एक्स्प्लोर

वाहन कंपन्यांच्या बंपर सूटमुळे वाहन खरेदीत वाढ!

मुंबई: सुप्रीम कोर्टाने BS-III इंजिन असलेल्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीला बंदी घातल्यानंतर वाहन कंपन्यांनी 31 मार्चपर्यंत या गाड्यांच्या विक्रीसाठी बंपर सूट दिली होती. या बंपर सूटनंतर राज्यभरात मोठ्या प्रमाणात गाड्या खरेदी केल्या. त्यामुळे वाहनखरेदीत बरीच वाढ झाली. एकाच दिवसात तब्बल 3 पट वाढ झाली. गाड्यांवरील ऑफरनंतर प्रतिदिवशी 8 ते 9 (सरासरी) नव्या गाड्यांची नोंदणी झाली. 30 मार्च 2017ला 13757 नव्या गाड्यांची नोंदणी झाली. तर 31 मार्च 2017 रोजी दुपारपर्यंत तब्बल 15211 गाड्यांची नोंदणी झाली. मात्र, अनेक शोरुम काल रात्री 12 पर्यंत सुरु असल्यानं हा आकडा 25 ते 30 हजारापर्यंत जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, वाहनांवरील बंपर ऑफरनंतर राज्यातील प्रत्येक ठिकाणी शोरुममध्ये बरीच गर्दी दिसत होती. अनेक शोरुममध्ये तर ‘आऊट ऑफ स्टॉक’ अशा पाट्याही लावण्यात आल्या होत्या. गेल्या दोन दिवसात गाड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. मुंबईत 30 मार्चला 212 चारचाकी आणि 596 दुचाकींची नोंदणी झाली. तर 31 मार्चला 110 चारचाकी आणि 646 दुचाकींची नोंदणी झाली. तर पुणे, बुलडाणा, औरंगाबाद, मालेगाव, उस्मानाबाद, सोलापूर, वसई या ठिकाणी रेकॉर्डब्रेक गाड्यांची विक्री झाली. गेल्या नऊ दिवसात राज्यभरात 80693 दुचाकींची नोंदणी झाली आहे. Vehicle-compressed भारत स्टेज थ्री या इंजिनामुळे होणारं प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं भारत स्टेज थ्री इंजिन असलेल्या गाड्यांवर बंदी घातली आहे. त्याऐवजी आजपासून फक्त भारत-४ इंजिन असलेल्या गाड्यांचीच विक्री होणार आहे. Vehicle 1-compressed होंडाने स्कूटरवर तब्बल 13 हजार 500 रुपये इतकी भरघोस सूट दिली होती. तर मोटारसायकलवर तब्बल 18 हजार 500 रुपयांचा डिस्काऊंट दिला होता. त्यामुळे अनेकांनी शोरुमबाहेर गर्दी केली होती. 1 एप्रिलपासून BS-III इंजिन असलेल्या गाड्यांच्या नोंदणीला मनाई करण्यात आली आहे. गाडी पुन्हा विक्रीला काहीही अडचण नाही दरम्यान, गाडी खरेदी करुन, तिची नोंदणीही झाल्यास, ती गाडी पुन्हा विकण्यास काहीही अडचण नाही. कारण एकदा नोंदणी झालेल्या गाडीचा मालक बदलेल, त्यामुळे भविष्यात कोणतेही प्रश्न निर्माण होणार नाहीत, असंही व्यवस्थापकांनी सांगितलं आहे. BS-III इंजिन असलेल्या जुन्या गाड्यांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. यापुढे BS-III इंजिन असलेल्या गाड्यांची खरेदी-विक्रीच बंद करण्याचा निर्णय कोर्टाने दिला होता. पर्यावरणाचं प्रदूषण रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. या निर्णयामुळे BS-III  इंजिन असलेल्या तब्बल 8 लाख 14 हजार गाड्यांच्या विक्रीवर संक्रात आली होती. या निर्णयामुळे भारतात आता केवळ BS IV इंजिन असलेल्या गाड्यांच्याच खरेदी-विक्रीला परवानगी असेल. BS-III  आणि BS IV इंजिन म्हणजे काय?
  • BS म्हणजे भारत स्टॅण्डर्ड स्टेज. इंजिनाच्या अंतर्गत वहनामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या नियमनासाठी, केंद्र सरकारने दिलेलं मानक म्हणजे BS होय. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ हे त्यावर नियंत्रण ठेवतं.
 
  • BS मानकं ही भारतात धावणाऱ्या सर्व वाहनांसाठी लागू आहेत.
 
  • भारतात जसं BS मानकं आहेत, तशी युरापोत Euro, अमेरिकेत Tier 1, Tier 2 अशी मानकं आहेत.
 
