Hyderabad Liberation Day 2022 Live: आज हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन, पाहा सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी

भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये हैदराबाद मुक्तिसंग्रामाला एक विशेष स्थान आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झाला, पण हैदराबाद मात्र निजामांच्या गुलामीत कायम होतं.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Sep 2022 07:05 PM
Marathwada Mukti Sangram : राष्ट्रध्वजाला बीड पोलिसांच्या वतीने मानवंदना 

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त बीडमध्ये आज राष्ट्रध्वजाला बीड पोलिसांच्या वतीने मानवंदना करण्यात आली. यावेळी बीड पोलिसांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने परेड संचलन केल. राज्याचे मंत्री संदिपान भुमरे यांनी या परेड संचलनाचं निरीक्षण करून पोलिसांच कौतुक केल आहे


या पर्यटसंचालनात बीड जिल्हा पोलीस दलातील पोलीस, होमगार्ड, एनसीसी पथक त्याचबरोबर सैनिक शाळेचे विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. दरवर्षी लाल किल्ल्यावर जी परेड होते त्याच पद्धतीचा अनुभव आज बीड जिल्हा पोलिसांनी केलेल्या परेडमधून पाहायला मिळाला. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी आणि ही परेड पाहण्यासाठी बीडमधील तरुण अनेक ज्येष्ठ नागरिकांनी हजेरी लावली होती

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्तिसंग्रामात बलिदान देणाऱ्या लक्ष्मण परळकर यांच्या स्मारकाची दुरावस्था

बीडच्या वाघीरा गावामध्ये मराठवाडा मुक्तिसंग्रामात बलिदान देणाऱ्या लक्ष्मण परळकर यांच्या स्मारकांची दुरावस्था झाली आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याकडे तक्रार नोंदवली आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातील वाघेरा येथील लक्ष्मण मारुती परळकर यांनी देखील मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यामध्ये आपलं हुतात्मे दिल होत. त्यांच्याच स्मरणार्थ वाघीरा गावात त्यांचं स्मारक उभारण्यात आलं. मात्र या हुतात्मा स्मारकाकडे प्रशासनच दुर्लक्ष झाला असून या ठिकाणी अक्षरश: जनावर बांधण्यात येत आहेत तर सर्वच ठिकाणी घाणीचे साम्राज्य पाहायला मिळतय.

मराठवाडा मुक्ती संग्राम झाला नसता तर देशाच्या नकाशात मध्यभागी एक इस्लामिक राष्ट्र उभं राहिलं असतं- प्रकाश महाजन
मराठवाडा मुक्ती दिवस एखाद्या सणासारखे साजरे केले पाहिजे असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे म्हणणे एकदम योग्य आहे.. जर मराठवाडा मुक्ती संग्राम झाला नसता तर देशाच्या नकाशात मध्यभागी एक इस्लामिक राष्ट्र उभं राहिलं असतं आणि तो देशाच्या सुरक्षिततेसाठी खूप मोठा धोका राहिला असता... त्यामुळे मराठा मुक्ती दिवस सणासारखाच साजरा केला पाहिजे असं मत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले आहे.. ते मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मराठवाडा मुक्ती दिनाबद्दलच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत होते.. औरंगाबाद येथील मुख्यमंत्र्यांच्या ध्वजारोहणाला मुद्दा बनवून विरोध करणारी शिवसेना बालिश आहे... एकनाथ शिंदे यांनी काहीही केले तरी ते त्यांचा विरोधच करतात असे प्रकाश महाजन म्हणाले...

 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर विद्यार्थ्यांकडून नोकर भरती झाली पाहिजे यासाठी घोषणाबाजी

नांदेड येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहण प्रसंगी आलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विद्यार्थ्यांकडून नोकर भरती झाली पाहिजे यासाठी घोषणाबाजी करत निषेध करण्यात आलाय. नांदेड शहरातील श्रीनगर येथील भाजपच्या  कार्यक्रम स्थळी विद्यार्थ्यांनी सरकारने पोलीस भरती, आरोग्य, नोकर भरती करण्यात यावी, यासाठी घोणबाजी केलीय. 

