एक्स्प्लोर

भिवंडीत गर्भपात गोळ्यांचा अवैध धंदा तेजीत; वैद्यकीय यंत्रणेचं दुर्लक्ष

भिवंडीत गर्भपात गोळ्यांचा अवैध धंदा तेजीत सुरु असल्याचे समोर आले आहे.यात मेडिकल स्टोअर बरोबरच वैद्यकीय क्षेत्राशी जोडलेल्या खासगी व्यक्तींकडूनदेखील गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री केली जात आहे.

भिवंडी : गर्भलिंगनिदाना बरोबरच असुरक्षित गर्भपात करण्यास कायद्याने बंदी घातली आहे. असे असताना मेडिकल स्टोअर बरोबरच वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्या अनेक व्यक्तींनी सध्या गर्भपाताच्या गोळ्या विकण्याचा गोरखधंदा सुरु केल्याची खळबळजनक बाब भिवंडीत समोर आली आहे. विशेष म्हणजे या गोरखधंद्यावर वैद्यकीय विभागासह पोलीस यंत्रणा व प्रशासनाचा कोणताही धाक नसल्याने सर्रासपणे गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री भिवंडीत होत आहे.

300 रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंत या गर्भपाताच्या गोळ्या माणूस बघून विकल्या जात आहेत. एका दक्ष नागरिकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये ही खळबळजनक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे कायद्याची बंदी असतानाही मेडिकलमध्ये डॉक्टरांच्या कोणत्याही लेखी प्रिस्क्रिप्शन शिवाय या गोळ्या मिळत असल्याने गर्भपाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, यावर शासकीय यंत्रणांचे कोणतेही नियंत्रण नसल्याने अवैध गोळ्या विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विजय जाधव असे दक्ष नागरिकाचे नाव असून ते सामाजिक कार्यकर्ता म्हणून भिवंडीत काम करीत आहेत. भिवंडीत गर्भपाताच्या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळतात अशी माहिती मिळाल्यानंतर जाधव यांनी भिवंडीतील शास्त्री नगर परिसरातील एका मेडिकल दुकानात या गर्भपाताच्या गोळ्या खरेदी करताना स्टिंग ऑपरेशन केले. त्यातही खळबळजनक माहिती समोर आली. भिवंडीतील अनेक मेडिकलमध्ये अशा प्रकारे अवैधरित्या गर्भपाताच्या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळत असल्याने यामुळे गर्भपात कायद्याचं सर्रासपणे उल्लंघन होत असून समाजात भ्रूणहत्या वाढण्याची शक्यता देखील जाधव यांनी वर्तविली आहे. या अवैध गोळ्या विकणाऱ्या मेडिकल चालकांसह खासगी व्यक्तींवर कारवाई करावी तसेच संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करावा अशी मागणी देखील जाधव यांनी केली आहे.

या गोळ्या प्रसुती व स्री रोग तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेणे गरजेचे आहे. मात्र, भिवंडीत चणे फुटाणे विकतात तशा पद्धतीने सर्रासपणे या गर्भपाताच्या गोळ्या विकल्या जात आहेत. डॉक्टरांचा सल्ला न घेता या गोळ्या खाल्ल्याने स्त्रीला भविष्यात गर्भपिशवीसंदर्भतील त्रास होऊ शकतो. तर कधी कधी गोळ्यांमध्ये पूर्ण गर्भ पडत नसल्याने गर्भ पिशवी साफ करण्याची वेळ अथवा काढून टाकण्याची वेळ महिलेवर येते. यामुळे महिलांच्या जीवाला देखील धोका निर्माण होण्याची शक्यता तर कधी कधी जास्त रक्तस्राव होऊन महिलांचा जीव देखील जातो, अशी माहिती स्री रोग तज्ञ डॉ. सुप्रिया अरवारी यांनी दिली आहे.

भिवंडीत अनेक अवैध धंदे सुरु असताना आता महिलांच्या जीवाशी खेळून अवैध गर्भपाताच्या गोळ्या विकणाऱ्या रॅकेटवर अन्न व औषध प्रशासन नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

आधी दारू चोरली मग थांबून प्यायली! चोरी करताना चोरट्यांचे 'पेग वर पेग' सीसीटीव्हीमध्ये कैद

चुलत्याकडून विनयभंग, त्रासाला कंटाळून अल्पवयीन पुतणीची आत्महत्या, आईचा आरोप

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
Abhijit Dipke : संजय शिरसाट अन् बच्चू कडू अभिजीत दिपकेंना भेटल्यानंतर महायुतीत नाराजी; रोहित पवार म्हणाले, 'कितीही प्रयत्न केला तरी...'
संजय शिरसाट अन् बच्चू कडू अभिजीत दिपकेंना भेटल्यानंतर महायुतीत नाराजी; रोहित पवार म्हणाले, 'कितीही प्रयत्न केला तरी...'
Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Embed widget