  • वाहनाच्या इंजिनामुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी BS मानांकनात वेळोवेळी सुधारणा होत असते. BS IV हा त्याचाच भाग असून, कमीत कमी वायू प्रदूषणाच्या दृष्टीने आता भारतात वाहनांमध्ये BS IV इंजिन बंधनकारक आहे.
  संबंधित बातम्या: बंपर ऑफरनंतर अनेक शोरुममध्ये दुचाकी 'आऊट ऑफ स्टॉक'! BS-III इंजिनच्या गाड्या भंगारात, खरेदी-विक्रीला बंदी : सुप्रीम कोर्ट होंडाच्या टू व्हीलरवर 18 हजारांची सूट, गाड्या खपवण्यासाठी धावाधाव

महत्त्वाच्या बातम्या

Coaching Class New Rules: शाळांजवळ क्लासेसना बंदी, भल्या पहाटे क्लास नको, 5 तासांपेक्षा जास्त शिकवणी नाही, कोचिंग क्लासेससाठी नव्या नियमांचा मसुदा!
शाळांजवळ क्लासेसना बंदी, भल्या पहाटे क्लास नको, 5 तासांपेक्षा जास्त शिकवणी नाही, कोचिंग क्लासेससाठी नव्या नियमांचा मसुदा!
Youth Employment NITI Aayog Report Marathi News: देशातील 8.7 कोटी तरुण शिक्षण आणि रोजगाराच्या कात्रीत; नीती आयोगाच्या अहवालात नेमकं काय काय?
देशातील 8.7 कोटी तरुण शिक्षण आणि रोजगाराच्या कात्रीत; नीती आयोगाच्या अहवालात नेमकं काय काय?
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: पप्पांनी दुकानातून आणलेल्या कचोरीत उंदराच्या लेंड्या, समजेपर्यंत मुलांनी दोन कचोऱ्या खाऊनही टाकल्या, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
पप्पांनी दुकानातून आणलेल्या कचोरीत उंदराच्या लेंड्या, समजेपर्यंत मुलांनी दोन कचोऱ्या खाऊनही टाकल्या, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
यशस्वी जैस्वालची पार सटकली? मैदानात भिडल्यानंतर आता हर्ष भोगलेंच्या व्हिडिओवर सुद्धा भडकला! पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया देत म्हणाला, 'तुम्हाला माहीत नसेल तर..'
यशस्वी जैस्वालची पार सटकली? मैदानात भिडल्यानंतर आता हर्ष भोगलेंच्या व्हिडिओवर सुद्धा भडकला! पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया देत म्हणाला, 'तुम्हाला माहीत नसेल तर..'
Viral Video: एक-दोन नव्हे तर अस्खलित इंग्लिशसह तब्बल 19 भाषांवर प्रभुत्व, ट्रेनमध्ये टूथब्रश विक्रेत्याच्या व्हिडिओची नेटकऱ्यांना भुरळ, म्हणाले 'हाच खरा भारत'
एक-दोन नव्हे तर अस्खलित इंग्लिशसह तब्बल 19 भाषांवर प्रभुत्व, ट्रेनमध्ये टूथब्रश विक्रेत्याच्या व्हिडिओची नेटकऱ्यांना भुरळ, म्हणाले 'हाच खरा भारत'
Coaching Class New Rules: शाळांजवळ क्लासेसना बंदी, भल्या पहाटे क्लास नको, 5 तासांपेक्षा जास्त शिकवणी नाही, कोचिंग क्लासेससाठी नव्या नियमांचा मसुदा!
शाळांजवळ क्लासेसना बंदी, भल्या पहाटे क्लास नको, 5 तासांपेक्षा जास्त शिकवणी नाही, कोचिंग क्लासेससाठी नव्या नियमांचा मसुदा!
Baba Ramdev: कंगना म्हणाली, माझ्या जवानीची आणि बेडरुमची दिवसा स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव पुन्हा भडकले; म्हणाले, 'अशा क्षुल्लक लोकांवर...'
कंगना म्हणाली, माझ्या जवानीची आणि बेडरुमची दिवसा स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव पुन्हा भडकले; म्हणाले, 'अशा क्षुल्लक लोकांवर...'
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: पप्पांनी दुकानातून आणलेल्या कचोरीत उंदराच्या लेंड्या, समजेपर्यंत मुलांनी दोन कचोऱ्या खाऊनही टाकल्या, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
पप्पांनी दुकानातून आणलेल्या कचोरीत उंदराच्या लेंड्या, समजेपर्यंत मुलांनी दोन कचोऱ्या खाऊनही टाकल्या, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
Akhilesh Yadav: भाषिक ज्ञानाची अट लादणे हे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन नाही का? इतर राज्यांनीही जर अशीच सक्ती केली तर....; मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून अखिलेश यादव भडकले
भाषिक ज्ञानाची अट लादणे हे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन नाही का? इतर राज्यांनीही जर अशीच सक्ती केली तर....; मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून अखिलेश यादव भडकले
Imran Khan: 'इम्रान खान यांना माणुसकीने वागणूक द्यावी..' कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, स्टीव्ह वॉ ते गिलख्रिस्ट; सहा देशांचे तब्बल 21 माजी कॅप्टन इम्रान खानसाठी मैदानात, पाकिस्तान सरकारकडे मोठी मागणी
'इम्रान खान यांना माणुसकीने वागणूक द्यावी..' कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, स्टीव्ह वॉ ते गिलख्रिस्ट; सहा देशांचे तब्बल 21 माजी कॅप्टन इम्रान खानसाठी मैदानात, पाकिस्तान सरकारकडे मोठी मागणी
Accident: कार डिव्हायडर ओलांडून इनोव्हा कारला धडकली; बेळगाव दक्षिणच्या आमदारासह 6 जण जखमी, अभय पाटलांसोबत आपचा आमदार सुद्धा जखमी
कार डिव्हायडर ओलांडून इनोव्हा कारला धडकली; बेळगाव दक्षिणच्या आमदारासह 6 जण जखमी, अभय पाटलांसोबत आपचा आमदार सुद्धा जखमी
Embed widget