एक्स्प्लोर

इंद्रायणी पूल दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू, 32 जण जखमी, 6 जणांची प्रकृती गंभीर, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती

इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकूण अतिशय दुःख झाले. यामध्ये 2 लोकांचा मृत्यू झाला झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Devendra Fadnavis on Indrayani River Bridge Collapses : इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकूण अतिशय दुःख झाले. यामध्ये 2 लोकांचा मृत्यू झाला झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असे फडणवीस म्हणाले. दरम्यान, या दुर्घटनेत  32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 

काहीजण वाहून गेल्याची भीती आहे. त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. 6 जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?

पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे.  6 जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

नेमकी कशी घडली घटना? 

पूल कोसळल्याची घटना नेमकी कशी घडली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, आमचा 25 ते 30 जणांचा समूह पुलावर होता. एकाच ठिकाणी काही वेळ आम्ही सर्वजण थांबलो होतो. आम्ही पुलावर असतानाच काही कळायच्या आतच पूल कोसळल्याने बरेच जण खाली पडले. त्यातील काही लोक लगेच नदीच्या काठावर आले. परंतु काही लोक पाण्यात पडून बुडाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आहे. वाहून गेलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

आम्ही 25 ते 30 जण पुलावर होतो, काही कळायच्या आतच पूल कोसळला, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
Ganesh Naik : आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
Embed widget