एक्स्प्लोर

पिंपरीत भाजपची गटबाजी चव्हाट्यावर, थेट महापौरांकडूनच ‘राजीनामास्त्र’

भाजपमधील या गटबाजीचा फायदा घेण्यासाठी मात्र विरोधक एकवटलेत.

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांनी ‘राजीनामास्त्र’ अवलंबल्याने भाजपची गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. निमित्त होतं स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं. तर या गटबाजीचा फायदा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकवटली आहे. शहराध्यक्ष आणि लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक सीमा सावळे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर स्थायीचं अध्यक्षपद आमदार महेश लांडगे गटाला मिळणं अपेक्षित होतं. मात्र इच्छुकांची गर्दी पाहता पक्षश्रेष्ठींनी जगताप गटाच्या ममता गायकवाड यांच्याकडे स्थायीच्या चाव्या सोपवल्या. यामुळेच नाराज लांडगे समर्थक महापौर नितीन काळजे यांनी शहराध्यक्ष जगतापांकडे तर स्थायीच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक राहुल जाधव आणि शीतल शिंदे यांनी स्थायीच्या सदस्यपदाचे सभागृह नेत्यांकडे राजीनामे सोपवले. खरंतर महापौरपदाचा राजीनामा आयुक्तांकडे देणं अपेक्षित असतं. मात्र हे दबावतंत्रासाठी राजीनामास्त्र वापरल्याची चर्चा आहे. याबाबत महापौरांना विचारले असता, शहराध्यक्षांनी त्यांना बोलूच दिलं नाही. पक्षाच्या हितासाठी माझ्यासह सर्वांचे राजीनामे तयार असून, आमच्यासाठी राजीनामे ही दुय्यम आहेत. असं म्हणत जगताप यांनी राजीनामास्त्रावर पडदा टाकला. भाजपमधील या गटबाजीचा फायदा घेण्यासाठी मात्र विरोधक एकवटलेत. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या पाठिंब्यावर मोरेश्वर भोंडवे यांचा स्थायीच्या अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला. सध्या परिस्थिती अनुकूल असल्यानं, अध्यक्ष आमचाच असेल असा दावा राष्ट्रवादीने केला आहे. स्थायी समितीत भाजपचे दहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, शिवसेनेचा एक तर अपक्ष एक असं सध्याचं पक्षीय बलाबल आहे. भाजपच्या दहा सदस्यांमध्ये नाराज आमदार लांडगे गट आणि अध्यक्ष पद डावलण्यात आलेले असे पाच सदस्य आहेत. हे पाच, राष्ट्रवादी चार आणि शिवसेनेचा एक असे मिळून दहा सदस्यांची मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादीकडून घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र सरकार, बिश्नोई गँग आणि केंद्र सरकारचा त्रिकोण; गृहमंत्री झोपलेत का? नाना पटोलेंचा गंभीर आरोप, जयकुमार गोरेंचा अभ्यास कमी असल्याचंही वक्तव्य
महाराष्ट्र सरकार, बिश्नोई गँग आणि केंद्र सरकारचा त्रिकोण; गृहमंत्री झोपलेत का? नाना पटोलेंचा गंभीर आरोप, जयकुमार गोरेंचा अभ्यास कमी असल्याचंही वक्तव्य
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल
जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल
सरकार घेणार मोठा निर्णय! लाडकी बहिण योजनेनंतर आता आणखी एक नवीन योजना येणार, कोणत्या महिला ठरणार पात्र? चंद्रकांत पाटलांनी दिली महत्वाची माहिती
सरकार घेणार मोठा निर्णय! लाडकी बहिण योजनेनंतर आता आणखी एक नवीन योजना येणार, कोणत्या महिला ठरणार पात्र? चंद्रकांत पाटलांनी दिली महत्वाची माहिती

व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, तब्बल 56 वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, नेमकं काय घडलं?
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
South Star Yash On Sai Pallavi In Ramayana: 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
Supriya Sule : पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी फोन, ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
भाजप उमेदवारांना मतदान करा, पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून मतदारांना फोन, सुप्रिया सुळेंकडून ऑडिओ क्लिप शेअर

Embed widget