एक्स्प्लोर
Advertisement
बीडमध्ये शेतकऱ्याची सावकारकीला कंटाळून आत्महत्या, सहा जणांवर गुन्हा
नारायण राऊत यांनी गावातील रोजगार हमी योजनेतील गैरव्यवहार माहिती अधिकारातून चव्हाट्यावर आणला होता. त्यामुळेच त्यांना आत्महत्येला प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
बीड : बीड तालुक्यातील म्हाळस जवळा येथील नारायण राऊत (38) यांच्या आत्महत्येप्रकरणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संतोष गायकवाडसह सहा जणांवर अवैध सावकारकी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी नारायण राऊत यांनी आत्महत्या केली होती.
गुन्हा नोंदवण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी दिवसभर शवविच्छेदन रोखून धरलं होतं. नारायण राऊत यांनी गावातील रोजगार हमी योजनेतील गैरव्यवहार माहिती अधिकारातून चव्हाट्यावर आणला होता. शिवाय त्यांनी सावकाराकडून व्याजाने पैसेही घेतले होते.
नारायण राऊत यांनी कर्जाच्या बदल्यात सासऱ्याची 40 गुंठे जमीन सावकाराला नावावर करुन दिली होती. कर्जाची रक्कम परत करुनही जमीनीचा ताबा देण्यात आला नव्हता. शिवाय गैरव्यवहार समोर आणलेल्या तक्रारी मागे घ्याव्यात यासाठी त्यांना धमकी देण्यात येत होती. यालाच कंटाळून नारायण राऊत यांनी आत्महत्या केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
नारायण राऊत यांनी सोमवारी सकाळी स्वत:च्या शेतात जाऊन विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केल्याची तक्रार नारायण यांचे बंधू विष्णू राऊत यांनी दिली.
तक्रारीनंतर आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अवैध सावकारकीच्या कलमान्वये राष्ट्रवादीचे नगरसेवक संतोष गायकवाड, अमोल गायकवाड (दोघे रा. बीड) आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, गणेश खांडे, नामदेव खांडे, हरिभाऊ खांडे (सर्व रा. म्हाळस जवळा) यांच्यावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या हे सर्व जण फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement