बारामती : बारामती लोकसभा मतदार संघाची (baramati Loksabha Election ) सध्या राज्यात चर्चा सुरु आहे. त्यातच अजित पवारांविरोधात बोलणाऱ्या विजय शिवतारेंची (Vijay Shivtare) मात्र आपली भाषा बदलली आहे आणि सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला दणक्यात सुरुवात केली आहे. अजित पवारांचं मागील काही वर्षांपासून ऐकत आहात त्यामुळे आतादेखील त्यांचंच ऐका, किती दिवस शरद पवारांच्या नावाने मंत मागणार आहात, असा सवाल उपस्थित करत विजय शिवतारेंनी  रोहित पवार आणि सुप्रिया सुळेंना चांगलंच डिवचलं आहे. शरद पवारांचे काम संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आहे पण किती दिवस त्यांच्या नावावर मते मागणार? तीन टर्म झाले आता अजित पवारांंना मत द्या, असं आवाहन त्यांनी केलं आहे. 


सध्या बारामती लोकसभा मतदार संघात सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अजित पवारदेखील बारामती लोकसभा मतदार संघात सभा घेत आहेत. कामाचा आराखडा वाचून दाखवत आहेत. MIDC आणण्याचे आश्वालनं देताना दिसत आहेत तर दुसरीकडे विजय शिवतारेदेखील जोमात कामाला लागल्याचं दिसत आहेत.  विजय शिवातरे म्हणाले की, संपूर्ण ताकदीने सुनेत्रा वहिनीचे काम करतो आहे. 8 हजार कार्यकर्ते सुनेत्रा पवार यांच्यासाठी काम करीत आहेतमतदारसंघात सगळीकडे पोहोचतो आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांचा विजय पक्का आहे. 


सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी महायुतीचे अनेक वरिष्ठ नेतेदेखील उपस्थित राहणार आहेत. शिवाय भोरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सभा घेणार आहे. आम्ही सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी काम करतो आहे. सुनेत्रा पवार चांगल्या मताधिक्यने निवडून येतील, असा दावादेखील त्यांनी केला आहे. 



रोहित पवार लोकांना भावनिक करीत आहेत.  जर भावाचा बदला घ्यायचा होता तर तुम्ही तिकडे जाऊन काम करायचं ना? पाच वर्षात तुम्ही काय काम केलं तिकडे?, असा सवाल शिवतारेंनी उपस्थित केला आहे. सुप्रिया सुळेंनी आपल्या मतदार संघात नेमकं काय काम केलं? रोहित पवारांनीदेखील काय काम केलं?, हे दाखवावं म्हणत रोहित पवार आणि सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. 


 


इतर महत्वाची बातमी-


Eknath Shinde: मोदींच्या सभेनंतर एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्येच थांबले, समरजितसिंह घाटगेंसोबत बंद खोलीत चर्चा, कागलमधून रेकॉर्डब्रेक मताधिक्याची हमी


Madha Lok Sabha: माढा जिंकण्यासाठी आता PM मोदी मैदानात, मोहिते-पाटलांच्या बालेकिल्ल्यात 28 एकरावर जंगी सभा, वारं फिरणार?