एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महापालिकेसाठी प्रभाग पद्धतीत कसं मतदान करायचं?
मुंबई : महापालिकांसाठी यंदा पहिल्यांदाच बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने मतदान होत आहे. त्यामुळे तुम्हाला एका प्रभागातून 4 उमेदवार निवडून द्यायचे आहेत.
मायानगरी मुंबईसह राज्यातील 10 महापालिका आणि 10 जिल्हा परिषदांसाठी आज मतदान होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगासह पोलीस, प्रशासन आणि राजकीय पक्षही चांगलेच तयारीत आहेत.
मुंबईसह राज्यातील 10 पालिकांमध्ये 1268 जागांसाठी तब्बल 9 हजार 208 उमेदवार रिंगणात आहेत. तर शहरांमध्ये तब्बल 1 कोटी 95 लाख मतदार आपला हक्क बजावणार आहेत. तब्बल 21 हजार पोलिंग स्टेशनवर मतदान पार पडेल.
मुंबईवगळता इतर महापालिकांमध्ये कसं मतदान करायचं?
- ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, सोलापूर, अमरावती, अकोला या महापालिकांमध्ये चार सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना आहे.
- उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक 1 ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ असे 4 जागा असतील. चारही जागांवरील उमेदवारांची यादी 2 मतदान यंत्रांवर असेल.
- उमेदवार जास्त असल्यास तीन किंवा चार मतदान यंत्रांचा वापर होण्याचीही शक्यता आहे.
- चार पैकी चारही मतं देणं अत्यावश्यक आहे. एक जरी मत कमी दिले, तर मत बाद होईल.
- चार बटणे दाबल्याशिवाय मतदानयंत्राच्या बीपचा आवाज येणार नाही. त्यामुळे मतदान अपुरे ठरेल.
- चार भागातल्या उमेदवारांचे वर्गीकरण करण्यासाठी मतदान यंत्रांवर त्यांची नावे वेगवेगळ्या चार रंगात छापण्यात येतील.
- ‘अ’ भागातल्या उमेदवारांची नावे पांढऱ्या पार्श्वभूमी असलेल्या रंगावर लिहिली जातील
- ‘ब’ भागातल्या उमेदवारांची नावे फिकट गुलाबी पार्श्वभूमी असलेल्या रंगावर लिहिली जातील.
- ‘क’ भागातल्या उमेदवारांची नावे पिवळी पार्श्वभूमी असलेल्या रंगावर लिहिली जातील.
- ‘ड’ भागातल्या उमेदवारांची नावे फिकट निळी पार्श्वभूमी असलेल्या रंगावर लिहिली जातील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement