीसी नेते आमनेसामने आले आहेत. सध्याच्या ओबीसी आरक्षणाच्या टक्केवारीची श्वेतपत्रिका सरकारने काढावी, अशी मागणी मराठा समाजाच्या प्रश्नाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी केली आहे. मुंबईत बुधवारी (21 नोव्हेंबर) मराठा समाजाने आयोजित केलेल्या मंथन परिषदेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या परिषदेला बाळासाहेब सराटे यांच्यासह चंद्रकांत पाटील, राजन घाग, आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते. ओबीसींचे आरक्षण 1994 मध्ये काढलेल्या जीआरमध्ये 14 टक्के होते. नंतर ते थेट 30 टक्क्यांवर नेण्यात आले. त्यामुळे वाढीव 16 टक्क्यांचं आरक्षण हे अनधिकृतरित्या वाढवल्याचा दावा मराठा समाजाच्या मंथन परिषदेत केला आहे. काय म्हणाले बाळासाहेब सराटे? "एका साधारण जीआरवरुन 23 मार्च 1994 रोजी ओबीसी प्रवर्गाचे 16 टक्के आरक्षण एकाकी वाढवण्यात आले होते. त्याबद्दलची श्वेतपत्रिका काढून विधानसभा आणि जनतेसमोर माडंण्यात यावी. त्यानंतरच मराठा आरक्षणाबद्दलचा जो कळवळा आहे, तो व्यक्त करावा," असं वक्तव्य मराठा समाजाच्या प्रश्नाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी केलं आहे. '...तर सर्व समाजाच्या आरक्षणाची श्वेतपत्रिका काढा' "आमची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. ओबीसींची जनगणना करा. देशात आणि महाराष्ट्रात किती ओबीसी आहेत हे सगळ्यांसमोर आलं पाहिजे. एकदा जातीनिहाय जनगणना करा, त्यामध्ये, एससी, एसटी, मराठा आणि ओबीसींची पण करा. श्वेतपत्रिका काढायची असेल तर सगळ्यांचीच काढा, फक्त ओबीसींचीच कशाला? आमचा काहीच विरोध नाही. उलट जनगणना करा म्हणजे दूध का दूध और पानी का पानी होऊन जाईल एकदाचं आणि ते होणं आवश्यक आहे," अशी मागणी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. एकूणच आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आणि ओबासी समाजाच्या नेत्यांमध्ये वाद पेटताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Amravati News: शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल, दिवाळीच्या आत खात्यात पैसे येणार; आमदार रवी राणा अन् आमदार प्रवीण तायडे यांचा बळीराजाला शब्द
शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल, दिवाळीच्या आत खात्यात पैसे येणार; आमदार रवी राणा अन् आमदार प्रवीण तायडे यांचा बळीराजाला शब्द
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
Naxal News: मुंबईसह राज्यातील शाळा अन् महाविद्यालयातून नक्षलवादी चळवळींचं जाळं; आत्मसर्पित नक्षली कमांडरचं स्फोटक कबूलनामा, म्हणाला..
मुंबईसह राज्यातील शाळा अन् महाविद्यालयातून नक्षलवादी चळवळींचं जाळं; आत्मसर्पित नक्षली कमांडरचं स्फोटक कबूलनामा, म्हणाला..
Nashik News: वडिलांना पोहताना पाहिलं, मुलगाही पाण्यात उतरला, दोघेही प्रवाहात वाहून गेले अन्...; नाशिकमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना
वडिलांना पोहताना पाहिलं, मुलगाही पाण्यात उतरला, दोघेही प्रवाहात वाहून गेले अन्...; नाशिकमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना

व्हिडीओ

Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
Pune Ganesh Visarjan 2026 : दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल
दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल
Ashutosh Ranka: आसाममध्ये आशुतोष रांकांसह सीजेपीचे अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अभिजीत दीपके हिमंता सरकारवर संतापले
आसाममध्ये आशुतोष रांकांसह सीजेपीचे अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अभिजीत दीपके हिमंता सरकारवर संतापले
Pune Ganesh Visarjan 2026 : पुणे गणेश विसर्जन मिरवणूक 33 तास 33 मिनिटांनंतर संपन्न; गतवर्षाच्या तुलनेत सव्वातास आधीच सांगता, गणपतीचे विसर्जन दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत चाललं
पुणे गणेश विसर्जन मिरवणूक 33 तास 33 मिनिटांनंतर संपन्न; गतवर्षाच्या तुलनेत सव्वातास आधीच सांगता, गणपतीचे विसर्जन दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत चाललं
महाराष्ट्रात SIR मधून देशातील सर्वाधिक मतदारांच्या नावावर फुली, तरी सुद्धा ठाकरे बंधूंच्या निवडणूक आयोगविरोधातील विराट मोर्चासाठी महाविकास आघाडीत एकमत नाही? कोण काय म्हणाले??
महाराष्ट्रात SIR मधून देशातील सर्वाधिक मतदारांच्या नावावर फुली, तरी सुद्धा ठाकरे बंधूंच्या निवडणूक आयोगविरोधातील विराट मोर्चासाठी महाविकास आघाडीत एकमत नाही? कोण काय म्हणाले??
Devendra Fadnavis on EVM :
"ते व्होट चोरी म्हणतात, पण त्यांचा मेंदूच चोरीला गेलाय!"; ईव्हीएम ते निवडणूक आयोग, फडणवीसांचा विरोधकांना टोला, नेमकं काय म्हणाले?
SIR विरोधात देशव्यापी रान उठलं, गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत ज्ञानेश कुमारांविरोधात संतापाचा उद्रेक अन् निवडणूक आयोगाच्या एकाच बैठकीत 9 निर्णय! किती परिणाम होणार?
SIR विरोधात देशव्यापी रान उठलं, गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत ज्ञानेश कुमारांविरोधात संतापाचा उद्रेक अन् निवडणूक आयोगाच्या एकाच बैठकीत 9 निर्णय! किती परिणाम होणार?
Embed widget