हा दिवस सणासारखा साजरा झाला पाहिजे- राज ठाकरे

आज हैदराबाद मुक्ती संग्राम (Marathwada Mukti Sangram Din) दिन आहे. या निमित्तानं मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक निवेदन लिहित हा दिवस सणासारखा साजरा झाला पाहिजे, असं आवाहन केलं आहे.  राज ठाकरेंनी म्हटलं आहे की, आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैद्राबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून हा खरं तर आजचा दिवस, एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

Hyderabad Liberation Day 2022 Live: हिंगोली शहरातील हुतात्मा स्मारक परिसरात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण

आज हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त हिंगोली शहरातील हुतात्मा स्मारक परिसरात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आदरांजली अर्पण केली.  या ठिकाणी प्रशासकीय ध्वजारोहण राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हवेत फैरी झाडत हैदराबाद मुक्तीसंग्रामात प्राणाची आहुती दिलेल्या स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

मराठवाडा मुक्ती संग्रामात योगदान देणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांना फडणवीसांचं अभिवादन

देशाचा अमृत महोत्सव जसा साजरा झाला तसाच मराठवाडा मुक्ती दिन साजरा करायला पाहिजे होता - अजित पवार

अजित पवार म्हणाले की, मराठवाड्याच्या मुक्तीनंतर ज्या नेत्यांनी प्रगती होण्यासाठी कष्ट घेतले त्यात सुंदरराव सोळंके यांचे नाव आघाडीवर होते. मराठवाड्याला कायम संघर्ष करून मिळवावे लागले. मराठवाडा मुक्त करण्यासाठी अनेकांनी आपल्या जीवाची बाजी लावली. मराठवाडा मुक्तीचा उत्सव सुद्धा साजरा करण्यासाठी आम्ही 75 कोटी रुपयांची तरतूद केली होती मात्र सध्याच्या सरकारकडून या बाबतीत अनास्था दाखवत आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात नव्या समितीची स्थपणा करायला पाहिजे होती. देशाचा अमृत महोत्सव जसा साजरा झाला तसाच मराठवाडा मुक्ती दिन साजरा करायला पाहिजे होता पण सरकारने अनास्था दाखवली हे दुर्देवी आहे.  मुख्यमंत्री सकाळी साडे सात वाजता कार्यक्रम करून हैदराबादला गेले पण असाच कार्यक्रम औरंगाबादला घेऊ शकले असते.  

मुक्तिसंग्रामच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी फक्त 15 मिनिटं वेळ देणं हा मराठवाडा मुक्त करणाऱ्यांचा अवमान - चंद्रकांत खैरे

मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी फक्त 15 मिनिटं वेळ देणं हा मराठवाडा मुक्त करणाऱ्यांचा अवमान असल्याची टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी केली आहे.

हैदराबाद मुक्ती संग्राम दिनी माजलगाव येथे अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण

हैदराबाद मुक्ती संग्राम दिनी माजलगाव येथे अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण सुरू असतानाच शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

 बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम चालू असतानाच एका शेतकऱ्याने आपल्या मागण्यासाठी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. शिरसाळा येथील शिवाजी उपाडे असं या शेतकऱ्याचे नाव असून अनेक दिवसापासून त्याच्या जमिनीचा वाद प्रलंबित आहे .अनेक वेळा मागणी करून देखील यावर प्रशासनाच्या वतीने कारवाई होत नसल्याने शिवाजी उपाडे यांनी पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात पोलिसांनी त्याच्या हातामधील रॉकेल व माचीस हिसकावून घेऊन या शेतकऱ्याला ताब्यात घेतला आहे

MIM चे खासदार इम्तियाज जलील मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी गैरहजर; मनसेची जहरी टीका

सलग 2 वर्ष MIM चे खासदार इम्तियाज जलील मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी गैरहजर आहेत. नेमका त्यांना यातून काय संदेश द्यायचा आहे? मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचा आणि मराठवाड्यातील जनतेचा अपमान करून त्यांना कोणाला खुश करायचे आहे ? की हा मराठवाडा मुक्तीसंग्रामचा लढाच त्यांना मान्य नाही. ही आधुनिक निजामाची नव रझाकार अवलाद महाराष्ट्रातून निवडून येते. याची लाज वाटते. यांच्या मतांच्या जीवावर उध्दवजी ठाकरे  गटाचे अंबादास दानवे विधानपरिषदेला निवडून येतात आणि राज्यसभा खासदारकीला ही या MIM च्या मतांची मदत घेऊन उद्धव ठाकरे यांची नवाब सेना स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी म्हणवते, अशी टीका  मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी केली आहे. 





 नऊ वाजता आम्ही पुन्हा एकदा अभिवादन करणार आहोत- अंबादास दानवे

पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मराठवाडा मागे आहे. त्याला पुढे आणण्यासाठी हा क्षण होता मात्र मुख्यमंत्र्यांनी काही घोषणा केली.  नऊ वाजता आम्ही पुन्हा एकदा अभिवादन करणार आहोत, असं दानवेंनी सांगितलं. दानवे म्हणाले की,  भूखंडाच्या सर्व फाईल थांबवल्या आहेत, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. उद्योगासाठी हे घातक असून यापूर्वी असं कधीही झालेलं नाही. उद्योजक नाराज असून दिल्लीपर्यंत याच्या तक्रारी गेल्या आहेत, असंही दानवे म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांना दिल्लीच्या पातशाहांसाठी जायचं होतं म्हणून पंधरा मिनिटात कार्यक्रम आटोपून  घेतला- अंबादास दानवे

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना दिल्लीच्या पातशाहांसाठी जायचं होतं म्हणून पंधरा मिनिटात कार्यक्रम आटोपून  घेतला.  मुख्यमंत्र्यांसाठी ज्या घोषणा केल्या त्या जुन्या आहेत, त्यातील अनेक कामं सुरू आहेत.  नवीन कोणतीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केले नसून हा मराठवाड्यावर अन्याय आहे.

मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी होऊन आपले रक्त सांडणाऱ्या सर्वच ज्ञात अज्ञात वीरांना बलिदानाबद्दल विनम्रतापूर्वक अभिवादन- मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी होऊन आपले रक्त सांडणाऱ्या सर्वच ज्ञात अज्ञात वीरांना त्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दल विनम्रतापूर्वक अभिवादन केले. हा लढा सोपा नव्हता मात्र रझाकारीच्या जोखडातून स्वतःची मुक्तता करून स्वातंत्र्याची पहाट अनुभवण्यासाठी या वीरांनी जे बलिदान दिले त्याबद्दल त्यांचे राज्यातील जनतेच्या वतीने आभार मानले.त्यांच्या बलिदानातून स्वतंत्र झालेल्या मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून काढू असे आश्वासन देत त्यांनी यावेळी विविध घोषणा केल्या. 

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी औरंगाबादमध्ये जोरदार राजकारण

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी औरंगाबादमध्ये जोरदार राजकारण, मुख्यमंत्री शिंदेंच्या १५ मिनिटे उपस्थितीवर शिवसेनेची टीका

पार्श्वभूमी


मुंबई : भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये हैदराबाद मुक्तिसंग्रामाला एक विशेष स्थान आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झाला, पण हैदराबाद मात्र निजामांच्या गुलामीत कायम होतं. हैदराबाद स्वतंत्र राहिल अशी घोषणा करणाऱ्या निजाम मिर उस्मान अलीने पाकिस्तान सोबत संधान बांधलं होतं. निजामाच्या रझाकारांनी नागरिकांवर अनन्वित अत्याचार सुरू केले होते. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबादवर पोलीस कारवाई केली. 'ऑपरेशन पोलो'च्या माध्यमातून केवळ 108 तासांमध्ये त्यांनी निजामाला गुडघ्यावर आणलं आणि हैदराबाद मुक्त केलं. त्याचं स्मरण म्हणून 17 सप्टेंबर हा दिवस हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन पाळला जातो.


हैदराबादचा इतिहास


मुघलांच्या काळात म्हणजे 1713  असफ जहाँ याला निजाम-उल-मुल्क अशी पदवी देऊन हैदराबादचा सरदार घोषित करण्यात आलं. नंतर 1798 साली हे संस्थान ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली गेलं. हैदराबादच्या निजामांनी सुरुवातीपासूनच ब्रिटिशांची बाजू घेतली, त्यामुळे ब्रिटिशांची त्याच्यावर कायम मर्जी राहिली.


निजाम जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत 


हैदराबाद संस्थान हे 82,698 स्क्वेअर किमी वर्ग इतकं मोठं होतं. त्यात आताचा तेलंगणा, आंध्र प्रदेश, मराठवाडा आणि कर्नाटकातील दोन जिल्ह्यांचा समावेश होता. हैदराबादचा वार्षिक महसूल हा त्यावेळी नऊ कोटी रुपये इतका होता. निजामाची गणना त्यावेळच्या जगभरातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत केली जायची. निजाम हा 185 कॅरेटचा जेकब हिऱ्याचा पेपर वेट म्हणून वापर करायचा. हैदराबाद संस्थानावर ब्रिटिशांची मर्जी होती. त्याकाळी हैदराबादची स्वतंत्र टेलिकम्युनिकेशन सिस्टिम, स्वतंत्र रेल्वे आणि अर्थव्यवस्था होती. हैदराबादची 80 टक्के जनता ही हिंदू होती आणि 20 टक्के जनता अल्पसंख्यांक होती. पण निजामाकडील सर्व उच्च पदे आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये अल्पसंख्याकांना स्थान होतं.


हैदराबादने स्वतःला स्वातंत्र घोषित केलं


15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. त्यावेळी भारतात एकूण 565 संस्थानं होती. त्यापैकी जुनागड, भोपाळ आणि हैदराबाद वगळता सर्व संस्थानांनी भारतात सामील होण्याचा निर्णय घेतला. नंतर जुनागडवर कारवाई करण्यात आली तर भोपाळाने भारतात सामील होत असल्याचं जाहीर केलं. पण हैदराबादने मात्र स्वतंत्र राहणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.


हैदराबादच्या या कृतीमागे पाकिस्तानचा छुपा हात होता. तसेच पोर्तुगालने त्याला पाठिंबा दिला होता. निजामाने अमेरिकेकडे आणि ब्रिटनकडे पाठिंबा मागितला. पण तो त्यांना मिळाला नाही. निजामाने राष्ट्रकुल देशांमध्ये हैदराबादला सदस्यत्व मिळावं यासाठी प्रयत्न सुरू केले. तसेच युरोपियन देशांकडून अत्याधुनिक हत्यारांची खरेदी करण्यासाठी छुपे प्रयत्न सुरू केले.


सरदार पटेलांची चिंता


भारताच्या मध्यवर्ती भागात पाकिस्तानसोबत निष्ठा असणारा प्रांत असणं हे भारतीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे, तत्कालीन हैदराबाद हे भारताच्या पोटातील कॅन्सर असल्याचं मत गृहमंत्री सरदार पटेल यांनी मांडलं. त्यामुळे हैदराबाद कोणत्याही परिस्थितीत भारतात सामील व्हायलाच हवं या मतावर ते ठाम होते.


रझाकारांचा उच्छाद


निजामने हैदराबादच्या सुरक्षेसाठी रझाकारांचं सैन्य उभं केलं होतं. या रझाकारांचा म्होरक्या होता तो कासिम रिझवी. त्याने संस्थानात नुसता उच्छाद मांडला होता. नागरिकांवर अत्याचार करणे, लुटमारी, जातीय दंगली, खून अशी कृत्ये तो उघड उघड करायचा. निजामाचा त्याला पूर्ण पाठिंबा होता.


कासिम रिझवीची सरदार पटेल यांना धमकी...


भारत स्वातंत्र्य झाल्यावर इतर संस्थांनाप्रमाणे हैदराबादने भारतात विलीन व्हावं असं आवाहन भारत सरकारने केलं होतं. पण निजाम मात्र याच्या विरोधात होता. भारताने त्यासाठी चर्चेची भूमिका घेतली. नोव्हेंबर 1947 सरदार वल्लभभाई पटेल आणि कासिम रिझवीची दिल्लीत भेट झाली. हैदराबादला जर  हात लावाल तर महागात पडेल अशी थेट धमकीच त्याने सरदार पटेल यांना दिली. त्यावर तुम्ही जर आत्महत्याच करायचं ठरवलं असेल तर आम्ही कसं काय थांबवणार असं प्रत्युत्तर पटेल यांनी दिलं.


निजामाच्या विरोधात भारतभर रोष


22 मे 1948 रोजी रझाकारांनी गंगापूर स्टेशनवर रेल्वे प्रवाशांवर हल्ला केला, त्यामध्ये अनेकजण मृत्युमुखी पडले. त्यामुळे निजामाविरोधात भारतभर रोष निर्माण झाला. आता निजामाविरोधात भारत सरकारने कारवाई करावी यासाठी मोठा दबाव वाढू लागला.


पोलीस कारवाई आणि ऑपरेशन पोलो


हैदराबादमध्ये लष्करी कारवाई करण्यासाठी सरदार पटेल यांनी हालचाली सुरू केल्या. पण या कारवाईला लष्करी कारवाई असे न म्हणता पोलीस कारवाई असं नाव देण्यात आलं. कारण लष्करी कारवाई परकीय राष्ट्राच्या विरोधात केली जाते. हैदराबाद तर भारताचाच भाग आहे, त्यामुळे पोलीस कारवाई करण्याचं ठरलं. यामुळे पाकिस्तानसह इतर देशांची तोंडंही बंद होणार होती.


हैदराबादमध्ये त्यावेळी जगातील सर्वाधिक म्हणजे 17 पोलो ग्राउंड होते. त्यामुळे या कारवाईला 'ऑपरेशन पोलो' असं नाव देण्यात आलं 13 सप्टेंबर रोजी भारतीय लष्कर हैदराबाद मध्ये घुसलं. त्यावेळी गोरखा बटालियनने जबरदस्त आक्रमण केलं. रझाकारांचे सैन्य जेमतेम 24 हजारांच्या आसपास होतं. अवघ्या तीनच दिवसात हैदराबादमधील सर्व प्रमुख ठिकणं भारताच्या ताब्यात आली. भारतीय सैन्याच्या आक्रमणापुढे रझाकार तग धरू शकले नाहीत. 17 सप्टेंबर रोजी म्हणजे पाच दिवसांनी निजामाने शरणागती पत्करली.


भारतीय लष्करांने 108 तासांमध्ये निजामाला गुडघ्यावर आणलं. या कारवाईत भारताचे 66 जवान शहीद झाले तर 1373 रझाकार मारले गेले. निजाम शरण आला, तर कासिम रिझवीला अटक करण्यात आली आणि नंतर त्याला पाकिस्तानमध्ये सोडण्यात आलं. सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद संस्थान भारतात विलीन करून खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त करून दिला.


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.