Independence Day 2022 : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव (India Independence Day 2022) साजरा करताना रायगड जिल्ह्यातील उरण येथे अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी नौदलातील निवृत्त दहा माजी मरीन कमांडोजनी सहभाग घेत स्विमिंग पुलमधील 13 फूट खोल पाण्याखाली ध्वजसंचलन आणि ध्वजवंदन केले. कसे ते जाणून घ्या..
13 फूट खोल पाण्याखाली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा
यंदा देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन हा अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. यासाठी देशात आगळ्या वेगळ्या संकल्पना आखत नागरिकांमध्ये देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवण्याची प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून उरण शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रिडा संकुलात पाण्याखाली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी, माजी मरीन कमांडो यांच्या संकल्पनेतून सोहळा साजरा करताना स्विमिंग पुलमधील 13 फूट खोल पाण्याखाली ध्वजसंचलन आणि ध्वजवंदन साजरा करण्यात आला. यावेळी नौदलातील निवृत्त दहा माजी मरीन कमांडो यांनी सहभाग घेतला होता.
नौदलातील निवृत्त दहा कमांडोजची कमाल! "अंडरवॉटर इंडिपेंडेंस डे सेलिब्रेशन"
दरम्यान, यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच रविवारी रात्री बारा वाजून एक मिनिटांनी हा अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी, दहा कमांडोजने सुमारे अर्धा तास पाण्याखाली स्वातंत्र्याचा अमृतोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. उरण शहरात आयोजित हा अनोखा उपक्रम पाहण्यासाठी शेकडो रहिवाशांनी गर्दी केली होती. यावेळी, पाण्याखाली साजरा करण्यात आलेल्या ध्वजसंचलन आणि ध्वजवंदनाच्या माध्यमातून देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये, अनोखे असे "अंडरवॉटर इंडिपेंडेंस डे सेलिब्रेशन" करीत माजी निवृत्त कमांडोजने अविस्मरणीय असा अमृतमहोत्सव साजरा केला आहे.
देशात आज अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन
देशात आज अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येत असून त्यानिमित्ताने देशभरात उत्साह आहे. राज्यातील त्या-त्या राजधानीच्या ठिकाणी संबंधित मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडणार आहे. तर देशाच्या विविध ठिकाणी आज विद्यार्थी आणि तरुणांकडून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच आज दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या