एक्स्प्लोर
प्रेमी युगुलांची नोंद न ठेवणाऱ्या महाबळेश्वरातील हॉटेल मालकावर गुन्हा
प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्यानंतर महाबळेश्वर पोलीस आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. ओळखपत्र न घेणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हॉटेल व्यावसायिकांनी पोलिसांच्या या कारवाईची धास्ती घेतली आहे.
सातारा : राज्यातील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वरमध्ये प्रेमी युगलाने केलेल्या आत्महात्येनंतर आता महाबळेश्वर पोलिसांनी हॉटेल व्यावसाईकांना चांगलंच धारेवर धरलंय. प्रेमी युगलांची माहिती हॉटेल व्यावसाईकाने व्यवस्थित न ठेवल्यामुळे हॉटेल मालकावर गुन्हा दखल करण्यात आलाय. पोलिसांच्या या कारवाईमुळे महाबळेश्वरमधील हॉटेल व्यावसाईकांचे धाबे दणाणले आहेत.
अहमदनगर येथील पर्यटक महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी आले होते. पत्नी असल्याचं सांगून त्याने महाबळेश्वरमधील रॉयल हॉटेल बूक केलं. रात्रभर राहिल्यानंतर हे कपल टॅक्सी भाड्याने घेऊन लिंगमळा धबधबा पाहण्यासाठी गेले आणि त्यांनी स्वतःच्या नसा कापून घेऊन दरीत उडी मारत आत्महत्या केली. ट्रेकर्स मंडळींनी रात्री उशिरापर्यंत या धबधब्यातून दोघांचे मृतदेह बाहेर काढले.
पोलिसांनी या दोघांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. माहिती घेत असताना ते ज्या रुममध्ये राहिले होते त्या ठिकाणी पोलीस पोहोचले. हॉटेलची नोंदवही चेक केली तेव्हा पर्यटकाने पत्नी असल्याचं सांगून फक्त स्वतःचं ओळखपत्र हॉटेलमध्ये दिल्याचं उघड झालं. त्यामुळे महाबळेश्वर पोलिसांनी हॉटेल मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
अनेक वेळा आदेश देऊनही हॉटेल व्यावसाईक हे पोलिसांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत आहेत. मात्र आता पर्यटकांचं ओळखपत्र न घेतल्यामुळे अशा पद्धतीने गुन्हा दाखल करण्याचा पहिलाच प्रकार घडल्यामुळे हॉटेल मालकांनी धास्ती घेतली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement