एक्स्प्लोर

Indrayani River Pollution Alandi : वारकऱ्यांची जीवनदायिनी व्हेंटिलेटरवर; इंद्रायणी नदीत पुन्हा फेसाळ पाणी

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाला काहीच तास उरलेत. तरी वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे. इंद्रायणी नदीत आज पुन्हा फेसाळ पाणी वाहताना दिसत आहे.

Indrayani river pollution alandi : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाला काहीच तास उरलेत. तरी वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरुच आहे. इंद्रायणी नदीत आज पुन्हा फेसाळ पाणी वाहताना दिसत आहे. जे पाणी वारकऱ्यांच्या आरोग्याला धोका ठरत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कानाडोळा याला कारणीभूत ठरत आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील अनेक कंपन्या इंद्रायणी नदीत रसायनयुक्त पाणी सोडतात, परिणामी नदीची (Indrayani River Pollution Alandi) दयनीय अवस्था होते. एबीपी माझाने जानेवारी महिन्यात हा प्रकार समोर आणला होता त्यावेळी सहा कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले होते. मात्र परिस्थिती जैसे थे असल्याने कारवाईचा हा फार्स होता हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. 

इंद्रायणी नदीवर रसायनयुक्त पाण्याचा फेस तयार झाला आहे. रसायनयुक्त पाण्यामुळे नदी प्रचंड प्रमाणात प्रदूषित झाली आहे. नदीची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या सगळ्या अनाधिकृत कंपन्यांवर कारवाई करा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्यावेळी नागरिकांच्या मागणीला यश आलं होतं आणि या कंपन्यांवर कारवाई देखील केली होती. मात्र अजूनही या नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न मिटलेला नाही.

लोणावळा शहरातून या इंद्रायणी नदीचा उगम होतो. त्या दरम्यान पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक क्षेत्र आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत कंपन्या आहेत. या कंपन्यांमधून प्रक्रिया न केलेलं रसायनयुक्त पाणी नदीत सोडलं जातं. त्यामुळे नदीत प्रदूषण पसरत आहे. या प्रदूषणामुळे नदीकाठावर राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

येत्या 11 जूनला आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. त्यामुळे त्या पूर्वी दोन दिवसांपासून लाखो वारकरी आळंदीत दाखल होतात. दोन दिवस लाखो वारकऱ्यांसाठी या नदीचं पाणी तीर्थासमान असतं मात्र याच नदीचं पाणी अतिप्रमाणात प्रदूषित झालं आहे. 

नागरिकांच्या आरोग्याला धोका

लाखो नागरिक यात स्नान करतात. या नदीत रसायनयुक्त पाणी आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची मोठी शक्यता आहे. रसायनामुळे त्वचारोगाच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. शासनाने या नदीकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि या प्रदूषणावर तोडगा काढण्याचीही गरज असल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे. 

संबंधित बातमी -

Pune Indrayani River pollution : Majha Impact! इंद्रायणी नदीत रसायनयुक्त पाणी सोडल्याप्रकरणी सहा कंपनी मालकांवर गुन्हा दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2024 | रविवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2024 | रविवार 
Prakash Abitkar & Hasan Mushrif : प्रकाश आबिटकर कॅबिनेट मंत्री, 'माझा'च्या बातमीवर शिक्कामोर्तब; महायुती सरकारमध्ये हसन मुश्रीफ एकमेव मुस्लीम चेहरा, दादांकडूनही मानाचे पान!
प्रकाश आबिटकर कॅबिनेट मंत्री, 'माझा'च्या बातमीवर शिक्कामोर्तब; महायुती सरकारमध्ये हसन मुश्रीफ एकमेव मुस्लीम चेहरा, दादांकडूनही मानाचे पान!
Maharashtra Cabinet expansion : महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात किती लाडक्या बहिणी? कोणत्या पक्षाच्या किती महिलांनी घेतली शपथ?
महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात किती लाडक्या बहिणी? कोणत्या पक्षाच्या किती महिलांनी घेतली शपथ?
Nagpur Oath Ceremony: महायुतीच्या 39 मंत्र्यांची शपथ, 4 लाडक्या बहिणींना संधी, पुणे, बीडसह अनेक जिल्ह्यात जल्लोष ; A टू Z स्टोरी
महायुतीच्या 39 मंत्र्यांची शपथ, 4 लाडक्या बहिणींना संधी, पुणे, बीडसह अनेक जिल्ह्यात जल्लोष ; A टू Z स्टोरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharatshet Gogawale Oath : 'मी भरतशेठ गोगावले...' म्हणत घेतली मंत्रिपदाची शपथMaharashtra Cabinet Expansion :फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी, कुणा-कुणाला मंत्रिपदाची शपथ?Bhalchandra Nemade Majha Katta| इंग्रजीला धुतलं, राजकारण्यांना झोडपलं,भालचंद्र नेमाडे 'माझा कट्टा'वरSunil Tatkare : संघटनेच्या मजबुतीला प्राधान्य देण्याचं काम पुढील काळात होईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2024 | रविवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2024 | रविवार 
Prakash Abitkar & Hasan Mushrif : प्रकाश आबिटकर कॅबिनेट मंत्री, 'माझा'च्या बातमीवर शिक्कामोर्तब; महायुती सरकारमध्ये हसन मुश्रीफ एकमेव मुस्लीम चेहरा, दादांकडूनही मानाचे पान!
प्रकाश आबिटकर कॅबिनेट मंत्री, 'माझा'च्या बातमीवर शिक्कामोर्तब; महायुती सरकारमध्ये हसन मुश्रीफ एकमेव मुस्लीम चेहरा, दादांकडूनही मानाचे पान!
Maharashtra Cabinet expansion : महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात किती लाडक्या बहिणी? कोणत्या पक्षाच्या किती महिलांनी घेतली शपथ?
महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात किती लाडक्या बहिणी? कोणत्या पक्षाच्या किती महिलांनी घेतली शपथ?
Nagpur Oath Ceremony: महायुतीच्या 39 मंत्र्यांची शपथ, 4 लाडक्या बहिणींना संधी, पुणे, बीडसह अनेक जिल्ह्यात जल्लोष ; A टू Z स्टोरी
महायुतीच्या 39 मंत्र्यांची शपथ, 4 लाडक्या बहिणींना संधी, पुणे, बीडसह अनेक जिल्ह्यात जल्लोष ; A टू Z स्टोरी
Prakash Abitkar : कामगाराचा मुलगा, पंचायत समिती सदस्य, उत्कृष्ठ संसदपटू, राधानगरीत आमदारकीची हॅट्ट्रिक ते कॅबिनेट मंत्री! प्रकाश आबिटकरांचा झंझावाती राजकीय प्रवास
कामगाराचा मुलगा, पंचायत समिती सदस्य, उत्कृष्ठ संसदपटू, राधानगरीत आमदारकीची हॅट्ट्रिक ते कॅबिनेट मंत्री! प्रकाश आबिटकरांचा झंझावाती राजकीय प्रवास
Mahayuti Goverment Minister List : महायुती सरकारमध्ये भाजपत चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीत हसन मुश्रीफ अन् शिवसेनेत गुलाबराव पाटील दुसऱ्या क्रमांकाचे नेते
महायुती सरकारमध्ये भाजपत चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीत हसन मुश्रीफ अन् शिवसेनेत गुलाबराव पाटील दुसऱ्या क्रमांकाचे नेते!
लंडनला शिकले, काँग्रेसमधून पहिल्यांदा आमदार झाले, भाजपचा हिंदूत्ववादी चेहरा, मंत्री नितेश राणेंचा जीवनप्रवास
लंडनला शिकले, काँग्रेसमधून पहिल्यांदा आमदार झाले, भाजपचा हिंदूत्ववादी चेहरा, मंत्री नितेश राणेंचा जीवनप्रवास
Pankaja Munde Profile: वडिलांच्या निधनानंतर जबाबदारी, दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी; पंकजा मुंडेंचं बालपण, शिक्षण अन् नागमोडी राजकीय प्रवास
वडिलांच्या निधनानंतर जबाबदारी, दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी; पंकजा मुंडेंचं बालपण, शिक्षण अन् नागमोडी राजकीय प्रवास
Embed widget