Women's Day 2021 LIVE Updates: महिला आयोगाची कार्यालये आता विविध जिल्ह्यात, महिला दिनी सहा विभागस्तरीय कार्यालये कार्यान्वित

International Womens Day 2021 LIVE Updates: महिलांनाही समाजात समान हक्क मिळावेत यासाठी झालेल्या संघर्षालाही या दिवशी सलाम करण्यात येतो. जगभरात या दिवसाच्या निमित्तानं बहुविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. पण, यंदा मात्र इतर सर्वच कार्यक्रमांप्रमाणं महिला दिनावरही कोरोनाचं सावट असणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Mar 2021 07:07 PM
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची सहा विभागस्तरीय कार्यालये जागतिक महिला दिनाच्या दिवशी कार्यान्वित झाली आहेत. आतापर्यंत राज्यभरातील महिलेला न्याय मिळवण्यासाठी मुंबईत येऊन महिला आयोगाकडे तक्रार करावी लागत होती. मात्र अत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी यासाठी राज्य महिला आयोगाची कार्यालये सर्व विभागीय आयुक्तालय मुख्यालयांच्या ठिकाणी सुरु होतील. पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि कोकण विभागस्तरावर ही कार्यालये महिलादिनी कार्यान्वित करण्यात आली. मुलुंड येथील विभागीय उपयुक्त कार्यालयात पहिल्या विभागीय कार्यालयाचा उद्घाटन महाराष्ट्र राज्य महिला आयोग सदस्य सचिव अनिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं.
राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. आज महिला दिनाच्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी पाच विशेष लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्याठिकाणी फक्त महिलांसाठी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यात अशी एकूण 189 महिला विशेष केंद्र सुरू असून त्यातील सर्वाधिक 19 केंद्र ही ठाणे जिल्ह्यात आहेत.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा...
महिला दिनानिमित्त सुदर्शन पटनाईक यांचं वाळू शिल्प
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा

पार्श्वभूमी

International Womens Day 2021 महिला दिन साजरा करण्यासाठी कोणा एका दिवसाची आवश्यकता नाही. कारण, दरदिवशी महिलांचं महत्त्वं हे कायम तितकंच असतं. पण, हे जग एक उत्तम स्थान बनवण्यासाठी महिलांचं योगदान पाहता याच योगदानाप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक स्तरावर 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रत्येकाच्याच जीवनात असणाऱ्या महिलांच्या योगदानाला आणि स्त्रीत्वाला साजरा करण्याच्या अनुशंगानं या दिवसाचं महत्त्वं अधिक आहे. स्त्रीशक्ती आणि त्यांच्या कर्तृत्त्वाची प्रशंसा या दिवशी आवर्जून केली जाते.

Women's Day 2021 Gifts Idea: महिला दिनी आपल्या आई, बहिण आणि मैत्रीणीला 'ही' विशेष भेट द्या

महिलांनाही समाजात समान हक्क मिळावेत यासाठी झालेल्या संघर्षालाही या दिवशी सलाम करण्यात येतो. जगभरात या दिवसाच्या निमित्तानं बहुविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. पण, यंदा मात्र इतर सर्वच कार्यक्रमांप्रमाणं महिला दिनावरही कोरोनाचं सावट असणार आहे.

काय आहे महिला दिनाचा इतिहास?

International Women's Day (IWD) जागतिक महिला दिन हा 1900 च्या काळापासून प्रकाशझोतात आला. ज्यावेळी महिलांच्या सामाजिक अस्तित्त्वाबाबत बदलांचे वारे वाहू लागले होते. 1908 मध्ये 15000 महिलांनी कामाचे कमी तास, चांगलं वेतन आणि मतदानाच्या हक्कांसाठी न्यू यॉर्क शहराच्या दिशेनं कूच केली होती. ही पहिली महिला चळवळ ठरली. काही महिन्यांच्या आंदोलनानंतर पहिला राष्ट्रीय महिला दिवस युनायटेड स्टेट्स येथे 28 फेब्रुवारी या दिवशी पाळला गेला.

PICS | लग्नसराईमध्ये फॉलो करा जान्हवी कपूरचे 'हे' ट्रेंडी लूक

International Women’s Day 2021 ची थीम

कोविड 19 नं लढणाऱ्या विश्वात महिला नेतृत्त्वाला अधोरेखित करण्याचा यंदाच्या जागतिक महिला दिनाचा मुख्य हेतू असणार आहे. कोरोनाच्या संकटांतून सावरणाऱ्या कित्येक राष्ट्रांमध्ये महिलांच्या निर्णय़ांचीही महत्त्वाची भूमिका असून, यामध्ये त्यांचा मोलाचा हातभार लागणार असल्याची बाब यंदाच्या महिला दिनाच्या निमित्तानं जगापुढं मांडली जाणार आहे.

महिला दिनी ठराविक रंगांचं महत्त्वं

महिला दिनाच्या दिवशी काही महत्त्वाच्या रंगांनाही विशेष प्राधान्य दिलं जातं. यामध्ये जांभळा, हिरवा आणि पांढरा अशा रंगांचा समावेश आहे. जांभळा रंग न्याय आणि प्रतिष्ठा अधोरेखित करतो, हिरवा रंग आशेसाठी तर पांढरा रंग शुद्धतेच्या प्रतीकासाठी वापरात आणला जातो.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.