रुग्णालयाने बदलला मृतदेह; 3 दिवसांपासून गायब होता मृतदेह, यवतमाळमधील प्रकार
वसंतराव नाईक शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात मृत झालेल्या एका 27 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयात मागील 3 दिवसापासून सापडत नसल्याने मृताच्या नातेवाईकांनी उपोषण केले होते.
यवतमाळ : वसंतराव नाईक शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात मृत झालेल्या एका 27 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयात मागील 3 दिवसापासून सापडत नसल्याने मृताच्या नातेवाईकांनी उपोषण केले होते. परंतु चौकशीअंती निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणाची घटना उघड झाली. डेथ लेबल व्यवस्थित न लावल्याने रुग्णालयाकडून मृतदेह बदलण्याच आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रोशन भीमराव ढोकणे याच्या मृतदेहावर मारोती जाधव या नावाने डेथ लेबल लावले गेले आणि अंतिम संस्कार करण्यात आले. चौकशी समितीचा अंतिम अहवाल मंगळवारपर्यंत येणार असून संबंधित दोषीवर योग्य कारवाई करण्यात येईल, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने म्हटले आहे.
रोशन भीमराव ढोकणे याच्या मृतदेहावर मारोती जाधव या नावाने डेथ लेबल लागून वॉर्डातून मॅरच्युरीमध्ये गेला. मृत मारोती जाधव यांचा मुलगा विनोद जाधव याची मनस्थिती बरी नसल्यामुळे मृतदेहाची ओळख पटविण्याच्यावेळी दुर्लक्ष केल्यामुळे मारोती जाधव यांच्या जागी रोशन ढोकणे याच्या मृतदेहाचा अंतिम संस्कार यवतमाळ नगर परिषदेमार्फत 21 एप्रिल रोजी करण्यात आला.
मारोती जाधव कोरोना पॉझिटिव्ह होते. तसेच मॅरच्युरीमध्ये आणखी एक पुरुष मृतदेह होता. मारोती जाधव यांच्या नातेवाईकांनी शनिवारी सदर मृतदेहाची ओळख मारोती जाधव म्हणून केली. तसेच ख-या मारोती जाधव यांच्या मृतदेहाचे अंतिम संस्कार नगर परिषदेमार्फत करण्यात आले. संपूर्ण वस्तुस्थिती रोशन ढोकणे यांच्या कुटुंबियांना सांगण्यात आली. त्यानंतर कुटुंबियांनी उपोषण मागे घेतले.
संपूर्ण प्रकरणाच्या चौकशी समितीचा अहवाल मंगळवापर्यंत सादर होण्याची शक्यता असून संबंधित दोषीवर योग्य कारवाई करण्यात येईल, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी कळविले आहे.
20 एप्रिलला रोजी दुपारी यवतमाळच्या वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय मध्ये उपचारासाठी त्यांना नातलगांनी आणले त्याला उष्माघाताचा त्रास झाल्याने त्याला प्रथम महाविद्यालयात चे फिवर opd मध्ये ठेवले आणि सांयकाळी त्यांना वैद्यकीय महाविद्यालय मध्येच वार्ड 25 आणले तेथेच 20 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 9.30 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला .रात्री 10.30 वाजेपर्यंत नातलगांना त्यांचा मृतदेह वार्डात दिसला आणि त्यानंतर उद्या रोशनचा मृतदेह शवगृहातुन घेऊन मृतदेह जावे असे वैद्यकीय महाविद्यालयच्या प्रशासनाने नातलगांना सांगितले मात्र दुसऱ्या दिवशी नातलग वैद्यकीय महाविद्यालय मध्ये पोहचले मात्र त्याचा मृतदेह कुणालाच सापडला नाही.रोशनचा मृतदेह शवगृहात ठेवण्यात आले असे रुग्णालयातील प्रशासनाने सांगितले. मात्र आता 3 दिवस झाले तरी मृत व्यक्तीचा मृतदेह काही कुणालाच सापडत नाही. त्याचा मृतदेह शवगृहात शोधला मृतदेह तेथे सापडला नाही रोशन ढोकने यांना कोरोना नव्हता त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला असे नातलगांनी म्हटले आहे.