एक्स्प्लोर
उद्धव-जयदेवच्या भांडणात मला पडायचं नाही : राज ठाकरे
![उद्धव-जयदेवच्या भांडणात मला पडायचं नाही : राज ठाकरे I Dont Want To Interfere In Uddhav Thackeray Jaydev Thackeray Conflict Raj Thackeray उद्धव-जयदेवच्या भांडणात मला पडायचं नाही : राज ठाकरे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/04055856/RAJ-THACKERAY-PC--270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : मला उद्धव आणि जयदेव यांच्या भांडणात पडायचं नाही, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. नाशिकमध्ये पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली.
काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी 'मातोश्री' या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. सध्या उद्धव आणि जयदेव ठाकरे यांच्यात बाळासाहेबांच्या संपत्तीवरुन वाद सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवरच राज ठाकरेंनी ही भेट घेतल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. त्याबाबतच राज यांना विचारण्यात आलं.
यावेळी राज ठाकरे म्हणाले, "मला उद्धव- जयदेवच्या भांडणात पडायचे नाही. जे बोललो ते खरं आहेच. कोर्टात जायची मला सवय आहे.
राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
सगळा गोदाकाठ उद्ध्वस्त झाला, तिथे गोदापार्कचं काय?
अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याचे मूर्खासारखा निर्णय घेतल्याने पूरस्थिती गंभीर
देशात माणसं मरण्याची किंमत राहिली नाही. महाड घटनेवर राज यांची प्रतिक्रिया
कधी कधी वाटतं हा देश बीओटीवर देवून टाकावा असं वाटतं
सत्ता हातात आहे ना, मग विदर्भाचा अनुशेष भरून काढ़ा ना.
हा फक्त वेळकाढूपणा करण्यासाठी असे उद्योग करतात
राज्यातल्या इतर समस्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी विदर्भ मुद्दा काढतात
राज्यसरकार जनतेला मूर्ख बनवात आहेत
काँग्रेस एनसीपी सेना भाजपा सर्व एकत्र आहे
फडणवीस अजून विरोधीपक्षांच्या भूमीकेतून बाहेर आलेले नाही
मला उद्धव- जयदेवच्या भांडणात पडायचे नाही.
जे बोललो ते खरं आहेच. कोर्टात जायची मला सवय आहे.
संबंधित बातम्या
राज ठाकरे 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंची भेट
जयदेव ठाकरेंचे उद्धव यांच्यासह ठाकरे कुटुंबावर वैयक्तिक आरोप "शिवसेनेची धुरा बाळासाहेबांना माझ्या खांद्यावर द्यायची होती" "उद्धवनी बाळासाहेबांना अंधारात ठेवून ‘त्या’ कागदावर सही घेतली" शिवसेनाप्रमुखांच्या मृत्यूपत्राचा वाद, जयदेव यांची 18 जुलैपासून उलटतपासणीअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
पुणे
व्यापार-उद्योग
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)